×

ओबीसींनो विचार करा... चिकित्सा करा... निष्कर्ष काढा आणि फरक सांगा

Published On :    23 Jan 2022
साझा करें:

भारतात रामायण महाभारतापासून सर्वच धर्म ग्रंथात साडेतीन टक्के असलेला ब्राह्मण समाज हा भिक्षा मागून जगणारा गरीब समाज दाखविला आहे. विशेष म्हणजे तो तेव्हाही आणि आजही ओबीसी म्हणजेच मागासवर्गीय नव्हे तर ओरिजनल बुद्धिस्ट समाजाकडून भिक्षा घेत होता व आहे.



भारतात रामायण महाभारतापासून सर्वच धर्म ग्रंथात साडेतीन टक्के असलेला ब्राह्मण समाज हा भिक्षा मागून जगणारा गरीब समाज दाखविला आहे. विशेष म्हणजे तो तेव्हाही आणि आजही ओबीसी म्हणजेच मागासवर्गीय नव्हे तर ओरिजनल बुद्धिस्ट समाजाकडून भिक्षा घेत होता व आहे. कर्मकांड व्रतवैकल्ये पूजापाठ धार्मिक विषयात ओबीसी भरडला जातो आणि आपला पैसा कुठं खर्च करावा याचे आर्थिक नियोजन कोलमडून जाते यावर विचार करण्याची नितांत गरज आहे. महात्मा जोतीबा फुले यांच्या विचारातील ईश्‍वर म्हणजे निर्मिक म्हणजे सत्य व वास्तव परिस्थितीत जगणे ओबीसींनी स्वीकारले नाही.


इतिहासात लोकसंख्येच्या बळावर सर्वच राजे होऊन गेले. हा इतिहास भिक्षा मागणार्‍यांनी बदली केला. ओबीसींना बेसावध ठेऊन रात्री उशिराने हल्ले करून, घरांना शेतमालाने भरलेल्या कुडबा, कुटार, धान्य ठेवलेल्या गोठ्यांना वाड्यांना आगी लावून भयभीत केले. नंतर भिक्षा मागताना त्यांना देवा धर्माची पाप-पुण्याची भिती दाखवून संकटात सापडलेल्याची माहिती दिली, आणि उपाय म्हणून पूजा अर्चा,उपास,दानधर्म आणि अकरा,एकवीस ब्राह्मणांना भोजन दानासाठी शिधा दिल्यास भविष्यात संकट येणार नाही यांची हमी दिली आणि स्वतःची रोजगार हमी योजना सुरू केली. तेव्हाच ओबीसी ओरिजनल बुद्धिस्ट समाज होता. भिक्षाकरांनी कामधंद्यानुसार विभागून टाकला. कारण इतिहास लिहणारेही तेच, वाचणारेही तेच आणि सांगणारेही तेच. महात्मा फुलेंनी ‘शेतकर्‍याचा आसूड’ लिहून सर्वच खोटे ठरविले ते आम्ही ओबीसींनी वाचले पाहिजे.


मातीचे काम करून मटके तयार करणारा कुंभार झाला, केस कापणारा नाभिक झाला, लाकडाला कापून शेतीसाठी लागणारे वस्तू बनविणारा सुतार झाला, घरातील सजावट करणारा सुतार कार्पेन्टर, विश्‍वकर्मा झाला. लोखंडी साहित्य बनविणारा लोहार झाला, सोन्याचे दागिने बनविणारा सोनार झाला. फुलांचा मळा करणारा माळी झाला, कडधान्यापासून तेल काढणारा तेली झाला, कपडे शिवून देणारा शिंपी झाला, कपडे धुऊन देणारा धोबी झाला, शेळी-मेंढी पाळणारा धनगर झाला, शेती करणारा कुणबी शेतकरी झाला, कडधान्य किराणा विकणारा वाणी झाला,ज्यांनी ज्यांनी जे काम करून उपजीविका चालवली त्यांना त्याच जातीचा बनवली म्हणूनच हिंदू धर्मात ओबीसी मागासवर्गीय जातीचा राज्य व देशात हजारो जाती पोट जाती निर्माण करण्यात आल्या. बुद्धांनी त्या संपविला होत्या पण कट-कारस्थान करून बुद्ध भिख्खूंवर हल्ले करून हत्याकांड करून संपविण्यात आले होते, हा सत्य इतिहास आहे. ओबीसींनो विचार करा.. चिकित्सा करा निष्कर्ष काढा आणी फरक सांगा. धर्माची विषमतावादी व समतावादी समाज व्यवस्था म्हणजे काय?


समतावादी समाज व्यवस्था, मातृसत्ताक समाज व्यवस्था संपवून विषमतावादी पुरुषप्रधान समाज व्यवस्था जातीवादी समाज व्यवस्था म्हणजेच वर्णव्यवस्था निर्माण करण्यात आली, त्याला ब्रिटिश सरकारने, इंग्रजांनी सुरुंग लावला.त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले,रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,डॉ.पंजाबराव देशमुख, दिनकरराव जवळकर,केशवराव जेधे, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज असे अनेक संत ओबीसी समाजात जन्मले त्यांनी विषमतावादी समाज व्यवस्था तोडण्याचे काम केले.त्यांना प्रबोधनासाठी संघर्ष करावा लागला.तरी बहुसंख्य ओबीसी कर्मकांड व्रतवैकल्ये पूजापाठ या धार्मिक गुलामगिरीत जखडून गेला आहे.


आपला पैसा कुठं खर्च करावा आणि गुंतवावा याचे कोणतेही भान ओबीसींना नसल्यामुळे  सर्वच नियोजन कोलमडून पडले आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज आहे. जोतीबा फुले यांच्या विचारातील ईश्‍वर म्हणजे निर्मिक हे सत्य व वास्तव समजून घेतले नाही. तो इतिहास ओबीसी जातीच्या प्रत्येक उच्चशिक्षित डॉक्टर,वकील,प्राध्यापक, इंजिनिअर,आर्ट,सायन्स,कॉमर्सच्या पदवीधर सुशिक्षितांनी डोळसपणे वाचला पाहिजे. ओबीसींनो विचार करा,चिकित्सा करा,निष्कर्ष काढा आणि फरक सांगा धर्माची विषमतावादी व समतावादी समाज व्यवस्था म्हणजे काय? आरक्षण शिक्षण,नोकरी,रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व कोणा-कोणाला का दिले जाते आणि का दिले पाहिजे.


आज देशात ओबीसीची एकूण लोकसंख्या लक्षात घेऊन सामाजिक विकासाचा अजेंडा कागदावर असून सुध्दा त्याचा उपयोग ओबीसी समाजाला का होत नाही. सामाजिक विकासात्मक अजेंडा म्हणजे वधुवर परिचय मेळावा,लग्न समारंभ,सदिच्छा भेटीगाठी इत्यादी कार्यक्रम नव्हे.वाढदिवस व लग्नाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा म्हणजे समाजाचा विकास झाला असा होत नाही.ओबीसी समाजात विषमतावादी आणि समतावादी विचारांची जनजागृती करणे म्हणजे समाज जागृती निर्माण करणे होय.ओबीसींनो विचार करा,चिकित्सा करा,निष्कर्ष काढा आणि फरक सांगा धर्माची विषमतावादी व समतावादी समाज व्यवस्था म्हणजे काय? आरक्षण शिक्षण,नोकरी,रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व कोणा-कोणाला का दिले जाते आणि का दिले पाहिजे.


सामाजिक वैचारिक आंदोलनात्मक कार्यक्रमाचे नियोजन आणी आयोजन कोणी केले पाहिजे,नेतृत्व कोण करेल? भूमिका कोण मांडेल,संघटनात्मक जबाबदारी कोण स्वीकारेल? साधने कसे उपलब्ध होतील,आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन दळणवळण,वाहन,प्रचार, प्रसार करण्यासाठी काय नियोजन करावे लागेल. कोण कोण करेल? समाजात तळागाळातील,उपेक्षित,गरीब आर्थिक दृष्टीने कमकुवत,खेड्यातील सर्वसामान्य समाज बांधवांना तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभारणी आणि नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याशिवाय तो कसा जोडला जाईल. त्यासाठी आवश्यक असते संबंधित सर्वांगीण विकासासाठी किती प्रयत्न केले आहे, त्याचा परिणाम किती प्रमाणात झाला. त्याची जोपर्यत माहिती समाजाला सत्य स्वरूपात सत्यात दिसणार नाही. समाजात विविध प्रकारची समाज जागृती, समाज प्रबोधन करणे ही सामाजिक जबाबदारी समाज नेतृत्वाची असते जेणेकरून समाज वैचारिक दृष्टीने परिपक्व घडवून आणला जाईल त्यासाठी ओबीसी नेत्यांनी जागृती अभियान राबविणे गरजेचे असते.


कारण सर्वसामान्य समाज मनावर प्रभाव, प्राबल्य हे समाज नेत्यांचा पडतो, सर्वसामान्य समाज नेत्यांच्या अभ्यासपूर्ण ज्ञानाचा भुकेला असतो. समाज नेतृत्व हे ज्ञानसंपन्न व अभ्यासू असले पाहिजे तरच त्याचा पगडा समाज मनावर बसतो. विहिरीत नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार? रोपाला पाणी खत घातले तर ते झाड बनेल आणि नंतरच झाडाला विकासात्मक गोड फळं समाजाला दिसतील. विकासात्मक गोड फळं समाजाला चाखायला मिळणार. त्यासाठी जोपर्यत समाज संबंधित विकासात्मक अजेंड्यावर विश्‍वास ठेवणार नाही. त्यासाठी आवश्यक असते संबंधित विकासात्मक नियोजन बद्ध आराखडा. सत्यावर आधारित सत्य विकासात्मक आकड्याचा लेखाजोखा.ताळेबंद समाजा समोर जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता असते. टीका होतील,चुका काढल्या जातील हे लक्षात घेऊन रचनात्मक काम करावेच लागेल. ओबीसींनो विचार करा, चिकित्सा करा, निष्कर्ष काढा आणि फरक सांगा धर्माची विषमतावादी व समतावादी समाज व्यवस्था म्हणजे काय? आरक्षण शिक्षण, नोकरी,रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व कोणा-कोणाला का दिले जाते आणि का दिले पाहिजे.


जिथं सामाजिक विकासात्मक दृष्टीने पारदर्शकता वैचारिकता व नैतिकता या सर्व गोष्टीची प्रगल्भता असते तिथं सामाजिक विकासात्मक अजेंडा व लेखाजोखा समाजा समोर जाहीर करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण व भीती ठेऊन काम करू नये. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली तर ती सोडवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याची तयारी असल्यास कोणतीच अडचण निर्माण होत नाही असे मला वाटते.ओबीसींनो विचार करा, चिकित्सा करा, निष्कर्ष काढा आणि फरक सांगा धर्माची विषमतावादी व समतावादी समाज व्यवस्था म्हणजे काय? आरक्षण शिक्षण,नोकरी,रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व कोणा-कोणाला का दिले जाते आणि का दिले पाहिजे.
 
प्रमोद सूर्यवंशी
८६०५५६९५२१  

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
महागाईने होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकार अजून एक धक्का
निवडणुका तूर्त ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविनाच!
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा उद्या भारत बंद, बामसेफसहि
५ वर्षांत सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार
ज्ञानवापी मशीदीत शिवलींग नसून तो कारंजा आहे
केतकी चितळे पुन्हा वादात
राज्यातील ४५५ गावांना ४०१ टँकरने पाणीपुरवठा
२५ मे भारत बंदला रोखण्यासाठी ब्राम्हणवाद्यांकडून हनुमा
कोरोना काळात जगात दर ३० तासांनी एका अब्जाधीशाचा उदय, तर द
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत २७ मे रोजी सर्वपक्षीय ब
अनधिकृत शाळांचे फुटले पेव
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, मुस्लिमांना केले जातेय टा
यूएपीएची तरतूद देशद्रोहापेक्षा धोकादायक
मध्य प्रदेशात २९ आणि राजस्थानमध्ये दररोज १४ मुले हरवतात
टुकार अभिनेत्री केतकी चितळेच्या जामीन अर्जावर २६ तारखे
ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे नसून बुद्धीस्ट स्थळ
ज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ
ज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका
कर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा
कोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper