×

हिंदू-मुस्लिम दंगली व ब्राम्हण्यवादी (भाग-१)

Published On :    24 Jan 2023  By : MN Staff
शेयर करा:


मी मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावचा. १९६० आणि ७० च्या दशकात मी विद्यार्थी दशेत असताना देशातील बहुतेक भागात, विशेषत: मध्य व उत्तर भारतात व महाराष्ट्रात वेळोवेळी हिंदू-मुस्लिम दंगली व्हायच्या व त्यासंबंधीच्या भडक बातम्यांमुळे जातीय तणाव निर्माण व्हायचा.

 मी मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावचा. १९६० आणि ७० च्या दशकात मी विद्यार्थी दशेत असताना देशातील बहुतेक भागात, विशेषत: मध्य व उत्तर भारतात व महाराष्ट्रात वेळोवेळी हिंदू-मुस्लिम दंगली व्हायच्या व त्यासंबंधीच्या भडक बातम्यांमुळे जातीय तणाव निर्माण व्हायचा. पण याला कोल्हापूर जिल्हा अपवाद होता. त्याला कारण म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांची धार्मिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक पुरोगामी धोरणे व त्यांचा जनतेवर असलेला जबरदस्त पगडा. त्यामुळे मला व आमच्या पिढीतील कोल्हापुरातील तरुणांना जातीय दंगलीची झळ पोहचली नव्हती व त्याचे गांभीर्य समजले नव्हते.


मी १९७६ साली पोलीस सेवेत रुजू झालो व माझी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस महानिरीक्षक अशा पदांवर नेमणूक झाली. त्या प्रत्येक ठिकाणी मला हिंदू-मुस्लिम तणावाचा अनुभव आला. जातीय दंगली म्हणजे काय, त्या कशा होतात, कशा पसरतात, किंवा पसरवल्या जातात याचा अनुभव येऊ लागला. ज्यावेळी जातीय तणाव होत असे किंवा जातीय दंगली होत असत त्या वेळी मी त्यांच्याकडे फक्त पोलिसांच्या दृष्टीने न पाहता सामाजिक दृष्टीने पाहत असे व या दंगली कशा उद्भवतात, त्यांचा कोणाला फायदा होतो, त्याचे राजकीय परिणाम व सामाजिक परिणाम काय होतात वगैरे बाबींचा मी अभ्यास करीत असे.


अनेक शहरातील अनेक जातीय घटनांचा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आले की, जातीय दंगली या अचानक उद्भवत नाहीत, किंवा आपोआप पसरत नाहीत. त्यासाठी एक गट सतत कार्यरत असतो व तो गट म्हणजे ब्राम्हण्यवादी गट. हे लक्षात आले की, हे ब्राम्हण्यवादी लोक खोटा इतिहास लिहून आरएसएसच्या शाखांमधून खोटा प्रचार करुन व वर्तमानपत्रात खोट्या बातम्या देऊन हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करतात व तो धुमसत ठेवण्याचा सतत प्रयत्न करतात व एखादी जातीय दंगल झालीच तर त्याच्या भडक बातम्या देऊन ती लवकरात लवकर आटोक्यात येणार नाही, उलट इतरत्रही पसरेल असा प्रयत्न करतात. हा फक्त माझाच अनुभव नव्हता तर देशात ज्या ज्या मोठमोठ्या दंगली झाल्या व त्यांच्या ज्या न्यायालयातील चौकशी झाल्या त्यांमध्ये सुद्धा ही बाब अधोरेखित झाली होती.


मग मी विचार करु लागलो की ब्राम्हणवादी मुसलमानांचा इतका द्वेष का करतात? ते मुसलमानांच्या इतके विरुद्ध का आहेत? मुघल कालीन व मध्ययुगीन इतिहासात यासंबंधीचे एखादे कारण सापडते ते काय पाहण्यासाठी मी त्या काळातील मुस्लिम व ब्राम्हण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करु लागलो. तेव्हा हे लक्षात आले की, त्या काळात ब्राम्हण मुस्लिमांचा द्वेष करीत नव्हतेच उलट त्यांचे मुस्लिमांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. बहुतेक मुघल राजांच्या दरबारात प्रमुख सल्लागार ब्राम्हणच होते. अकबराच्या नऊ रत्नांपैकी आठ रत्ने ब्राम्हण होती. इतकेच नव्हे तर औरंगजेबच्या दरबारातही अनेक ब्राम्हण सरदार होते. त्यांपैकी कोणीही मुस्लिम राजवटींविरुध्द बंड पुकारल्याचे उदाहरण नाही. उलट मुघल बादशहाचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी ते मनापासून प्रयत्न करत होते. अगदी शेवटचा मुघल बादशहा बहादुर शहा जफर यांच्या काळापर्यत ब्राम्हणांचे मुघलांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. १८५७ च्या बंडाच्या वेळी तात्या टोपे, झांशीची राणी वगैरे ब्राम्हणांनी बहादुर शाह जफरला आपला राजा म्हणून घोषित केले होते. म्हैसुरच्या टिपू सुलतानाचे प्रमुख सल्लागार ब्राम्हणच होते.


मग ब्राम्हण मुसलमानांच्या उलट का झाले व कधीपासून याचा मी विचार करु लागलो. त्याचे उत्तर मला महात्मा ज्योतीराव फुले यांच्या परिवर्तनवादी चळवळीत सापडले. महात्मा फुलेंनी जनजागृती करण्यापूर्वी हिंदु समाजातील शुद्र व अतिशुद्र यांची अशी समजुत होती की,त्यांचे जे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण आहे व त्यांना ज्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत त्यासाठी त्यांचे पूर्व जन्मीचे पाप कारणीभूत आहे व पुढील जन्मी जर त्यांना असे कष्ट व हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, त्या हाल अपेष्टा नको असतील तर त्यांना धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत व कर्तव्य करीत राहिले पाहिजे. धर्मग्रंथ हे ईश्‍वर निर्मित आहेत अशी ब्राम्हणांनी त्यांची समजूत करुन दिली होती, त्यामुळे आपण जर त्याप्रमाणे वागलो नाही तर, आपल्यावर देवाचा कोप होईल अशी त्यांना भीती वाटत होती. या धर्मग्रंथाप्रमाणे ब्राम्हणेत्तरांना शिक्षण घेण्याचा व धनसंचय करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे ते शिक्षण घेत नव्हते, किंवा व्यापार उद्योग करीत नव्हते. परिणामत: शुद्र व अतिशुद्र पिढयानपिढ्या मागास राहिले.


१९ व्या शतकाच्या पूर्वी म्हणजे महात्मा फुलेंच्या पुर्वी सुध्दा काही समाज सुधारक होऊन गेले. पण ते जातीय व्यवस्थेच्या चौकटीत राहूनच समाजामध्ये सुधारणा करायचा प्रयत्न करायचे. महात्मा फुले हे पहिले समाज सुधारक होते की ज्यांनी ही चौकट तोडली व जातीव्यवस्थेच्या बाहेर जाऊन जनतेची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.त्यांनी जनतेला पटवून दिले की, पूर्वजन्मानंतरचा जन्म असे काही नाही, तुम्हाला या जन्मात जो त्रास, हाल, अपेष्टा आहेत त्याला तुमचे पूर्व जन्मीचे पाप कारणीभूत नसून त्यासाठी ही विषमतावादी व अन्याय करणारी, ब्राम्हण्यवादी व्यवस्था कारणीभूत आहे. हे धार्मिक ग्रंथ देवाने लिहिले नसून ते ब्राम्हणांनीच लिहिले आहेत व ते त्याद्वारे तुम्हाला हजारो वर्षापासून मागासलेपणात ठेवत आहेत. आपल्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अनेक पुस्तके, गाणी, पोवाडे वगैरे लिहिले, गावोगावी जाऊन सभा व बहुजन समाजाचे मोठे मेळावे घेतले.


महात्मा फुलेंचे विचार हळूहळू लोकांना पटू लागले व त्याचा महाराष्ट्रात व दक्षिणेकडे जोरदार प्रचार व प्रसार होऊ लागला. सत्यशोधक समाजाचा जसा प्रचार व प्रसार होऊ लागला तशी देशभरातील ब्राम्हणांत विशेषत: महाराष्ट्रातील ब्राम्हणांत घबराट पसरली. इंग्रज भारतातून निघून गेले तर बहुजनांच्या हाती सत्ता जाईल व ते आपल्यावर सुड उगवल्याशिवाय राहणार नाहीत अशी भीती त्यांना वाटू लागली. या भीतीमुळे ग्रामीण भागातील ब्राम्हण शहरात जाऊ लागले. बहुतेक पुण्याला आले व पुण्याच्या ब्राम्हणांनी त्यांना आश्रय दिला, आसरा दिला. 


पुण्यात प्रमुख ब्राम्हण नेत्यांच्या सतत बैठका होऊ लागल्या व यातून मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरु झाली. अनेक बैठकानंतर ब्राम्हण वर्गातील काही नेत्यांच्या डोक्यातून एक अफलातून कल्पना सुरु झाली. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळींपासून बहुजनांचे लक्ष विचलित करण्याचा व बहुजनांच्या रोषापासून वाचण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करुन देशात हिंदू-मुस्लिम दंगल घडवून आणणे. सर्व ब्राम्हण नेत्यांना ही कल्पना पटली व त्याप्रमाणे ते कामाला लागले. प्रबोधनकार केशव ठाकरेंच्या मते, टिळकांनी १८९२ पासून जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला त्यामागे हेच मुख्य कारण होते. 


१८९२ ते १८९३ सालातील केसरी व मराठाच्या अंकातील टिळकांचे लेख पाहिले असता प्रबोधनकारांच्या म्हणण्याला पुष्टी मिळते. कारण या वर्तमानपत्रातून टिळक गणेशोत्सव मिरवणुकीच्या वेळी मशिदी पुढे वाद्य वाजविण्यासाठी हिंदू तरुणांना चिथावणी देत होते. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. १८९३ मुंबई मध्ये गणेशोत्सवाच्या काळात एक छोटी हिंदू- मुस्लिम दंगल झाली. टिळकांनी केसरीमध्ये या दंगलीच्या इतक्या भडक बातम्या दिल्या की त्याचा परिणाम म्हणून पुण्यात फार मोठी दंगल झाली व त्यामध्ये १६० लोक मृत्युमुखी पडले. ही ठरवून केलेली नियोजित दंगल होती. या पुण्यातील दंगलीला भारत देशातील पहिली नियोजनबद्ध दंगल म्हणता येईल.


यापूर्वी देशात हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या नव्हत्या असे नाही. संपूर्ण देशात कित्येक शतकात फक्त ८ मोठ्या दंगली झाल्या होत्या. पण १८९३ ची पुण्याची दंगल ही ठरवून केलेली दंगल होती. पण त्या तत्कालीन कारणावरुन झाल्या होत्या. त्या घटना त्या दंगल घडलेल्या भागापुरत्याच मर्यादित राहिल्या होत्या. पण १८९३ साली घडवून आणलेली दंगल ही नियोजित होती.  ती आटोक्यात येऊ नये व त्याचा इतरत्र प्रसार व्हावा म्हणून ब्राम्हण्यावादी वर्तमानपत्रे जाणीपूर्वक प्रयत्न करीत होती. 


अशा दंगलींचा ब्राम्हणांनी अपेक्षा केल्याप्रमाणेच परिणाम होऊ लागला व सर्व सामान्य लोक हजारो वर्षापासून ब्राम्हण्यवाद्यांनी केलेला अन्याय विसरुन मुसलमानांना आपला शत्रू मानू लागले. बहुजनांना या विषयाचा विसर पडू नये म्हणून ब्राम्हण्यवादी प्रत्येक ६ ते ८ महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी अशा दंगली घडवू लागले व त्यांना आपल्या वर्तमानपत्रामधून भडक प्रसिद्धी देऊ लागले. त्यामुळे त्या आटोक्यात न येता पसरु लागल्या. महाराष्ट्रा शेजारच्या राज्यात ही गणेशोत्सवाच्या काळात हिंदू-मुस्लिम दंगली होऊ लागल्या. कारण टिळकांनी गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश वगैरे राज्यांत जाऊन सार्वजनिक गणपती उत्सव सुरु करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते.


अशा दंगली होत असताना ब्राम्हण्यवादी नेत्यांच्या लक्षात आले की, दंगलीमुळे फक्त बहुजनांचे लक्ष ब्राम्हण्यावाद्यांच्या षड्यंत्रापासून दूर जाते असे नाही तर एससी व बहुजन तरुण ब्राम्हणवाद्यांच्या मागे येतात. त्यांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बाब होती. त्यांचा त्यांनी संपूर्ण फायदा करुन घेतला. त्यांनी १९२५ मध्ये आरएसएसची स्थापना करुन त्यांच्या हजारो शाखाद्वारे मुस्लिम द्वेष पसरविण्याचे काम केले. तसेच त्यांनी हिंदू-मुस्लिमांचा खोटा इतिहास लिहून बहुजन तरुणांना भडकविण्याचे काम केले.

एस.एम.मुश्रीफ
राज्याचे माजी पोलिस महानिरीक्षकPAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बेंबी तट्ट फुगली तरी विदेशी भटा-ब्राम्हणांसाठी मध्य प्र
खोकला, तापावरील १४ औषधांवर सरकारची बंदी!
बालासोर रेल्वे अपघाताच्या ठिकाणी ‘कवच’ संरक्षण यंत्रणा
आता कोल इंडियावर खासगीकरणाची आफत
जे जे रूग्णालयातील ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे
ईव्हीएम घोटाळ्यावरील चर्चेला डायव्हर्ट करण्यासाठी कें
भाजपा ईव्हीएम मॅनेज करते
‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘द केरला स्टोरी’ संघाचा सरळ अजे
चिंताजनक: राज्यात २४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य, ६० हजार श
वृत्तपत्रात जाहीरात न देण्यासाठी राजकीय पक्षांवर बडगा
महाराष्ट्रातून रोज सरासरी ७० मुली बेपत्ता, तीन महिन्यात
बीएमपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेन्द्र प्रताप सिंग यांच
पाटणा उच्च न्यायालयाची जातनिहाय सर्वेक्षणाला स्थगिती
उद्धव ठाकरे शेंडी-जानव्याचा उल्लेख करत असल्याने अल्पसं
छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण!
आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथा, पांढरपेशे असा उल्ल
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या भारत बंदने शासक वर्गाच
केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारविरोधात राष्ट्रीय पिछडा व
बरेच न्यायाधीश आळशी, वेळेवर निकाल लिहित नाहीत
ब्राम्हणांना महात्मा फुले यांच्या नावाची भीती का वाटते?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper