×

कोरोना काळात काम करूनही राज्य सरकारने फुटकी कवडीही दिली नाही

Published On :    16 Jun 2021
साझा करें:

‘आशा’ कार्यकर्त्यांना वेठबिगार बनवल्याने बेमुदत संपाचा निर्धार



मुंबई:  गेले वर्षभर कोरोना काळात काम करून घेऊन राज्य सरकारने आम्हाला फुटकी कवडीही दिली नाही. त्यामुळे आता बेमुदत संपातून माघार नाही असा संताप राज्यभरातील आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जवळपास ७० हजार आशांनी आजपासून राज्यव्यापी संप पुकारला असून याचे गंभीर परिणाम ग्रामीण भागातील करोनाच्या कामावर होऊ शकतात असे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. ‘आशा’ कार्यकर्त्यांना वेठबिगार बनवल्याने बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे.


गेले वर्षभर कोरोनाचे काम आमच्याकडून करून घेणार्‍या राज्य सरकारने अजूनपर्यंत फुटकी कवडीही आम्हाला दिली तर नाहीच उलट आरोग्य विभागाच्या अन्य कामांसाठी मिळणारे अडीच तीन हजार रुपयेही देणे बंद केल्याचे निर्मला यांनी सांगितले. कोरोनामुळे एखादी आशा आजारी पडून कामाला आली नाही तर हे सरकार आमचे पैसेही कापून घेत असल्याचे आशांचे म्हणणे आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजना केवळ आशांमुळेच यशस्वी झाली, तेव्हाही आरोग्य विभागाने कामाचे ठरलेले पैसे देण्यास खळखळ केली होती. कोरोनाच्या कामासाठी डॉक्टरांपासून परिचारिकांपर्यंत सर्वांना हे सरकार हवे तेवढे पैसे देते आणि ग्रामीण आरोग्याचा कणा असलेल्या ‘आशां’ना वेठबिगार म्हणून राबवून घेते हे आता आम्ही सहन करणार नाही, असेही संपावरील आशांनी सांगितले.


आठ तासांच्या कामाचे फक्त ३५ रुपये!

केंद्र व राज्य सरकारकडून एरवी आरोग्याच्या विविध कामांपोटी आशा कार्यकर्त्यांना चार हजार रुपये मानधन मिळते. मात्र गेले वर्षभर या ‘आशां’ना आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या विविध जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत. यात घरोघरी जाऊन ताप, ऑक्सिजन पातळी मोजण्यासह सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच लसीकरणाच्या कामाला मदत करण्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोरोना रुग्णतपासणीच्या कामात सहकार्य करावे लागते. केंद्र सरकारने यासाठी महिन्याला एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केला आहे. याचाच अर्थ रोजचे ३५ रुपये आठ तासाच्या कामासाठी आम्हाला दिले जातात, असे निर्मला माने या आशा कार्यकर्तीने सांगितले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
असंघटितांचा चमकता तारा अण्णाभाऊ
भारताचे गार्की अण्णाभाऊ
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : एक प्रतिभावंत साहित्यिक (भ
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : एक प्रतिभावंत साहित्यिक (भ
साहित्यसम्राट अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्
शिवशाहीर : अण्णाभाऊ साठे
जागतिक किर्तीचे साहित्यिक अण्णाभाऊ
दोन्ही सभागृहात १०७ तासांपैकी केवळ १८ तास झाले काम, खासद
रोजगारासाठी १२ वीचे गुण महत्त्वाचे नाहीत, सायन्सपेक्षा
ओबीसींच्या इम्पेरीकल डेटासाठी सुप्रीम कोर्टात राज्य सर
केंद्र सरकारने एअर इंडियाच्या ११५ मालमत्ता ७३८ कोटींना
ब्राह्मण मुलीशी लग्न केल्यानंतर अनु.जातीच्या तरुणाचा ख
देशात बेरोजगारी उच्चांकी स्तरावर
सरकारी बँकांचे खासगीकरण शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या म
राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १ हजार ८०० कोटींचे नु
‘चायवाला म्हणत मोदींनी देशाला मुर्ख बनवलं; गुजरात मॉडेल
पेगाससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत
वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसींसाठी २७ टक्के तर इडब्ल्यूए
सर्वोच्च ते कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीशांच्या ५ हजार १
राज्यात ४२ हजार होमगार्डवर मानधनाअभावी उपासमार
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper