×

ब्राम्हणवाद मानसिकतेने खचलाय, त्या चौकटीला एक जोरदार धक्का द्यायला हवा

Published On :    10 Jul 2019  By : MN Staff
शेयर करा:


जालंधर येथील ईव्हीएम भंडाफोड यात्रेत वामन मेश्राम यांचा हल्लाबोल





जालंधर : आपल्याकडे संघटन शक्तीसह बुध्दीही आहे. त्यामुळे आपल्याला टक्कर देणे एवढे सोपे काम नाही. कायद्याच्याविरोधात जाऊन ते लोक आपल्याविरोधात काम करत आहेत. यावरून ब्राम्हणवाद मानसिकतेने खचला आहे, त्या चौकटीला एक जोरदार धक्का द्यायला हवा, ब्राम्हणवाद गळून पडेल अशा शब्दात बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी ब्राम्हणवादावर हल्लाबोल केला. पंजाब जालंधर येथे आयोजित ईव्हीएम भंडाफोड यात्रेनिमित्त ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे एच.एन.रेकवाल, राष्ट्रीय मागासवर्ग राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल, मनोज पासी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


मेश्राम म्हणाले, हे संविधान व लोकशाही वाचवण्याचे आंदोलन आहे. ब्राम्हणवादाला टक्कर देणे सोपे काम नाही. परंतु आम्ही विचारधारेच्या आधारावर टक्कर देत आहोत. पुलवामा ज्यावेळी हल्ला करण्यात आला. त्या संदर्भात मी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ योजना आखून पाकिस्तानात पाठवण्यात आला. पाकिस्तान टीव्हीवर तो प्रसारित करण्यात आला. ज्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पटना शहरात रॅली करत होते, त्यावेळी त्यांनी या व्हिडीओचा संदर्भ देत काही लोक भारतात राहून पाकिस्तानला मदत करत आहेत. माझे नाव न घेता अप्रत्यक्ष माझ्यावर प्रधानमंत्र्यांनी टीका करणे हे ताकद वाढल्याचे लक्षण आहे. 


आमच्याबरोबर एक संघटनात्मक आणि दुसरी बुध्दीची ताकद आहे. दीर्घ कष्ट केल्यानंतर कुठलाही व्यक्ती महान बनू शकतो. हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुध्दीमत्तेवरून दिसून येत आहे. पूर्वी नव्हे आणि आताही बाबासाहेबांची कुणीही बरोबरी करू शकत नाही. आपल्या बुध्दीच्या जोरावर त्यांनी ब्राम्हणवादाचा पराभव केला असे त्यांनी सांगितले.


केवळ ईव्हीएममुळे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाहीत, त्यासाठी व्हीव्हीपॅट लावा असे ८ ऑक्टोबर २०१३ ला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. परंतु हे लोकांना माहित नाही. कारण ही बातमी मीडियाने प्रसारित व अथवा छापली नाही. मी या मीडियाला नॅशनल मीडिया मानतच नाही. तर ब्राम्हण-बनिया प्रचार माध्यम अशी मी त्याची संभावना करतो. बंगलोरमधील एक पत्रकार त्याला टॉयलेट पेपर म्हणतात. 


सुब्रमण्यम स्वामी यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा होतो याची माहिती त्यांनी सर्वोच्च न्यायालयला दिली. त्यामध्ये चार प्रमुख दोष आहेत हे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ईव्हीएममध्ये ज्यावेळी मत टाकले जाते त्यावेळी ते कुठल्या उमेदवाराच्या नावावर जमा झाले ते दिसत नाही. फिजीकल ईव्हीडन्स मिळत नाही. त्यामुळे फिजीकल व्हेरीफिकेशन होत नाही. रिकाउंटींग होत नाही. हे ते चार प्रमुख दोष आहेत. बॅलेट पेपरमध्ये कुठलेही दोष नाहीत. ईव्हीएम घोटाळा करण्याची मशीन तर व्हीव्हीपॅट घोटाळा पकडणारी मशीन आहे. परंतु २३ मे च्या निकालात जी फॉल्टी मशीन ईव्हीएम आहे त्याचीच गणती केली गेली. परंतु चोरी पकडणार्‍या व्हीव्हीपॅटची गणती झालीच नाही. त्यामुळे घोटाळा झाला असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


द क्विंट या सोशल साईटने लोकसभेच्या ३७८ जागांवर गडबड झाल्याचे म्हटले आहे. २२० जागांवर जास्त व १५३ जागांवर कमी मते मिळाली. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला विचारल्यावर यांची पाचावर धारण बसली. जसे जिल्हाधिकार्‍यांमार्फत डाटा येत आहे तसा थांबून-थांबून आकडेवारी टाकत आहोत असा बचावाचा पवित्रा निवडणूक आयोगाने घेतला. परंतु जास्त मते कशी काय मिळाली असा प्रश्‍न द क्विंटने विचारल्यावर निवडणूक आयोग निरूत्तर झाले. 


त्यानंतर द क्विंटने माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी, गोपाळस्वामी, ब्रम्हा यांना याबात विचारले. त्यावेळी ते म्हणाले, आम्ही माजी आहोत. करंट डाटा विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्तांकडेच असेल. त्यांनी निवडणूक आयोगावरील विश्‍वास वाढेल अशी कृती करायला हवी असे सांगितले. मागितलेला डाटा देण्याऐवजी जो डाटा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्यात आला होता, तो डाटाच निवडणूक आयोगाने उडवून टाकला. यावरून निवडणूक आयोगदेखील ईव्हीएम घोटाळ्यात सहभागी आहे असा आरोप मेश्राम यांनी केला.


दरम्यान एक गुप्त संदेश निवडणूक आयोगाने आपल्या अधिकार्‍यांना पाठवला. जास्त आणि कमी मते निघत आहेत ते ऍडजेस्ट करून खरे-खुरे मिळते-जुळते झाले आहेत असे दाखवा. जेणेकरून लोकांनाही ते बरोबर वाटेल. या गुप्त संदेशाचे पत्र आपल्याकडे आहे. आपलीही एक सीआयडी आहे. पगार सरकारचा घेतात आणि काम आपले करतात. त्या गुप्त संदेशाच्या पुराव्याचे पत्र आपण सर्वोच्च न्यायालयाला सादर करणार आहोत.  


एका आरटीआय कायर्कर्त्याने मशीन बनवणार्‍या कंपनीकडे माहिती मागितली की, तुम्ही निवडणूक आयोगाला किती मशीन पुरवल्या, तर त्या कंपनीने सांगितले की, ४० लाख मशीन दिल्या. त्यावर त्या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाला विचारले, किती मशीन मिळाल्या, तर आयोगाकडून २० लाख मशीन मिळाल्याचे सांगण्यात आले. म्हणजे २० लाख मशीन गायब झाल्या होत्या. हा पुरावा घेऊन एखादा मनुष्य कोर्टात गेला तर आपले बिंग फुटेल म्हणून त्यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेत जीपीएस टॅक सिस्टिम लावण्यात आल्याचे सांतिगले. मात्र जीपीएस ट्रॅक सिस्टिमचाही रेकॉर्ड द्यायला निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली.


नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक झालेली मशीन आणि मोजणी करणारी मशीन वेगवेगळ्या वापरण्यात आल्या. त्यांचे सिरीयल नंबर वेगवेगळे होते. या बाबीचे कॉंग्रेसच्या उमेदवाराने पुरावे देत नागपूर हायकोर्टात निवडणूक आयोगाविरोधात खटला दाखल केला. परंतु निवडणूक आयोगाने उत्तरच दिलेले नाही. आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी असे आदेश दिले होते की, अधिकारी आणि अधिकार्‍यांनी बसून मतांची जुळणी करा व जुळणी झाल्याचे आमच्याकडे पाठवा. 


टाईम्स ऑफ इंडियाने सर्वच मतदारसंघात मतांची जुळणी झाल्याचे खोटी बातमी छापली. ही निवडणूक आयोगाने मॅनेज केलेली बातमी होती. कॉंग्रेस ईव्हीएमविरोधात बोलत नाही. कॉंग्रेस चूप आणि भाजपाही चूप आहे. कारण २००४-०९ व २०१४ व १९ मध्ये प्रत्येकी कॉंग्रेसने आणि भाजपाने घोटाळा करून निवडणुका जिंकल्या. त्यामुळे सोनिया गांधी व राहुल गांधी चूप आहेत. २००४ मध्ये ज्यावेळी कॉंग्रेसने ईव्हीएममध्ये घोटाळा केला त्यावेळी राहुल गांधींना माहित नव्हते. तर डॉ. मनमोहनसिंग व सोनिया गांधी यांना माहिती होती. 


२३ मे रोजी निकाल लागल्यानंतर राहुल गांधींनी भाजपला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. मतांची जुळणी होण्याअगोदर कशा काय शुभेच्छा दिल्या असा सवाल करतानाच राहुल गांधींनी जो कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे यामागे हेच कारण असल्याचे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


कॉंग्रेस आणि भाजपा हे दोघे मिळून संविधान समाप्त करत आहेेत असे स्पष्ट करतानाच विवादास्पद परिस्थितीत कागदांची गणती झाली पाहिजे असा जो सर्वोच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१३ ला निकाल दिला आहे, त्यानुसार कागदांची गणती झाल्यास आम्ही ईव्हीएमवर निवडणूक घेण्यास राजी होऊ शकतो. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्यायला हव्यात अशी आमची मागणी आहे. त्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन निर्माण करून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे हत्यार उपसले जाईल असे मेश्राम यांनी स्पष्ट केले. 


महाराष्ट्रात राज ठाकरे यांचे आम्हांला समर्थन मिळाले आहे. कॉंग्रेस याला साथ देणार नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम आहे. प्रादेशिक पक्ष हे एससी, एसटी, ओबीसींचे आहेत. दोनवेळा कॉंग्रेस व दोनवेळा भाजपाने ईव्हीएममध्ये घोटाळा करून निवडणूक जिंकली. आता दोन्ही पक्षांनी बंद करावे असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात देशव्यापी कॉंग्रेसच्या जिल्हास्तरीय कार्यालयावर आंदोलन केले जाईल. 


कॉंग्रेस संसदेचे कामकाज बंद करू शकते तर ईव्हीएमचा मुद्दा निकालात निघू शकतो. कारण कॉंग्रेसकडे ५३ जागा आहेत. एवढ्या जागा संसद बंद पाडायला पुरेशा आहेत. आगामी काळात बुथ लेव्हलचे संघटन बनविण्याचा मानस आहे. २०० लोकसभा क्षेत्रात २०० प्रभारींची नियुक्ती करून त्यांनीच १८० दिवस परिवर्तन यात्रा काढायची आहे. २०२४ पर्यंत हा कार्यक्रम करून बुथ लेव्हलच्या संघटनेमुळे निवडणूकही जिंकू शकतो असा आशावादही मेश्राम यांनी व्यक्त केला.





PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी
पावणे अकरा लाख कोटींचे राज्यावर कर्ज
देशाची वाटचाल ‘मेक इन इंडिया’पासून ‘रेप इन इंडिया’कडे
गरिबानं शिकावं की नाही
५ हजार ४५७ उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयां
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जगभरातील ७५० शास्त्रज्ञ,
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर
पीएमओमधील काहींमुळेच अर्थव्यवस्था धोक्यात
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे हिंदू राष्ट्राच्या दिशेने
भारतात गरीब हा गरिबच तर श्रीमंतांचे इमल्यावर इमले!
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक एससी, एसटी, ओबीसीला गुलाम बनवण
एन्काऊंटर आरोपींचा की कायद्याचा’
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी
हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ग
हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
भारतात हाताने, डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा आजही काय
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper