×

संयुक्त राष्ट्रांच्या काश्मीरबाबतच्या अहवालावर भारताची टीका

Published On :    9 Jul 2019  By : MN Staff
शेयर करा:


हा अहवाल म्हणजे खोट्या व प्रेरित कथेचा विस्तार





जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाच्या अहवालाबाबत भारताने तीव्र निषेध नोंदवला. हा अहवाल म्हणजे यापूर्वीच्या ‘खोट्या व प्रेरित’ कथेचा विस्तार असून, पाकिस्तानातून उगम पावणारा दहशतवाद या मूळ मुद्याकडे यात दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका भारताने केली. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयुक्तांच्या कार्यालयाने गेल्या वर्षी काश्मीरबाबतचा त्यांचा आजवरचा पहिला अहवाल प्रसिध्द केला होता.


आम्ही यापूर्वीच्या अहवालात उपस्थित केलेल्या अनेक चिंतायुक्त विषयांच्या सोडवणुकीसाठी भारत किंवा पाकिस्तान यांनी ठोस पावले उचललेली नाहीत, असा दावा सोमवारी प्रसिध्द झालेल्या अद्ययावत अहवालात करण्यात आला आहे.


मे २०१८ ते २०१९ या कालावधीत काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर येथे बळी गेलेल्या नागरिकांची संख्या बहुधा दशकभराच्या कालावधीतील सर्वाधिक संख्या असावी, असे या ठिकाणच्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्र मानवाधिकार अहवालात नमूद केले आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या नव्या अहवालात म्हटले आहे.


संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयुक्तांच्या कार्यालयाचा हा ताजा अहवाल म्हणजे जम्मू-काश्मीरबाबतच्या यापूर्वीच्या खोट्या आणि प्रेरित कथेचा विस्तार आहे, अशी टीका परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्लीत केली. या अहवालातील विधाने भारताचे सार्वभौमत्व आणि भौगोलिक एकात्मता यांचे उल्लंघन करणारी असून, सीमेपलीकडून होणार्‍या दहशतवादाच्या मूळ मुद्याकडे यात दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे पत्रकारांनी या अहवालाबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी सांगितले.


गेली अनेक वर्षे पाकिस्तानातून होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे त्यात बळी गेलेल्यांचा संदर्भ न देता ‘विश्लेषण’ करण्यात आले आहे, असे कुमार म्हणाले. आम्ही ज्या मुद्यांबाबत चिंता व्यक्त केली होती, त्यांच्या सोडवणुकीसाठी भारत किंवा पाकिस्तान या दोघांनीही काही ठोस पावले उचलली नाहीत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये, भारतीय सुरक्षा दलांच्या सदस्यांनी केलेल्या मानवाधिकार उल्लंघनासाठीचे उत्तरदायित्व जवळजवळ अस्तित्वातच नाही, असाही उल्लेख अहवालात करण्यात आलेला आहे.






PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपा सरकारकडून शालेय शिक्षण निधीमध्ये ३ हजार कोटींची क
जामिनासाठी घातलेल्या अटी शिथिल करण्यासाठी आरोपी डॉक्टर
स्टेट बँकेची १२ हजार कोटींची थकीत कर्जे गायब
जातनिहाय जनगणनेतूनच ओबीसींना न्याय, ओबीसी जनगणना परिषद
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला बुद्धिजीवी वर्गाचा विरोध
गुजरात दंगलीतून नरेंद्र मोदींना क्लीन चीटची मेहरबानी
आंध्र प्रदेश सरकारचा नवा कायदा, बलात्काराचा खटला १५ दिवस
अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी
पावणे अकरा लाख कोटींचे राज्यावर कर्ज
देशाची वाटचाल ‘मेक इन इंडिया’पासून ‘रेप इन इंडिया’कडे
गरिबानं शिकावं की नाही
५ हजार ४५७ उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयां
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जगभरातील ७५० शास्त्रज्ञ,
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर
पीएमओमधील काहींमुळेच अर्थव्यवस्था धोक्यात
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे हिंदू राष्ट्राच्या दिशेने
भारतात गरीब हा गरिबच तर श्रीमंतांचे इमल्यावर इमले!
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक एससी, एसटी, ओबीसीला गुलाम बनवण
एन्काऊंटर आरोपींचा की कायद्याचा’
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper