×

कोरोना काळात भारतातील श्रीमंतांनी २० हजार ७०० कोटी स्विस बँकेत टाकले

Published On :    18 Jun 2021
साझा करें:

१३ वर्षांचा विक्रम मोडला, भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठे झटके



बसेल: कोरोना काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठे झटके बसले, मात्र भारतातील श्रीमंतांवर याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. कारण याच काळात अनेक भारतीय श्रीमंतांनी स्विस बँकेत मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले आहेत. या पैशांची रक्कम इतकी आहे की मागील १३ वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. गुरुवारी स्विझर्लंडची केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत हे उघड झाले आहे. यानुसार २०२० मध्ये स्विस बँकेत भारतीयांना आणि भारतीय कंपन्यांनी जवळपास २.५५ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच २० हजार ७०० कोटी रुपये जमा केले आहेत.


आकडेवारीनुसार, २०१९ च्या अखेरीस स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या पैशांची रक्कम जवळपास ८९.९ कोटी फ्रँक्स (६ हजार ६२५ कोटी रुपये) होती. २०२० च्या अखेरीस ही एकूण रक्कम वाढून २० हजार ७०६ कोटी रुपये इतकी झाली. या रक्कमेत ४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कस्टमर डिपॉजिट, ३ हजार १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक दुसर्‍या बँकांच्या माध्यमातून, १६.५ कोटी रुपये ट्रस्टच्या माध्यमातून आणि जवळपास १३ हजार ५०० कोटी रुपये बॉन्ड, सिक्युरिटीज आणि वेगवेगळ्या आर्थिक पर्यायांशी संबंधित गोष्टींचा समावेश आहे. 



या आकडेवारीनुसार, भारतीयांनी स्विस बँकेत पैसे जमा करण्याचा याआधीचा विक्रम २००६ मध्ये झाला होता. त्यावेळी भारतीयांनी जवळपास ६.५ अब्ज स्विस फ्रँक्स जमा केले होते. असे असले तरी २०११, २०१३ आणि २०१७ या वर्षांना सोडले तर बहुतांश वर्षी यात घट झाली आहे.


स्विस बँकेकडून सर्व पैशांचा हिशोब

एसएनबीने दिलेल्या माहितीनुसार, स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेले पैसे व्यक्ती, बँका आणि एंटरप्रायजेसकडून जमा करण्यात आलेत. ही रक्कम स्विझर्लंडमधील भारतीयांच्या काळ्या पैशाची नाही. यात भारतीय, एनआरआय किंवा इतर लोकांचं थर्ड कंट्री एंटिटीजच्या नावाने जमा होणार्‍या पैशाचा समावेश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
असंघटितांचा चमकता तारा अण्णाभाऊ
भारताचे गार्की अण्णाभाऊ
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : एक प्रतिभावंत साहित्यिक (भ
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : एक प्रतिभावंत साहित्यिक (भ
साहित्यसम्राट अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्
शिवशाहीर : अण्णाभाऊ साठे
जागतिक किर्तीचे साहित्यिक अण्णाभाऊ
दोन्ही सभागृहात १०७ तासांपैकी केवळ १८ तास झाले काम, खासद
रोजगारासाठी १२ वीचे गुण महत्त्वाचे नाहीत, सायन्सपेक्षा
ओबीसींच्या इम्पेरीकल डेटासाठी सुप्रीम कोर्टात राज्य सर
केंद्र सरकारने एअर इंडियाच्या ११५ मालमत्ता ७३८ कोटींना
ब्राह्मण मुलीशी लग्न केल्यानंतर अनु.जातीच्या तरुणाचा ख
देशात बेरोजगारी उच्चांकी स्तरावर
सरकारी बँकांचे खासगीकरण शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या म
राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १ हजार ८०० कोटींचे नु
‘चायवाला म्हणत मोदींनी देशाला मुर्ख बनवलं; गुजरात मॉडेल
पेगाससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत
वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसींसाठी २७ टक्के तर इडब्ल्यूए
सर्वोच्च ते कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीशांच्या ५ हजार १
राज्यात ४२ हजार होमगार्डवर मानधनाअभावी उपासमार
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper