×

ऑडिट श्‍वासाचे:राज्यातील ९५ टक्के रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सदोष

Published On :    16 May 2021
साझा करें:

पडताळणीमध्ये आढळले धक्कादायक वास्तव



मुंबई: राज्यात सरकारी व खासगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती होत असल्याची धक्कादायक बाब ऑक्सिजन ऑडिटमधून समोर आली आहे. सरकारीपेक्षा खासगी रुग्णालयांचा ऑक्सिजन व्यवस्थापनात मोठा ढिसाळपणा दिसून आला आहे.


राज्य सरकारने २३ एप्रिलला सर्व रुग्णालयांत ऑक्सिजन ऑडिटचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी शासकीय तंत्रनिकेतने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांच्या समित्या स्थापन केल्या होत्या. त्यांनी संबंधित जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांच्या ऑक्सिजन वायुनलिका व प्रणालींची तपासणी केली. ९ मेपर्यंत ६ महसुली विभागातील शासकीय ३३५, तर खासगी १४७९ रुग्णालयांची तपासणी झाली. त्यात शासकीय २५४ (७५ टक्के) व खासगी १४६५ (९९ टक्के ) अशा एकूण १७७९ (९५ टक्के) रुग्णालयांत ऑक्सिजन व्यवस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्या. कोविडच्या दुसर्‍या लाटेत राज्याला दैनंदिन १७०० टन ऑक्सिजनची गरज आहे. 


राज्यात रोज १२५० टन ऑक्सिजन उत्पादन होते. तूट भरून काढण्यासाठी हवाई दल व रेल्वेच्या रोरो सेवेची मदत घेतली जात आहे. याबाबत शासकीय रुग्णालयातील त्रुटी दूर केल्या जात असून खासगी रुणालयांना नोटिसा बजावण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
औरंगाबाद विभागात १३० शासकीय रुग्णालयांपैकी ५८ रुणालयांत तर खासगी ४९५ पैकी २८३ रुग्णालयांत त्रुटी आढळल्या. नाशिक विभागात ६० शासकीय रुग्णालयांपैकी ५१ तर ४१५ खासगीपैकी ४१३ रुग्णालयांत ऑक्सिजन व्यवस्थापनात त्रुटी आढळल्या आहेत.

४ महसूल विभागांत १०० टक्के त्रुटी
अमरावती महसूल विभागात १६८ पैकी सर्व रुग्णालयात त्रुटी आढळून आल्या तर मुंबई विभागात २७१ पैकी सर्व रुग्णालयात अशा त्रुटी दिसून आल्या. नागपूर महसूल विभागात २४४ पैकी सर्व रुग्णालयांत आणि पुणे महसूल विभागात २३१ पैकी सर्व रुग्णालयांत ऑक्सिजन व्यवस्थापनात त्रुटी आढळल्या आहेत.

या आहेत त्रुटी
ऑक्सिजन पाइपला व सिलिंडर व्हॉल्व्हजवळ गळती.
अग्निसुरक्षा ऑडिट केलेले नाही.
ऑक्सिजन टाक्यांजवळ वीज ट्रान्सफॉर्मर, मोठा वृक्ष आहे.
ऑक्सिजन सिलिंडरसाठी शेड नाही.
सिलिंडर चुकीच्या पद्धतीने ठेवले जातात.
दुरुस्तीचे सामान नाही, प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.
पर्यायी ऑक्सिजन पुरवठ्याचा मार्ग (बॅकअप) नाही.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीचा भडका कायम
छत्रपती शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार, पुणे विद्यापीठात
मराठ्यांच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचा
कोरोना काळात भारतातील श्रीमंतांनी २० हजार ७०० कोटी स्वि
पतंजलीचे रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल
राजकीय आरक्षणावर चिंतन करताना शैक्षणिक आणि सर्व्हीसमधी
कर चुकवण्यासाठी ७ हजार श्रीमंत भारतीय झाले दुसर्‍या देश
कोट्यवधींवर बेरोजगारीची कुर्‍हाड
कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची
शिक्षण, नोकर्‍यातील आरक्षण संपले तरी चालेल, राजकीय आरक्ष
एक लाख चाचण्यांचे कंत्राट मिळालेल्या कंपनीचे अस्तित्व
आयटी क्षेत्रातील ३० लाख भारतीयांच्या नोकरीवर येणार गदा
विविध आरक्षणावरून राज्यात एससी, एसटी, मराठा-ओबीसींमध्ये
आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?
मराठा मोर्चे पुन्हा एकदा आरएसएस व भाजपाच्या दावणीला?
कोरोना काळात काम करूनही राज्य सरकारने फुटकी कवडीही दिली
लोकांच्या जीवाशी खेळ: कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर वाढवि
राजस्थानात वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड स्थापन होणार
८० लाख लोकांचे १० हजार टन धान्य सडवले परंतु गरीबांना वाट
मराठा आरक्षणासाठी राणे समिती नेमून चूक केली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper