×

विविध आरक्षणावरून राज्यात एससी, एसटी, मराठा-ओबीसींमध्ये अस्वस्थता

Published On :    17 Jun 2021
साझा करें:

महाविकास आघाडी सरकार की केंद्र जबाबदार असा सवाल



मुंबई: राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसीचे पंचायत राजचे आरक्षण बचाव, SC, ST चे Reservation इन प्रमोशनच्या स्थगितीने महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी याला जबाबदार आहे की सत्तेपासून दूर राहणे जड जात असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी केंद्राकडून करवून घेतलेले काडीसत्र तर नाही ना? वास्तवात महाराष्ट्रात SC, ST, ओबीसी, मराठा या सर्व वर्गात अस्वस्थता पसरली आहे.


काल भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी महाराज आणि भाजपचे संकट मोचक असलेले एड प्रकाश आंबेडकर कोल्हापूर मध्ये आरक्षण जनक राजश्री शाहू महाराज ह्यांच्या समाधी स्थळावर मूक आंदोलन सुरू केले. ह्या मूक मोर्चात छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेसाठी दारे खुली केली आहेत, हे स्वागतार्ह आहे. पण सोबत राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक असतील. 


मी एकटा त्यांना भेटणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भाजपाचे संकट मोचक प्रकाश आंबेडकर म्हणाले केंद्र सरकार आणि राज्य सरकारने योग्य वेळी भूमिका न घेतल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. यासाठी दोन्ही सरकारे दोषी आहेत. मुद्दा येथे आहे खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी प्रखर आंदोलन करण्याचा इशारा दिला असला तरी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यसभेत उचलून धरला तर महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे खासदार लोकसभा आणि राज्यसभेत उचलून धरतील.


दुसरीकडे धनगर आरक्षण कृती समितीने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतत आजवरच्या नेत्यांनी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधल्यावर धनगर आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. धनगर समाजाच्या नेत्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व इतर नेत्यांवर निशाणा साधला. धनगर समाजातील नेतृत्व कुचकामी ठरले आहे. 


धनगर समाजाच्या नेत्यांकडून आमचा भ्रमनिरास झाल्याने आता मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणार्‍या संभाजी महाराज यांनीच धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी धनगर समाजाचे नेते परमेश्वर कोळेकर यांनी केली. आता प्रश्न निर्माण होतो एकीकडे मराठा जातीला न्याय मिळाला नाही आणि दोन्ही छत्रपती धनगर समाजाला कसा न्याय मिळवून देऊ शकतात ? ग्रामीण भागात एक म्हण आहे, उघड्या शेजारी नागड गेलं दोन्ही गारठून मेलं अशी अवस्था निर्माण झाली आहे.


दुसरीकडे ओबीसीचे पंचायत राज मधील नुकतेच सुप्रीम कोर्टाने बरखास्त केले.ह्यावर ओबीसीचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी स्वागत केले आणि म्हणाले की ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी हे योग्य झाले. त्यामुळे ओबीसी जनगणनेचा प्रश्न निकाली निघेल. नुकतेच मध्यप्रदेश मधील जबलपूर हायकोर्टाने ओबीसीची जनगणना करण्यात यावी असा निर्णय दिला. ही देशातील पहिली घटना होय जो हायकोर्टाने निर्णय दिला. 


ओबीसीचे पंचायत राज मधील आरक्षणासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिक छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. यावर छगन भुजबळ म्हणाले की ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला घटनात्मक अटीच्या पूर्ततेअभावी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकारला हे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्टात सखोल माहिती म्हणजेच इम्पेरिकल डेटासाठी जाणार आहे. राज्यात ओबीसीचे पंचायत राजचे आरक्षण संपले असले तरी ओबीसीचे नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण अबाधित राहील असेही  भुजबळांनी सांगितले. वास्तवात केंद्रात आणि राज्यात आरक्षण हे गुंडाळून ठेवायचे आहेत. आता पंचायत राजचे आरक्षण संपवून टाकले उद्या शैक्षणिक, नोकरीत असलेले आरक्षण बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे.


राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत मराठा आरक्षण,  SC, ST च्या   Reservation इन प्रमोशनला स्थगिती देण्याच्या प्रकरणात आणि सुप्रीम कोर्टाने पंचायत राज मधील ओबीसी आरक्षणाच्या स्थगिती बद्दल म्हणाले की, बहुजन समाजाला वेठीस धरणार्‍या झारीतील शुक्राचार्यांचे पितळ उघडे पाडणार. आता हे शुक्राचार्य अजित पवार आहे की देवेंद्र फडणवीस आहेत हे मात्र त्यांनी सांगितले नाही. 


मात्र आरक्षण हे मूलभूत अधिकार नाही हे जेव्हा भारतीय संविधान निर्माण होत असताना कॉंग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी आरक्षणाला विरोध केला आणि कॉंग्रेसच्या दबावाखाली कलम ३३५ आणून प्रशासनातील कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेच्या नावाखाली आरक्षण नीती प्रभावहीन केली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
असंघटितांचा चमकता तारा अण्णाभाऊ
भारताचे गार्की अण्णाभाऊ
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : एक प्रतिभावंत साहित्यिक (भ
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : एक प्रतिभावंत साहित्यिक (भ
साहित्यसम्राट अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्
शिवशाहीर : अण्णाभाऊ साठे
जागतिक किर्तीचे साहित्यिक अण्णाभाऊ
दोन्ही सभागृहात १०७ तासांपैकी केवळ १८ तास झाले काम, खासद
रोजगारासाठी १२ वीचे गुण महत्त्वाचे नाहीत, सायन्सपेक्षा
ओबीसींच्या इम्पेरीकल डेटासाठी सुप्रीम कोर्टात राज्य सर
भारतात Meritocracy नसून Democracy
केंद्र सरकारने एअर इंडियाच्या ११५ मालमत्ता ७३८ कोटींना
ब्राह्मण मुलीशी लग्न केल्यानंतर अनु.जातीच्या तरुणाचा ख
देशात बेरोजगारी उच्चांकी स्तरावर
सरकारी बँकांचे खासगीकरण शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या म
राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १ हजार ८०० कोटींचे नु
‘चायवाला म्हणत मोदींनी देशाला मुर्ख बनवलं; गुजरात मॉडेल
पेगाससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत
वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसींसाठी २७ टक्के तर इडब्ल्यूए
सर्वोच्च ते कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीशांच्या ५ हजार १
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper