×

परिवर्तन पेरणारे महात्मा

Published On :    11 Apr 2021
साझा करें:

व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रसंग येतात, निसर्गनियमाप्रमाणे काही प्रसंग विस्मृतीत जातात. तर काही प्रसंग मनात घर करून राहतात. काही घटना चिरंतर स्मरणात राहतात. ते प्रसंग व्यक्तीला झपाटून टाकतात. मनाला अस्वस्थ करतात.



व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रसंग येतात, निसर्गनियमाप्रमाणे काही प्रसंग विस्मृतीत जातात. तर काही प्रसंग मनात घर करून राहतात. काही घटना चिरंतर स्मरणात राहतात. ते प्रसंग व्यक्तीला झपाटून टाकतात. मनाला अस्वस्थ करतात. त्या प्रसंगांचा प्रभाव एवढा असतो, की तो प्रसंग विचार करायला लावतो. जे त्या प्रसंगावर विचार करतात. अगदी सखोल विचार करतात. तो विचार त्यांना स्वस्थ बसू देत नाही. तो त्यांच्या जिव्हारी लागतो आणि मग सुरू होते चिंतन, परिवर्तन. त्यातून उभे राहते नैसर्गिक बंड. मन पेटून उठते. सुरू होते काहीतरी करण्याची धडपड. त्यातून मग घडते, काहीतरी अद्वितीय, प्रेरक कार्य.
      असाच एक प्रसंग राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावांच्या बाबतीत घडला होता. आपल्या एका सखाराम परांजपे नावाच्या मित्राच्या वरातीत गेले असताना ,त्यांना त्या वरातीतून जातीय द्वेषाच्या भावनेतून बाहेर काढले जाते. तो प्रसंग लहान ज्योतीच्या मनाला खूप लागतो. मनामध्ये रुततो, तेथेच विचारांचे स्फुल्लींग चेतले जाते. ज्योती तेथून बाहेर पडले, ते परिवर्तनाची आग उरात घेऊनच. त्यांचे मन पेटून उठले.  परिवर्तनाच्या लढ्यासाठी ते सिद्ध झाले. त्यांनी पाहिलं, सामान्य भारतीय समाज अज्ञानी आहे. शिक्षणापासून वंचित आहे. ते गरिबी, दारिद्र्यात खितपत पडले आहेत. त्यांचं शोषण होत आहे. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार, जुलूम होत आहे. सारासार विचारांती त्यांच्या लक्षात आले,या सर्व परिस्थितीचे मूळ अज्ञान आहे. शिक्षण नसल्याने लोकं या अत्याचाराला बळी पडत आहेत. या जाणिवेतूनच त्यांच्या तोंडून प्रेरणादायी उद्गार निघतात....
विद्येविना मती गेली,
मती विना गती गेली,
गती विना नीती गेली,
नीतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
अविद्येच्या परिणामाचे अगदी ओघवत्या भाषेत, मोजक्या व अचूक शब्दात इतर कोणी वर्णन केले असेल, असे वाटत नाही. या वाक्यातून प्रेरणेची बिजे पेरली जातात. विद्येचे महत्त्व अधोरेखित केले जाते. तुमच्या स्थितीला, तुमचे अज्ञान जबाबदार आहे, ही जाणीव केली जाते. सामाजिक स्थितीत पिचलेल्या जनतेचा जगणं सुकर व्हावं, ह्यासाठी झटायला ज्योतिबा तयार होतात. त्यावेळी समाजामध्ये परिवर्तन करणे, तरी सुखकर सुलभ होते का? समाज सुधारणेस विरोध करणारे अधिक होते. इतकेच नव्हे तर आमची ही अवस्था नैसर्गिक आहे. पूर्वाश्रमीच्या पाप- पुण्यामुळे आहे किंवा कोण्या दैवी शक्तीच्या कोपामुळे आहे, अशीच समाज धारणा होती. अशा लोकांमध्ये बदल करणे एक अग्निदिव्यच होते. महात्मा फुले यांनी त्या अग्निकुंडात उडी घेतली होती. परिवर्तनाच्या विरोधकांचे अग्निबाण, वाग: बाण त्यांना दगद्ध करत होते. अक्षरश: घायाळ करणारे होते. काय करत होते ज्योतिबा? कशासाठी सुरू झाली होती त्यांची धडपड? केवळ समाज परिवर्तन आणि समाज परिवर्तन. तरीही एवढा विरोध? विश्‍वास बसत नाही. पण हे वास्तव होते ज्योतिबांना प्रशस्तीपत्र प्रस्थापितांचा विरोध होता जे सामाजिक न्यायाचे विरोधक होते, ते त्यांच्या कार्यात अडथळे आणत होते. अशा विरोधाला भिक घालतील; तर ते ज्योतिबा कसले? ज्योतिबा या सार्‍यांना पुरून उरत होते. आपले कार्य निरंतर पार पाडत होते. ज्योतीबांनी ताडले समाजाला प्रेरणा देण्यासाठी एखादा प्रेरणा पुरुष असावा लागतो. तोही त्यांच्यातील असावा.अशा प्रेरणा पुरुषाच्या चरित्राची प्रेरणा एकदा का लोकांमध्ये पेरली तर लोक त्या निमित्ताने एकत्र येतील. आपल्या समाजकार्याला एक अनुकूल स्थिती मिळेल.याचा विचार करताना त्यांनी मध्ययुगातील कर्म पुरुष ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे कार्य लोकांपुढे ठेवण्याचे ठरविले. येथील बहुतांशी समाज शेतकरी म्हणजे कुणबी आहे. त्यांच्यातीलच राजे, ‘कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजींचे ’कार्य पुन्हा लोकांमध्ये प्रेरणेची ज्योत पेटू शकते, हे त्यांनी ओळखले. ते रायगडावर गेले पाचोळ्यांनी झाकलेली, काहीशी दुर्लक्षित झालेली, राजांची समाधी त्यांनी शोधून काढली. त्यावर फुले वाहिली. महाराष्ट्रात छत्रपतींची जयंती सर्वप्रथम त्यांनी सुरू केली. जोतिबांच्या कार्याने महाराष्ट्रात जागृतता निर्माण झाली. समाज एकत्र येऊ लागला. ज्योतीबांनी अधिक जोमाने कार्याची सुरुवात केली.


मुलींची शाळा सुरू करतानाही त्यांना प्रचंड विरोध आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. मुलींनी शिकणे यालाच विरोध. मुलींनी शिकायचेच नाही यालाच समाज मान्यता. हे मत खोडून काढत मुलींच्या, पालकांच्या मनात शिक्षणाची बीजे पेरणे ही मोठी कसोटी होती. ज्योतिबा त्या कसोटीस उतरले. सावित्रीमाईंना त्यांनी सर्वप्रथम शिकवले. नंतर त्यांना मुलींना शिकवण्यास प्रेरित केले. जसा पेरलेला दाणा जमिनीत गाडून जातो, ऊन, वारा, पावसाशी दोन हात करून, त्यातून अंकुर वाढू लागतो. मग फुलून येतात हजारो दाणे. सावित्रीमाईंचे कार्य त्या गाडून घेणार्‍या दाण्याप्रमाणे आहे. त्यांनी चिखल, धोंडे विरोध स्वीकारला, सहन केला, म्हणूनच त्यांच्या त्या त्यागातून आज सावित्रीच्या लेकी गगनभरारी घेत आहेत. नवी क्षितीजे पादाक्रांत करत आहेत.
सामाजिक कळकळ आणि तळमळ असणारे फुले दांपत्य निस्वार्थ समाजसेवेसाठी झटले. त्यांच्या या कार्यातूनच समाजामध्ये फार मोठे परिवर्तन घडून आले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे महात्मा फुले यांचे कार्य होते. त्यांची जिद्द ,प्रेरणा तरुण-तरुणींसाठी आजही दिशादर्शक आहे. त्यांना अर्धांगवायू होऊन, उजवी बाजू लुळी पडली असतानाही, त्यांनी डाव्या हाताने लिहून आपले पुस्तक पूर्ण केले होते. त्यांचे हेच झटणे आजही सत्यशोधकी कार्य करणार्‍या सर्व तरुणांना प्रेरणादायी आहे.


काळओघात या समाजसुधारकांच्या कार्याकडे काहीअंशी दुर्लक्ष होते की काय?अशी स्थिती निर्माण होताना दिसते. समाजात चंगळवाद, अंधश्रद्धा बोकाळत आहे. आज एक बातमी कानावर आली पैशांचा पाऊस पाडण्यासाठी, एका मातेनेच आपल्या लेकीला एका भामट्याच्या हवाली केले. त्याने वर्षभर तिच्यावर अत्याचार केले. या गोष्टीतून समाजावर आजही अंधश्रद्धेचे गारुड प्रभावी असल्याचे दिसून येते. यासाठी ज्योतिबाचा आसूड, हाती घेऊन समाजमन ढवळून काढण्याची नितांत गरज आहे. विवेकी समाजासाठी काही करू इच्छिणार्‍या तरुणांसाठी जोतिबांचे कार्य निश्चितच प्रेरक आहे. तरुणांनी त्यांची जीवनगाथा समजून घेतली पाहिजे. पुरोहित वर्ग आजही समाजात मोठ्या प्रमाणात फसवणूक व दिशाभूल करत आहे. तरुण-तरुणांनी जोतिबांचे सत्यशोधकी कार्य हाती घेऊन, त्याप्रमाणे सामाजिक, धार्मिक व्यवहार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. यातून पुरोहित वर्गाकडून होणारी समाजाची आर्थिक लूट थांबेल. फसवणूक थांबेल. महात्मा फुले यांच्या जयंती प्रित्यर्थ त्यांना वाहिलेली हीच खरी आदरांजली ठरेल!
   

किशोर कासारे

८७६७४२५१८०

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ऑडिट श्‍वासाचे:राज्यातील ९५ टक्के रुग्णालयांत ऑक्सिजन
स्टॅलिनने शेतकर्‍यांवर रणगाडे घातले; पण, मोदी शेतकर्‍या
विदर्भात बालमृत्यू वाढले, वर्षभरात ३५६ बालकांचा मृत्यू
कोरोनामुळे भारतात ३२ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर
५ जूनला बीडमध्ये भव्य मराठा आरक्षण मोर्चा
चक्रीवादळाची तीव्रता वाढली; गोव्यासह कर्नाटकला झोडपले
सीएए समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवण्याची शाळेची सक्ती
शाळा ही संकल्पना नष्ट होते की काय....?
सरकारने शेतकर्‍यांना मदतीची आशा दाखवून लुटले
मध्यवर्ती जातीच्या लोकांनी सार्‍या देशभरात आंदोलन केल
संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या मुक्ततेसाठी अभिया
फडणवीस सरकारकडून मराठा आरक्षणाची करण्यात आली होती केवळ
शौर्य,साहित्य आणि चारित्र्यसंपन्नतेचा आदर्श संघर्षयोद
३० वर्षांत लिटरमागे ८४ रुपयांची वाढ
नीरव मोदीच्या संपत्तीवर ११ जूननंतर टाच येणार
BRICS देशांमध्ये आरोग्यावर सर्वात कमी खर्च करणारा देश भारत
मराठा आरक्षणप्रश्‍नी फेरविचार याचिका
लसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्य
शेतकरी आंदोलनामुळे काही गावं झालीत कोरोना हॉटस्पॉट
भारतीय ऑक्सिजनसाठी तडफडत असताना ३३ कोटी देवतांपैकी एका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper