×

स्टॅलिनने शेतकर्‍यांवर रणगाडे घातले; पण, मोदी शेतकर्‍यांसह पुढच्या पिढ्यांवरही रणगाडे चालवत आहेत

Published On :    16 May 2021
साझा करें:

माजी खासदार राजू शेट्टी यांची जळजळीत टीका



सोमेश्‍वरनगरः कोरोना काळात जीव धोक्यात घालून देशाची अन्नधान्याची गरज भागविणार्‍या आणि अर्थव्यवस्था सावरणार्‍या शेतकर्‍याला केंद्र सरकारने खताच्या दरवाढीचे ‘बक्षीस’ दिले आहे. आजपर्यंत कधीही झाली नव्हती, अशी साठ टक्के दरवाढ करणार्‍या सरकारची कृती स्टॅलिनसारखी आहे. स्टॅलिनने शेतकर्‍यांच्या अंगावर रणगाडे घातले होते. मोदी सरकारने तर शेतकरी आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांवरही रणगाडे चालविले आहेत, अशी जळजळीत टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.


केंद्र सरकारने खतांच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात दरवाढीची इतकी टक्केवारी कुठल्याही सरकारने गाठली नव्हती. डीएपीच्या (१८-४६-००) किमती ११८५ रूपयांहून १९०० रूपयांवर तर १०-२६-२६ च्या किंमती ११७५ रूपयांवरून १७७५ रूपयांवर गेल्या आहेत. याशिवाय पोटॅश, सुपर फॉस्फेटसह अन्य खतांच्याही दरात मोठी वाढ झाली आहे. ही दरवाढ साठ टक्क्यांंच्या पुढे जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


याबाबत शेतकर्‍यांचे नेते राजू शेट्टी म्हणाले, मोदी सरकारने स्वामीनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ असे गाजर दाखवले. नंतर उत्पन्न दुप्पट करण्याचे आमिष दाखविले. त्यावर कळस म्हणजे मागणी केलेली नसतानाही तीन कृषी विधेयके लादून शेतकर्‍यांना उद्योगपतींच्या दावणीला बांधले आहे. आता खतांची दरवाढ करून उरलीसुरली ताकदही संपवून टाकली आहे.


शेतकर्‍याची लंगोटी काढून केंद्र सरकारला काय मिळणार आहे? शेतकर्‍यांनी दिगंबर अवस्थेत शेती करावी, अशी प्रधानमंत्री मोदींची अपेक्षा आहे का? असा सवाल करून शेट्टी म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था कोरोनाकाळात पूर्णपणे कोसळत असताना ज्या शेतीने अर्थव्यवस्था टिकवून ठेवली आणि कोरोना संकटाशी दोन हात करत रात्रंदिवस राबून जनतेची अन्नधान्याची गरज भागविली, त्याच शेतकर्‍याला हेच बक्षीस दिले का? या कृतीची तुलना स्टॅलिनशी करावीशी वाटते. या केंद्र सरकारच्या कृत्यांमुळे शेतकरी तर मरणारच पण त्याच्या पुढच्या पिढ्याही बरबाद होतील. त्यांच्यापाठोपाठ शेतमजुरांचाही रोजगार नष्ट होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.


 निवडणुका होताच डिझेल वाढवून शेतकर्‍याचे कंबरडे मोडलेच

एप्रिलमध्येच खतांची दरवाढ करण्याचे सूतोवाच केले होते. दर किती वाढणार हेही जाहीर झाले होते. मात्र, पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या निवडणुका असल्याने ती दरवाढ करणार नाही, असा शब्द सरकारने दिला. मात्र, निवडणुका होताच डिझेल वाढवून शेतकर्‍याचे कंबरडे मोडलेच. वर पुन्हा खतांची दरवाढ केली. आताचे दरवाढीचे आकडे आणि एप्रिलमध्ये जाहीर झालेले आकडे तेच आहेत. याचाच अर्थ केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीचा भडका कायम
छत्रपती शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार, पुणे विद्यापीठात
मराठ्यांच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचा
कोरोना काळात भारतातील श्रीमंतांनी २० हजार ७०० कोटी स्वि
पतंजलीचे रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल
राजकीय आरक्षणावर चिंतन करताना शैक्षणिक आणि सर्व्हीसमधी
कर चुकवण्यासाठी ७ हजार श्रीमंत भारतीय झाले दुसर्‍या देश
कोट्यवधींवर बेरोजगारीची कुर्‍हाड
कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची
शिक्षण, नोकर्‍यातील आरक्षण संपले तरी चालेल, राजकीय आरक्ष
एक लाख चाचण्यांचे कंत्राट मिळालेल्या कंपनीचे अस्तित्व
आयटी क्षेत्रातील ३० लाख भारतीयांच्या नोकरीवर येणार गदा
विविध आरक्षणावरून राज्यात एससी, एसटी, मराठा-ओबीसींमध्ये
आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?
मराठा मोर्चे पुन्हा एकदा आरएसएस व भाजपाच्या दावणीला?
कोरोना काळात काम करूनही राज्य सरकारने फुटकी कवडीही दिली
लोकांच्या जीवाशी खेळ: कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर वाढवि
राजस्थानात वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड स्थापन होणार
८० लाख लोकांचे १० हजार टन धान्य सडवले परंतु गरीबांना वाट
मराठा आरक्षणासाठी राणे समिती नेमून चूक केली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper