×

भाकरीपेक्षा स्वाभीमानाला महत्व द्या-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Published On :    6 Apr 2021  By : MN Staff
शेयर करा:


डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी माझ्या आयुष्याची ५५ वर्षे जर सरकारी नोकरीत असतो, तर मला आता सेवानिवृत्ती होणे भागच पडले असते. परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव धेय्याखातीर बड्या पगाराच्या नोकर्‍या नाकारल्या आहेत.





डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी माझ्या आयुष्याची ५५ वर्षे जर सरकारी नोकरीत असतो, तर मला आता सेवानिवृत्ती होणे भागच पडले असते. परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव धेय्याखातीर बड्या पगाराच्या नोकर्‍या नाकारल्या आहेत. हे सांगत असतांना पुढे बाबासाहेब म्हणाले, इकॉनॉमिक्स विषयातील परदेशातील पदवी घेऊन भारतात परतलेला मी केवळ अनुसूचित जातीमधूनच नव्हे, तर संपूर्ण भारतातून पहिला होतो. 


मुंबईत पाय टेकताच मुंबई सरकारने मला राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापकपद स्वीकारण्याची विंनती केली. मी जर ती मान्य केली असती तर आज मला लठ्ठ पगार मिळाला असता. पण मी ती नाकारली. कारण सरकारी नोकर व्हायचे म्हणजे आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी काम करायच्या तुमच्या इच्छेवर स्वाभाविकच मर्यादा पडतात. त्यानंतर पुन्हा मी पुढील शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेलो. तेथून पात्रता संपादन करून आल्यावर पुन्हा मला जिल्हा न्यायाधीशाचे पद देऊ करण्यात आले. 


तीन वर्षात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमण्याचे आश्वासनही त्यासोबत दिलेले होते. त्यावेळी मला धड शंभर रुपयेही मिळत नव्हते. अत्यंत गरीब लोकांसाठी बांधलेल्या चाळीतील एका खोलीत मी तेव्हा राहत होतो. तरीही मी तो देकार नाकारला. जर मी ती नोकरी केली असती, तर सुखवस्तूपणाची हमी मिळाली असती. पण माझ्या सहबांधवांच्या कल्याणाचे व उन्नतीचे प्रयत्न करण्याचे माझ्या आयुष्याचे ध्येय सफल करण्याच्या मार्गात त्या नोकरीमुळे अडथळे उत्पन्न झाले असते. या एकाच करणाने मी नकार दिला.


१९४२ साली पुन्हा माझ्यासमोर एक पर्याय आला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी माझी नियुक्ती होऊ घातली होती. ती झाली असती तर मी आर्थिकदृष्ट्या तर श्रीमंत झालोच असतो, शिवाय दहा वर्षानंतरच्या सेवेनंतर मी सुखाची जिंदगी जगली असती. पण माझ्या लहानपणापासून जेव्हा मला आयुष्याचा अर्थ समजू लागला, तेव्हापासून मी जीवनाचे एक तत्व सतत अनुसरत आलो. ते म्हणजे माझ्या समाज बांधवांची सेवा करण्याचे. एव्हढेच लक्ष मी कधीच दुसर्‍या प्रश्नाकडे दिले नाही. माझ्या समाजाचे हितसंबंध मला सुरक्षित केलेच पाहिजेत. माझ्या आजवरच्या आयुष्याचे तेच ध्येय होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात जेंव्हा माझा मुलगा राजरत्नचा मृत्यु झाला होता, तेंव्हा कांही लोक माझ्याकडे येऊन  राजरत्नला ‘कफन’ आणायला पैसे मागायला आले होते. पण माझ्याकडे स्वत:च्या मुलाला कफन विकत आणण्यापूरते सुध्दा पैसे नव्हते. शेवटी माझी पत्नी, रमाबाईने, आपल्या स्वतःच्या अंगावरील साडीचा एक पदर फाडून दिला आणि मग आम्ही  राजरत्नला त्यामध्ये गुंडाळून स्मशानात घेऊन गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी जेवढी गरीबी अनुभवली आहे, तेवढी गरीबी कदाचित भारतातील एकाही नेत्याने अनुभवली नसेल.


मी गरीब असूनही कधी गरीबीचे कारण सांगून माझा स्वाभिमान व माझे आंदोलन कधीच कमी पडू दिले नाही. एवढी गरीबी असूनही मी पैशासाठी विकलो गेलो नाही आणि यापुढील आयुष्याचेही तेच ध्येय राहणार आहे आणि हेच ध्येय प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रत्येक रक्ताच्या माणसांसाठी काम करीतच रहावे.


प्रत्येकाने आपल्या समोर एकच धेय बनवा आणि आपल्या बांधवाना एकत्रीत करा. कारण तुम्ही एकत्र आल्याशिवाय तुम्ही कोणालाही लढा देऊ शकत नाहीत. कारण एकीचे बळ हे कोणीही जगात मोडू शकत नाही. म्हणून खूप शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा. गरीबीमुळे स्वाभिमान गहान टाकू नका.


इंग्लंडवरून भारतात डॉ.वेलबीचे एक कमिशन आले होते. या कमिशनने रूपयाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञाना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली, शेवटचे मत डॉ.बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर, मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते व संदर्भ ऐकली आहेत तेव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही! 


यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे. त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजून बाकी आहे. तो मीच पूर्ण करू शकतो ! हे ऐकून डॉ. वेलबी खाली उतरले बाबासाहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले. जगाने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले पण भारतात आजही त्यांचा फोटो पाहिल्यावर कित्येक  लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही शोकांतिका आहे.!!



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ऑडिट श्‍वासाचे:राज्यातील ९५ टक्के रुग्णालयांत ऑक्सिजन
स्टॅलिनने शेतकर्‍यांवर रणगाडे घातले; पण, मोदी शेतकर्‍या
विदर्भात बालमृत्यू वाढले, वर्षभरात ३५६ बालकांचा मृत्यू
कोरोनामुळे भारतात ३२ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर
५ जूनला बीडमध्ये भव्य मराठा आरक्षण मोर्चा
चक्रीवादळाची तीव्रता वाढली; गोव्यासह कर्नाटकला झोडपले
सीएए समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवण्याची शाळेची सक्ती
शाळा ही संकल्पना नष्ट होते की काय....?
सरकारने शेतकर्‍यांना मदतीची आशा दाखवून लुटले
मध्यवर्ती जातीच्या लोकांनी सार्‍या देशभरात आंदोलन केल
संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या मुक्ततेसाठी अभिया
फडणवीस सरकारकडून मराठा आरक्षणाची करण्यात आली होती केवळ
शौर्य,साहित्य आणि चारित्र्यसंपन्नतेचा आदर्श संघर्षयोद
३० वर्षांत लिटरमागे ८४ रुपयांची वाढ
नीरव मोदीच्या संपत्तीवर ११ जूननंतर टाच येणार
BRICS देशांमध्ये आरोग्यावर सर्वात कमी खर्च करणारा देश भारत
मराठा आरक्षणप्रश्‍नी फेरविचार याचिका
लसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्य
शेतकरी आंदोलनामुळे काही गावं झालीत कोरोना हॉटस्पॉट
भारतीय ऑक्सिजनसाठी तडफडत असताना ३३ कोटी देवतांपैकी एका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper