×

झिरो बॅलन्स खात्यातून पाच वर्षात सर्व्हिस चार्जच्या नावाखाली एसबीआयने अलगद काढले ३०० कोटी

Published On :    12 Apr 2021
साझा करें:

डिजीटल ट्रान्झॅक्शन्सवरही आरबीआच्या नियमांचे उल्लंघन, आयआयटी मुंबईच्या अभ्यासात खुलासा



मुंबई:  देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँका झीरो बॅलन्स अथवा बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाऊंटशी निगडीत काही सेवांवर मोठ्या प्रमाणात चार्जेस वसूल करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन आहे. आयआयटी मुंबईच्या एका अभ्यासात याचा खुलासा झाला आहे. या अभ्यासानुसार जर या खात्यांमधून चार वेळापेक्षा अधिक वेळा ट्रान्झॅक्शन केलं गेलं असेल तर स्टेट बँक या खात्यातून १७.७० रूपयांचं शुल्क आकारते. हे शुल्क कमी मानलं जाऊ शकत नाही. तसंच २०१५ ते २०२० या कालावधीदरम्यान स्टेट बँकेनं १२ कोटी बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाऊंटमधून तब्बल ३०० कोटी रूपये सर्व्हिस चार्च म्हणून घेतले आहेत.


यापैकी ७२ कोटी रूपयांचा सर्व्हिस चार्ज हा २०१८-१९ मध्ये वसूल करण्यात आला होता. तर १५८ कोटी रूपयांचा सर्व्हिस चार्ज २०१९-२० या वर्षात वसूल करण्यात आल्याचं आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून समोर आलं आहे. याशिवाय स्टेट बँकेनं ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्सवर एका महिन्यात चारपेक्षा अधिक ट्रान्झॅक्शन्स झाल्यावरही शुल्क आकारल्याचं समोर आलं आहे.


आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार, काही बँकांकडून बीएसबीडीएवर आरबीआयच्या नियमांचे पद्धतशीरपणे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. या प्रकारातील सर्वाधिक खाती स्टेट बँकेतील आहेत आणि स्टेट बँकेने चार पेक्षा अधिक वेळा केलेल्या ट्रान्झॅक्शनवर मग ते डिजिटलही असली तरी त्याची पर्वा न करता प्रत्येक व्यवहारावर १७.७० रुपये शुल्क आकारले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार सेव्हिंग डिपॉझिट अकाऊंट जोवर बीएसबीडीए आहेत तोवर बँक त्यावर कोणतेही सेवा शुल्क आकारू शकत नाही. इतकेच नाही तर व्हॅल्यू ऍडेड बँकिंग सेवांबाबतही ते चार्जेच घेऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँक एका महिन्यात चार पेक्षा अधिक वेळा केलेल्या विड्रॉव्हलला व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस मानते. इतकंच नाही की बँकेने केवळ एका महिन्यात चार पेक्षा अधिक वेळा करण्यात आलेल्या एटीएम ट्रान्झॅक्शन्सवर शुल्क लावले आहे. बँकेने मर्चन्ट पेमेंटसाठी एनईएफटी, युपीआय, भीम, आणि डेबिट कार्डच्या वापरावरही शुल्क वसूल केले आहे.


स्टेट बँकेने जेव्हा युपीआय- भीम युपीआयवरील ट्रान्झॅक्शन्ससाठी शुल्क लावण्यास सुरू केलं तेव्हा रिझर्व्ह बँकेला तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतरही रिझर्व्ह बँकेकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचेही सांगण्यात आले आहे. यानंतर याबाबत सरकारकडे तक्रार करण्यात आली. केंद्र सरकारने यानंतर त्वरित पावले उचलत ३० ऑगस्ट २०२० रोजी सर्व बँकांना आदेश दिले. सर्व खातेधारकांना त्यांच्याकडून आकारण्यात आलेलं शुल्क परत करण्यात यावं. हे शुल्क परत न केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे सरकारनं नमूद केले होते. देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकबाबत सांगायचं झालं तर त्यांनी या प्रकारे ३.९ कोटी खात्यांतून पाच वर्षांमध्ये ९.९ कोटी रूपयांचे शुल्क आकारले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ऑडिट श्‍वासाचे:राज्यातील ९५ टक्के रुग्णालयांत ऑक्सिजन
स्टॅलिनने शेतकर्‍यांवर रणगाडे घातले; पण, मोदी शेतकर्‍या
विदर्भात बालमृत्यू वाढले, वर्षभरात ३५६ बालकांचा मृत्यू
कोरोनामुळे भारतात ३२ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर
५ जूनला बीडमध्ये भव्य मराठा आरक्षण मोर्चा
चक्रीवादळाची तीव्रता वाढली; गोव्यासह कर्नाटकला झोडपले
सीएए समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवण्याची शाळेची सक्ती
शाळा ही संकल्पना नष्ट होते की काय....?
मध्यवर्ती जातीच्या लोकांनी सार्‍या देशभरात आंदोलन केल
संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या मुक्ततेसाठी अभिया
फडणवीस सरकारकडून मराठा आरक्षणाची करण्यात आली होती केवळ
शौर्य,साहित्य आणि चारित्र्यसंपन्नतेचा आदर्श संघर्षयोद
३० वर्षांत लिटरमागे ८४ रुपयांची वाढ
नीरव मोदीच्या संपत्तीवर ११ जूननंतर टाच येणार
BRICS देशांमध्ये आरोग्यावर सर्वात कमी खर्च करणारा देश भारत
मराठा आरक्षणप्रश्‍नी फेरविचार याचिका
लसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्य
शेतकरी आंदोलनामुळे काही गावं झालीत कोरोना हॉटस्पॉट
भारतीय ऑक्सिजनसाठी तडफडत असताना ३३ कोटी देवतांपैकी एका
चीनचे खरे रुप पुन्हा उजेडात, औषधांचे करार रद्द
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper