×

ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे नसून बुद्धीस्ट स्थळ

Published On :    22 May 2022  By : MN Staff
शेयर करा:


२५ मे भारत बंदच्या मुद्यावरील लक्ष्य विचलित करण्यासाठी मशीद- मंदिराचा वाद समोर- वामन मेश्राम यांचा दावा





सातारा:  ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे स्थळ नाही. ब्राम्हणांचे मंदिर तेथे नव्हते. हे बुद्धीस्ट स्थळ आहे. त्यामुळे ब्राम्हण आणि मुघलांनी मिळून ते बनवले असा दावा करतानाच २५ मे च्या भारत बंदच्या मुद्यावरील लक्ष्य विचलित करण्यासाठी मशीद- मंदिराचा वाद समोर आणण्यात आला आहे असे बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी स्पष्ट केले. 


राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा (ओबीसी) वर्ग मोर्चा यांचे संयुक्त विद्यमाने बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनार्थ बहुजन महापुरुष, महामाता जीवन संदेश अभियानांतर्गत राजवाडा चौपाटी, सातारा येथे विशाल प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.


वाराणसी मशिदीसंदर्भात एक खास बात मी तुम्हांला सांगत आहे. यावर विचार करण्याची गरज आहे. जे ब्राम्हण आज मुस्लिमांसोबत भांडण करत आहेत की आमच्या मंदिरावर ही मशीद बनवण्यात आली आहे. तर ब्राम्हणांनी अर्ध्या मंदिरावर मशीद बनवण्यासाठी वेळ का घालवला? मौलाना प्रश्‍न आहे की नाही? लक्ष्मणराव...! अर्ध्या भागावर ब्राम्हणांनी मंदिर बनवले, अर्ध्या भागावर मशीद बनवण्यासाठी परवानगी का दिली? तुमच्या वारसदारांनी ते का केले? तुमच्या वारसदारांनी ती चूक केली असेल तर काही कारण असेल? त्या आधारावर तुम्ही त्या बाबीशी सहमत झालात? असा सवाल मेश्राम यांनी उपस्थित केला.


मेश्राम यांनी पुढे बोलताना सांगितले की, माझे म्हणणे असे आहे, माझ्याजवळ बाबरी मशीदीसंदर्भात पुरातत्व विभागाचा सर्व्हे रिपोर्ट आहे. पुरातत्वीय सर्व्हे रिपोर्ट अनेक लोकांना कमी समजून येतो. भारतीय पुरातत्व विभाग सांगतो की, बाबरी मशीदीच्याखाली जे सापडले आहे ते सारे पुरावे बुद्धांशी संबंधित आहेत. माझ्याकडे लिखीत आहे, पुरातत्वीय विभागाचा रिपोर्ट आहे. पुरातत्व विभागाने खोदल्यानंतर हे बौद्धस्थळ असल्याचे त्यांनी मान्य केले. पुरातत्वाचा पुरावा म्हणजे फायनल असतो. जेवढी मोठमोठी मंदिरे भारतात आहेत, एकदेखील ब्राम्हणांचे नाही. मोठ्या प्रमाणात खोदाई केल्यास सारे पुरावे बुद्धांशी संबधित सापडतील असा दावाही मेश्राम यांनी केला.


दुसरी महत्वूपर्ण बाब, वाराणसीपासून ७ कि.मी अंतरावर सारनाथ आहे. सारनाथमध्ये बुद्धांनी सर्वात पहिले प्रवचन केले. ‘चरथ भिक्खवे चारिकमं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, अत्तानु हिताय, लोकानु कंपाय, आदी कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण’ हे बुद्धांचे पहिले प्रवचन सारनाथमध्ये झाले. कुठल्याही मशिदीशी संबंधित ज्ञानव्यापी जोडलेला नाही, परंतु ज्ञानाशी जोडलेला शब्द भारताच्या कुठल्याही मशिदीशी जोडलेला आहे का? असे उदाहरण कुणी सांगेल का? तसे असेल तर सांगा. म्हणून मी सांगतोय, ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे स्थळ नाही. ब्राम्हणांचे मंदिर तेथे नव्हते. हे बुद्धीस्ट स्थळ आहे. त्यामुळे ब्राम्हण आणि मुघलांनी मिळून ते बनवले. मोठे विधान करत आहे. पहिले अशाप्रकारे कुणी विधान केलेले नाही. मी ते साबीत करू शकतो, असे आव्हानही मेश्राम यांनी दिले. 


दुसर्‍यांदा सांगतो, हे समजण्यासाठी थोडासे मुश्कील आहे. मुसलमान वेगळे आणि मुघल वेगळे आहेत. मुघल वंश आहे. मुसलमान ज्याला म्हणतात, जो कुराणाला मानतो. मुघल वंश आहे. त्यांनी आपल्या कालखंडात बुद्धीस्ट स्थळावर मुघलांनी जे काही केले, त्याला ब्राम्हणांचे समर्थन होते, मुघल आणि ब्राम्हणांनी मिळून मशीद व मंदिर बनवले. पुरातत्व विभागाला बाबरी मशीदीच्या खाली जसे बुद्धीस्ट स्थळ सापडले तसेच ज्ञानव्यापी मशीदीची खोदाई केल्यास बुद्धांशी संबंधित बाबी सापडतील असा मला विश्‍वास वाटतो.


दुसरी बाब टिव्हीवर शिवलींग म्हणून सांगितले जाते, पाण्याच्या फवार्‍याच्या आत शिवलींग असल्याचे भारतात उदाहरण सापडणार नाही. तिसरी बाब वरचा जो भाग आहे तेथून पाणी वर येते फवार्‍यात, तर तो फवारा बंद करण्यासाठी लाकडाचे बूच मारण्यात आले आहे. लिंगमध्ये कधी बूच मारले जाते का? लिंगमध्ये बूच मारण्यात आले आहे, आपण पाहू शकता. लाकडाचे चार तुकडे आहेत, तेथे बूच मारण्यात आले आहे. असे कुठलेही उदाहरण नाही. 


अशाप्रकारे जे मुद्दे हायलाईट करत आहेत, त्यामागे मोठे कारण आहे. मोठे कारण कुठले आहे तेदेखील मी सांगत आहे. २५ मे रोजी भारत बंद आहे. भारत बंदचा मुख्य मुद्दा ओबीसीची जातनिहाय जनगणनेचा आहे. एससी, एसटी, ओबीसीचे लक्ष्य विचलित करण्यासाठी हा मुद्दा उठवण्यात आला आहे. भारत बंदच्या मुद्याकडे लोकांचे लक्ष्य जावू नये यासाठी हा मुद्दा त्यांनी रेटला आहे. भारत बंदच्या नंतर मशीदी संबंधित जे मुद्दे आहेत ते सारे थंड पडतील. कारण भारत बंदची तारीख समाप्त झालेली असेल. आपण पाहू शकता, मी पहिल्यापासून सांगत आहे. आम्ही दोनदा भारत बंद केला आहे हे त्या लोकांना माहित आहे. याचा अर्थ आमच्याकडे ताकद आहे असे मेश्राम यांनी सांगितले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबुद्ध भारताला हिंदुस्थान बनवू नका
बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण, त्यांच्यावर चां
११ दोषींची सुटका करणार्‍या समितीत भाजपचे ४ सदस्य
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीक
विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देत
लखीमपूर खेरी येथे संयुक्त किसान मोर्चाचे धरणे आंदोलन
२०२१-२२ मध्ये भारताने चीनकडून केली ७ लाख कोटींची आयात
बामसेफचे उद्या मराठवाडा विभागीय संमेलन
तामिळनाडू-महाराष्ट्रासह १३ राज्यांनी ५ हजार कोटींची थक
राष्ट्रभक्तीचा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस
ऍलोपॅथी आणि कोविड-१९ च्या उपचारांबाबत जनतेची दिशाभूल कर
भाजपा नेते शहानवाज हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
भारतातील अनुसूचित जाती आणि चीनमधील उइगुर गुलामीच्या वि
भारतात २७ कोटी लोक दारिद्रयरेषेखाली व २२ टक्के लोक गरिबी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२० मधील ३६ तासांच्या भारत दौर्
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून ईव्
राज्यांची धोरणे काय असावीत हे ठरवणारे तुम्ही कोण?
पीएम २.५ प्रदूषणामुळे २०१९ मध्ये दिल्लीत प्रति एक लाख लो
सैन्य भरतीसाठी ‘अग्नि’ परीक्षा देताना तरुण मैदानात कोस
राज्यात ४५ दिवसांत १३७ शेतकर्‍यांची आत्महत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper