×

एनआरआयची भारतात आहे तब्बल ९४ अब्ज डॉलरची गुंतवणूक

Published On :    11 Jul 2019  By : MN Staff
शेयर करा:


काढून घेतल्यास रुपया कोलमडणार





नवी दिल्ली : भारतीय रुपयासाठी चालू आर्थिक वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. अनिवासी भारतीयांना भारतात गुंतवलेली ९४ अब्ज डॉलरची गुंतवणूक यावर्षी मॅच्युअर होणार असून, त्यांनी ही गुंतवणूक काढून  घेतल्यास रुपयाचे मूल्य कोलमडण्याची शक्यता आहे.


अनिवासी भारतीयांकडून भारतात गुंतवलेली रक्कम एकाच वेळी काढून घेण्यात येणार नाही. मात्र पाश्‍चिमात्य देश आणि भारतामधील व्याजदरात फारसा फरक न राहिल्याने काही खाती बंद होऊ शकतात. बरेच अनिवासी भारतीय दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक करण्यावर भर देतात. आता घटत असलेला व्याजदरही यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.


रिझर्व्ह बँकेने २०१९ या आर्थिव वर्षासाठी प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार अनिवासी भारतीयांचे सुमारे १३०.४ अब्ज डॉलर रुपये बँक खात्यात जमा आहेत. त्यामधील  ९४ अब्ज डॉलरची गुंतवणूक यावर्षी मॅच्युअर होणार आहे. अर्थजगतातील विश्‍लेषकांच्या म्हणण्यानुसार हा आकडा सकृतदर्शनी धोक्याचा इशारा देणारा वाटतो. मात्र यापैकी ९० टक्के रक्कम पुन्हा गुंतवली जाते.


मात्र अनिवासी भारतीयांच्या एकूण गुंतवणुकीमध्ये कमी कालावधीसाठीच्या डिपॉझिटची संख्या वाढत आहे. अनिवासी भारतीयांच्या एकूण गुंतवणुकीत एक वर्षाची मॅच्युरिटी कालावधी असणार्‍या डिपॉझिटची संख्या मार्च २०१५ मध्ये ५१ टक्के होती. आता मार्च २०१९ मध्ये हीच आकडेवारी वाढून ७२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.


परदेशातील आणि भारताती व्याजदरांमध्ये  फरक असल्याने अनिवासी भारतीयांकडून भारतीय बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असते. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणामधून व्याजदरांच्या घसरणीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनिवासी भारतीयांकडे भारतात गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळवण्याची संधी राहणार नाही.  





PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी
पावणे अकरा लाख कोटींचे राज्यावर कर्ज
देशाची वाटचाल ‘मेक इन इंडिया’पासून ‘रेप इन इंडिया’कडे
गरिबानं शिकावं की नाही
५ हजार ४५७ उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयां
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जगभरातील ७५० शास्त्रज्ञ,
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर
पीएमओमधील काहींमुळेच अर्थव्यवस्था धोक्यात
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे हिंदू राष्ट्राच्या दिशेने
भारतात गरीब हा गरिबच तर श्रीमंतांचे इमल्यावर इमले!
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक एससी, एसटी, ओबीसीला गुलाम बनवण
एन्काऊंटर आरोपींचा की कायद्याचा’
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी
हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ग
हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
भारतात हाताने, डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा आजही काय
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper