×

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा पुन्हा एकदा बोजा

Published On :    4 May 2021  By : MN Staff
शेयर करा:


सर्वसामन्य ग्राहक व वाहतूकदारांचे मोडणार कंबरडे





नवी दिल्ली:  देशात पाच राज्यांच्या निवडणुका संपताच केंद्र सरकारने पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेल दरवाढीचा बोजा टाकला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक व वाहतूकदारांचे कंबरडे मोडणार आहे.विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच सरकारी कंपन्यांनी इंधनाच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.


पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत या आधी २७ फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात २४ पैसे तर डिझेलच्या दरात १७ पैशांची वाढ झाली होती. आता दोन महिन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत दिल्लीमध्ये १५ पैसे आणि डिझेलच्या किंमतीत १८ पैसे प्रती लीटर वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या बाजारात पेट्रोलचा दर ९०.५५ रुपये तर डिझेलचा दर ८०.९१ रुपये झाला होता.


देशात निवडणुकांचा काळ असल्याने गेल्या ६६ दिवसांत कच्चे तेल महागले तरीही पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ झाली नव्हती. मात्र, याच काळात कच्च्या तेलाच्या किंमती जेव्हा जेव्हा कोसळल्या तेव्हा चारवेळा पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. यामुळे पेट्रोल ७७ पैशांनी स्वस्त झाले होते.


कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या आठवड्यात मोठी वाढ पहायला मिळाली. यामुळे कच्चे तेल गेल्या सहा आठवड्यांच्या किमतीपेक्षा जास्त वाढले होते. मात्र, शेवटच्या दिवशी डॉलर मजबूत होणे आणि ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याची घोषणा केल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घट दिसून आली.


पेट्रोल-डिझेलचा खप ११८ कोटी टनांनी घटला; उद्योग, पर्यटन, कॅब वाहतूक घटल्याने फटका

टाळेबंदीमुळे मालवाहतूक, पर्यटन, कॅब वाहतूक याला मोठा फटका बसला. त्यामुळे गेल्या वर्षभरात डिझेलची मागणी १२ आणि पेट्रोलची मागणी सात टक्क्यांनी घटली आहे. डिझेलची मागणी ९८ लाख ३३ हजार आणि पेट्रोलची मागणी २० लाख २४ हजार टनांनी घटली आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत आर्थिक वर्षात  १ कोटी १८ लाख ५७ हजार टनांनी घट झाली आहे.


पेट्रोलियम मंत्रालयाच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. इंधनाच्या मागणीत प्रथमच इतकी घट झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली. जवळपास दीड महिना देशातील व्यवहार ठप्प होते. विविध राज्यांनी जिल्हाबंदी अथवा जिल्हा अंतर्गत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीचा भडका कायम
छत्रपती शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार, पुणे विद्यापीठात
मराठ्यांच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचा
कोरोना काळात भारतातील श्रीमंतांनी २० हजार ७०० कोटी स्वि
पतंजलीचे रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल
राजकीय आरक्षणावर चिंतन करताना शैक्षणिक आणि सर्व्हीसमधी
कर चुकवण्यासाठी ७ हजार श्रीमंत भारतीय झाले दुसर्‍या देश
कोट्यवधींवर बेरोजगारीची कुर्‍हाड
कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची
शिक्षण, नोकर्‍यातील आरक्षण संपले तरी चालेल, राजकीय आरक्ष
एक लाख चाचण्यांचे कंत्राट मिळालेल्या कंपनीचे अस्तित्व
आयटी क्षेत्रातील ३० लाख भारतीयांच्या नोकरीवर येणार गदा
विविध आरक्षणावरून राज्यात एससी, एसटी, मराठा-ओबीसींमध्ये
आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?
मराठा मोर्चे पुन्हा एकदा आरएसएस व भाजपाच्या दावणीला?
कोरोना काळात काम करूनही राज्य सरकारने फुटकी कवडीही दिली
लोकांच्या जीवाशी खेळ: कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर वाढवि
राजस्थानात वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड स्थापन होणार
८० लाख लोकांचे १० हजार टन धान्य सडवले परंतु गरीबांना वाट
मराठा आरक्षणासाठी राणे समिती नेमून चूक केली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper