×

संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या मुक्ततेसाठी अभियान चालवणार

Published On :    15 May 2021
साझा करें:

भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव प्रा.विलास खरात याचा इशारा



पुणे: वढू बु. येथील छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ हे राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारित संरक्षित स्मारक असले तरी ते स्मारक आजही ब्राम्हणांच्या कब्जात आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचे हे समाधीस्थळाच्या मुक्ततेसाठी छत्रपती क्रांती सेना व भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून देशभरात अभियान चालवू असा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव प्रा.विलास खरात यांनी दिला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.  यावेळी त्यांनी विविध ऐतिहासिक दाखले दिले, त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर आला.


यावेळी प्रा. खरात यांनी मिलींद एकबोटे याच्यावर तोफ
 डागली. एकबोटेचे सामाजिक योगदान काय आहे? एकबोटेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. हिंदू-मुस्लीमांच्या नावावर दंगली करण्याचा गुन्हा त्याच्यावर आहे. त्याची विचारधारा वर्णव्यवस्थावादी म्हणजेच आरएसएसची आहे. एकबोटे हा जातीने मराठा नाही. बहुजन समाजाचा प्रतिनिधीत्व करणारा नाही. तो ब्राम्हण आहे. तो अशा संस्थांशी जोडला गेला आहे की, सार्‍या देशाला त्याची डोकेदुखी झाली आहे. १ जानेवारी २०१८ रोजी जी दंगल घडवण्यात आली त्यात भिडे-एकबोटे मास्टरमाईंड आहे. देवेंद्र फडणवीस पडद्यामागे सारा खेळ करत  होते. 


छत्रपती संभाजी महाराजांची समाधी बहुजनांची प्रेरणास्थळ आहे त्यावर त्यांनी कब्जा केला आहे. त्यांनी कब्जा कसा केला याची पडताळणी केली असता मिलींद एकबोटेचा कब्जा बेकायदेशीर असल्याचे समोर आले. जे महापुरूष असतात त्यांचे जन्मस्थळ, समाधीस्थळ ऐतिहासिक वारसा म्हणून भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असते. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड-किल्ले हे महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत. परंतु आश्‍चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्राचे प्रेरणास्थळ छत्रपती संभाजी महाराजांची समाधी मिलींद एकबोटेच्या नियंत्रणात आहे. 


हे नियंत्रण आरएसएसच्या अखत्यारित कसे आले? त्याची माहिती घेताना २० डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र पुरातत्व विभागाला एक अर्ज करण्यात आला. त्यावेळी पुरातत्व विभागाला प्रश्‍न विचारण्यात आले की, छत्रपती संभाजी महाराज महान व्यक्ती आहेत. त्यांच्या जीवनाशी निगडीत ही महत्वपूर्ण घटना आहे. त्यांचे समाधीस्थळ ऐतिहासिक आहे. ते कुणाच्या कब्जात आहे याची आम्हांला माहिती हवी. त्या बदल्यात महाराष्ट्र पुरातत्व विभागाने हे राज्य संरक्षित स्मारक असल्याचे सांगत त्याच्या अधिसूचनेची प्रत त्यांनी आम्हांला दिली. त्यामध्ये अनेक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. हे समाधीस्थळ १९७५ मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे प्रा. खरात यांनी सांगितले.


दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा शोध कायस्थ बा.सी.बेंद्रे यांनी केले. बेंद्रे यांच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा वास्तविक इतिहास जगासमोर आला. त्यावेळी अनेक ब्राम्हणी इतिहासकारांनी संभाजी महाराजांनी बदनामी केली, त्यांचे चारित्र्यहनन केलेे गेले, त्याचे खंडन करण्याचे काम बेंद्रे यांनी केले. बेंद्रे यांनी स्वत: चरित्रात लिहले आहे की, आम्ही काही लोक प्रत्येकवर्षी तुळापूरला जाऊन संभाजी महाराजांचा स्मृतीदिन करायचो. परंतु ऐतिहासिक दस्ताऐवज शोधण्यास सुरूवात केली असता तुळापुरात छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ नसून वास्तविक ते वढू बु. येथे असल्याचे समोर आले. ब्राम्हणांनी ते जाणूनबुजून लपवले होते. बेंद्रे मोठे इतिहासकार आहेत. ते कायस्थ होते. वर्णव्यवस्थेनुसार ते शुद्र होते. कायस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सहकार्य केले आहे. संभाजी महाराजांचे जीवनचरित्र बेंद्रे यांनी १ जानेवारी १९६० रोजी प्रकाशित केले आहे. कारण बेंद्रे यांना इतिहास माहित होता. १ जानेवारी १८१८ रोजी ५०० नागवंशीय सैन्याने २८ हजार पेशव्यांना कापले होते.


महाराष्ट्र पुरातत्व विभागावरही ब्राम्हणांचे नियंत्रण आहे. १९७५ ला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले. परंतु त्या संरक्षित स्मारकाच्या परिपत्रकाची दोन पाने गायब करण्यात आली आहेत. पाने गायब केल्यानंतर त्या जागी दुसरा संचालक आला असावा. तोदेखील ब्राम्हण होता. त्याने गायब करण्यात आलेल्या पानांचा शोधही घेतला नाही. समाधी स्थळाला पैसा देणे बंद करण्यात आले. पुरातत्व विभागात बसलेल्या ब्राम्हण संचालकांनी आरएसएसच्या ब्राम्हणांना अप्रत्यक्ष संदेश दिला की, तुम्ही आता यावर अतिक्रमण करा. कारण आम्ही त्याच्यावरील अप्रत्यक्ष नियंत्रण काढले आहे. त्यानंतर एकबोटेची तेथे एन्ट्री होते. सार्‍या देशभरात मंडल आयोगाविरोधात ब्राम्हण आंदोलन चालवतात. त्यावेळी एकबोटेला पुढे केले जाते. 


कारण मंडल आयोगाच्या समर्थनात मराठा उतरला तर ब्राम्हणांना डोकेदुखी होईल हे हेरून एकबोटेला पुढे करण्यात आले होते. दुसर्‍या बाजूला बाबरी मशीद पाडण्यासाठी हिंदू-मुस्लीम मामला निर्माण करण्यात आला होता. त्यासाठी मराठा लोकांचे डोके भडकावणे गरजेचे होते. त्यासाठी एकबोटेने समिती बनवली. ही समिती बेकायदेशीर असल्याचे राज्य पुरातत्व विभागाने जाहीर केले आहे. ही बाब आमच्यासमोर आल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून पत्र लिहले. समाधीस्थळ राज्य पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात आहे, त्यामुळे ते लवकरात लवकर सरकारच्या कब्जात घेऊन आणि एकबोटेच्या पार्श्‍वभागावर लाथ मारून त्याला तेथून हाकलून द्यावे अशी मागणी केली, परंतु सरकारने तसे काही केले नाही. १ जानेवारी २०१८ ला त्याने दंगल घडवली. भविष्यात आणखी अशाप्रकारे दंगल घडवली जाईल असा इशारा देण्यात आला आल्याचे प्रा. खरात यांनी सांगितले.


दरम्यान अशाप्रकारे पत्र पाठवताच सांस्कृतिक मंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून ऑफिशियल ई मेल आला. आपले पत्र मिळाले. आम्ही उचित कारवाई करू. हे पत्र सांस्कृतिक विभागाच्या सचिवांकडे पाठवले जात आहे. हे पत्र डिसेंबर २०२० मध्ये लिहण्यात आले होते. आता पाच महिने झाले तरी उचित कारवाईचा पत्ता नाही. संभाजी महाराजांची समाधी हे बहुजनांचे प्रेरणास्थळ आहे. ते ब्राम्हणांच्या नियंत्रणात आहे. ही मोठी दु:खाची बाब आहे. याबाबत मराठ्यांचे जनजागरण करण्याची गरज आहे. हे स्मारक ब्राम्हणांच्या कब्जात कसे काय गेले? १९७४ ला ऑर्डर काढण्यात आली. त्यावेळी कोणी ऑब्जेक्शन घेतले नाही. 


१९७५ मध्ये महाराष्ट्राच्या राज्यापालांच्या माध्यमातून आदेश काढण्यात आला. राजधानी मुंबईत सचिवालयात ब्राम्हण बसलेले आहेत. भलेही महाराष्ट्राची सत्ता मराठा लोकांच्या हातात राहिली आहे. परंतु सचिवालय ब्राम्हणांच्या नियंत्रणात आहे. नीती बनवण्याचा सारा अधिकार त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्र पुरातत्व विभागही ब्राम्हणांच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे त्यांनी पुरातत्व विभागाच्या ब्राम्हण संचालकांना हाताशी धरून समाधी स्थळावर कब्जा केला. ते स्मारक मुक्त करण्याची जबाबदारी राज्यातील बहुजन समाज, मराठा-कुणबी लोकांची असल्याचे प्रा. खरात यांनी स्पष्ट केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीचा भडका कायम
छत्रपती शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार, पुणे विद्यापीठात
मराठ्यांच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचा
कोरोना काळात भारतातील श्रीमंतांनी २० हजार ७०० कोटी स्वि
पतंजलीचे रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल
राजकीय आरक्षणावर चिंतन करताना शैक्षणिक आणि सर्व्हीसमधी
कर चुकवण्यासाठी ७ हजार श्रीमंत भारतीय झाले दुसर्‍या देश
कोट्यवधींवर बेरोजगारीची कुर्‍हाड
कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची
शिक्षण, नोकर्‍यातील आरक्षण संपले तरी चालेल, राजकीय आरक्ष
एक लाख चाचण्यांचे कंत्राट मिळालेल्या कंपनीचे अस्तित्व
आयटी क्षेत्रातील ३० लाख भारतीयांच्या नोकरीवर येणार गदा
विविध आरक्षणावरून राज्यात एससी, एसटी, मराठा-ओबीसींमध्ये
आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?
मराठा मोर्चे पुन्हा एकदा आरएसएस व भाजपाच्या दावणीला?
कोरोना काळात काम करूनही राज्य सरकारने फुटकी कवडीही दिली
लोकांच्या जीवाशी खेळ: कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर वाढवि
राजस्थानात वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड स्थापन होणार
८० लाख लोकांचे १० हजार टन धान्य सडवले परंतु गरीबांना वाट
मराठा आरक्षणासाठी राणे समिती नेमून चूक केली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper