×

३० वर्षांत लिटरमागे ८४ रुपयांची वाढ

Published On :    14 May 2021
साझा करें:

कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही ग्राहकांचा खिसा कापण्याचा प्रकार कायम



मुंबई:  कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले आहेत; तर दुसरीकडे महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचा काळ वगळता ६ मेपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच आहे. १३ मेपर्यंत पेट्रोलियम कंपन्यांनी सहावेळ दरवाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याचा फायदा ग्राहकांना न देता केंद्र सरकार उत्पादन कर वाढवून पेट्रोल आणि डिझेलचे दर निरंतर वाढवीत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. पेट्रोलियम कंपन्या मध्यरात्री काही पैशांची दरवाढ करून ग्राहकांच्या खिशातून छुप्या पद्धतीने पैसे वसूल करीत आहे. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या दरवाढीने १३ मे २०२१ रोजी पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९८.२४ रुपयांवर पोहोचले आहे. कोरोनाच्या काळात आयुष्य ‘लॉक’ असतानाही पेट्रोल दरवाढ ‘अनलॉक’ आहे. दरवाढीचा आलेख पाहता गेल्या ३० वर्षांत पेट्रोलची लिटरमागे जवळपास ८४ रुपयांची वाढ झाली आहे.


मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आले, तेव्हा पेट्रोलवर ९.४८ रुपये, तर डिझेलवर ३.५६ रुपये केंद्राचा उत्पादन कर होता. गेल्या सात वर्षांत पेट्रोलवरील उत्पादन कर ३५० टक्के, तर डिझेलवरील उत्पादन कर ९०० टक्के वाढला. आयात करातील वाढ वेगळी आहे. याचे कारण गेल्या सात वर्षांत क्रूड तेलाच्या किमती जसजशा कमी झाल्या, त्याच प्रमाणात मुख्यत: केंद्र सरकारने करांचे प्रमाण त्या पटीत वाढविले आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीनुसार देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरतात. कच्च्या तेलाचे रिफायनरीमध्ये शुद्धीकरण आणि पेट्रोल पंपावर उपलब्ध होईपर्यंत पेट्रोलचे प्रत्यक्ष दर ३३ ते ३६ रुपये लिटर पडतात; पण त्यावर वेगवेगळे कर लागतात. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर कमी असले तरीही पेट्रोल महाग मिळते; कारण तेलाच्या किमतीपेक्षा कर जास्त आहे. यामध्ये केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा वाटा वेगवेगळा आहे. समजा, एक लिटर पेट्रोलचा दर १०० रुपये असेल तर त्यांपैकी जवळपास ६४ टक्के कर असतो. कर वगळता शुद्धीकरणानंतर ३६ रुपये लिटर पेट्रोलच्या किमतीत कच्च्या तेलाच्या किमती, प्रक्रिया, डीलर्स यांचा वाटा असतो. एक लिटर पेट्रोलचा एक्स रिफायनरी दर ३३.८२ रुपये असेल, तर त्यात ०.३२ रुपये वाहतूक खर्च, उत्पादन शुल्क ३८.५७ रुपये, डीलरचे कमिशन ३.६८ रुपये, मूल्यवर्धित कर (व्हॅट) २३.७५ रुपये आणि स्थानिक करांसह ग्राहकांकडून पंपावर प्रतिलिटर किंमत म्हणून ९८.२४ रुपये घेतले जातात.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीचा भडका कायम
छत्रपती शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार, पुणे विद्यापीठात
मराठ्यांच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचा
कोरोना काळात भारतातील श्रीमंतांनी २० हजार ७०० कोटी स्वि
पतंजलीचे रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल
राजकीय आरक्षणावर चिंतन करताना शैक्षणिक आणि सर्व्हीसमधी
कर चुकवण्यासाठी ७ हजार श्रीमंत भारतीय झाले दुसर्‍या देश
कोट्यवधींवर बेरोजगारीची कुर्‍हाड
कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची
शिक्षण, नोकर्‍यातील आरक्षण संपले तरी चालेल, राजकीय आरक्ष
एक लाख चाचण्यांचे कंत्राट मिळालेल्या कंपनीचे अस्तित्व
आयटी क्षेत्रातील ३० लाख भारतीयांच्या नोकरीवर येणार गदा
विविध आरक्षणावरून राज्यात एससी, एसटी, मराठा-ओबीसींमध्ये
आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?
मराठा मोर्चे पुन्हा एकदा आरएसएस व भाजपाच्या दावणीला?
कोरोना काळात काम करूनही राज्य सरकारने फुटकी कवडीही दिली
लोकांच्या जीवाशी खेळ: कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर वाढवि
राजस्थानात वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड स्थापन होणार
८० लाख लोकांचे १० हजार टन धान्य सडवले परंतु गरीबांना वाट
मराठा आरक्षणासाठी राणे समिती नेमून चूक केली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper