×

लोकांच्या जीवाशी खेळ: कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याची शिफारस केलीच नव्हती

Published On :    16 Jun 2021
साझा करें:

भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा



नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल ऍडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन मधील काही वैज्ञानिकांनी, कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती, असा धक्कादायक दावा केला आहे. तसेच या निर्णयाला, आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा या गटातल्या ३ सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात एका प्रसिद्ध वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावरून केंद्र सरकार लोकांच्या जीवाशी तर खेळत नाही ना...अशी शंका उपस्थित केली जात आहे.


केंद्राने कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. मात्र, देशात लसींचा तुटवडा आहे. त्यातच केंद्र सरकारने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल ऍडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन या गटाने दिलेल्या सल्ल्यावरून सांगण्यात आले होते. मात्र याच गटातील यापैकी काही तज्ज्ञांनी या निर्णयाला आपण कधीही समर्थन दिले नाही, असा खुलासा केला आहे.


दरम्यान,नॅशनल टेक्निकल ऍडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनच्या वैज्ञानिकांनी ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील हाच सल्ला देण्यात आला होता. तथापि १२ ते १६ आठवडे हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. 


तर केंद्र सरकारच्या सध्याच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याच्या निर्णयानुसार संभाव्य कोणते परिणाम होऊ शकतात, याचा कोणताही तपशील नाही, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते रॉयटर्सशी बोलताना म्हणाले. त्यांच्या दाव्याला दुसरे सदस्य मॅथ्यु वर्गेसी यांनी दुजोरा दिला आहे.


त्याचबरोबर याच गटातील दुसरे एक सदस्य जे. पी. मुलीयिल यांनी देखील गुप्ते यांच्या त्या दाव्याला दुजोरा देत, तज्ज्ञांच्या गटामध्ये दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत चर्चा झाली होती. पण आमच्या गटाने दोन डोसमधील अंतर हे १२ ते १६ आठवडे करा असे आम्ही म्हटलोच नाही. तसेच कोणतीही आकडेवारी सांगितली गेली नाही, असे ते म्हणाले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
असंघटितांचा चमकता तारा अण्णाभाऊ
भारताचे गार्की अण्णाभाऊ
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : एक प्रतिभावंत साहित्यिक (भ
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : एक प्रतिभावंत साहित्यिक (भ
साहित्यसम्राट अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्
शिवशाहीर : अण्णाभाऊ साठे
जागतिक किर्तीचे साहित्यिक अण्णाभाऊ
दोन्ही सभागृहात १०७ तासांपैकी केवळ १८ तास झाले काम, खासद
रोजगारासाठी १२ वीचे गुण महत्त्वाचे नाहीत, सायन्सपेक्षा
ओबीसींच्या इम्पेरीकल डेटासाठी सुप्रीम कोर्टात राज्य सर
केंद्र सरकारने एअर इंडियाच्या ११५ मालमत्ता ७३८ कोटींना
ब्राह्मण मुलीशी लग्न केल्यानंतर अनु.जातीच्या तरुणाचा ख
देशात बेरोजगारी उच्चांकी स्तरावर
सरकारी बँकांचे खासगीकरण शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या म
राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १ हजार ८०० कोटींचे नु
‘चायवाला म्हणत मोदींनी देशाला मुर्ख बनवलं; गुजरात मॉडेल
पेगाससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत
वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसींसाठी २७ टक्के तर इडब्ल्यूए
सर्वोच्च ते कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीशांच्या ५ हजार १
राज्यात ४२ हजार होमगार्डवर मानधनाअभावी उपासमार
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper