×

गटारगंगेचा मुख ‘आरएसएस’ असल्याने त्यांच्या मुख्यालयाला घेराव

Published On :    22 Sep 2022  By : MN Staff
शेयर करा:


विदेशी ब्राम्हणांचा राष्ट्रवाद आतंकवादावर टिकलेला-‘द थिंक’ने घेतलेल्या मुलाखतीत डॉ.विलास खरात यांचा हल्लाबोल (भाग-१)

नवी दिल्ली: गटारगंगेचा मुख ‘आरएसएस’ असल्याने त्यांच्या मुख्यालयाला घेराव घालण्यात येत असून विदेशी ब्राम्हणांचा राष्ट्रवाद आतंकवादावर टिकलेला आहे अशा शब्दात डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरचे डायरेक्टर डॉ.विलास खरात यांनी आरएसएसवर हल्लाबोल केला. ‘द थिंक’ च्या पत्रकार इंजिनिअर स्नेहा यांनी घेतलेल्या मुलाखतीत डॉ.विलास खरात बोलत होते.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरमार्फत एक नवीन इतिहास समोर आणण्याची काय गरज आहे? असा सवाल ‘द थिंक’च्या पत्रकार इंजिनिअर स्नेहा यांनी डॉ.विलास खरात यांना विचारला, त्यावर बोलताना डॉ.खरात म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देहांत झाल्यानंतर या चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी जे लोक पुढे आले, त्या लोकांनी दुश्मनासोबत समझोता केला.  त्यामुळे कांशीरामजी म्हणायचे, ज्या लेप्टनंटच्या हातात या चळवळीची दिशा होती, ते दुश्मनाला मजबूत करत होते. त्यावेळी सरोजिनी नायडू यांचे एक स्टेटमेंट होते, जीवंत आंबेडकरांपेक्षा मृत झालेले आंबेडकर जास्त धोकादायक आहेत. तर मृत झालेल्या आंबेडकरांपासून दुश्मनाला भीती का वाटत होती? तर त्यांचे विचार व विचारधारा. आजच्या घडीला आमच्या दृष्टीकोनातून प्रत्येक विचारांचा तर्क केला पाहिजे. इतिहासाला समाजवादी, साम्यवादी दृष्टीकोनातून पाहिले जाते. कॉंग्रेसचे विचारधारावाले लोक आहेत, आरएसएसचे फेकामफाक करणारे लोक आहेत. तर फुले, शाहू, आंबेडकराईट दृष्टीकोनातूनही प्रत्येक बाबीचा तर्क करू शकतो. चौकशी करू शकतो. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरची जरूरत आम्हांला वाटली.


इतिहासामध्ये काही बनावट गोेष्टी समोर आल्या, काही चुकीच्या गोष्टी मिक्स करण्यात आल्या,  ब्राम्हणायझेशन त्याचे झाले आहे, आताच्या घडीला आरएसएसच्या माध्यमातून एक संदेश दिला जात आहे, एक कॅडर दिला जात आहे, ज्या गोष्टी धर्माच्या विरोधात आहेत, मग हिंदू धर्म असो अथवा ब्राम्हण धर्म असो. मनुस्मृतीला धरून आंबेडकराईट व बहुजनवादी लोक नेहमीच म्हणतात की, मनुस्मृती एससी व महिलाविरोधी आहे, शुद्र-अतिशुद्रांचा अपमान करते, मात्र आरएसएसचा कॅडर समोर येतो तेव्हा तो म्हणतो, असे काही नाही. जॉन्स विल्यम्स केलेल्या भाषांतराची ती देण आहे, ओरिजिनल मनुस्मृती आहे ती तर महिलांना देवी मानते, याकडे आपण कसे पहाल? या प्रश्‍नावर डॉ.खरात म्हणाले, सर विल्यम्स जोन्स कलकत्ता कोर्टाचे न्यायाधीश होते. रॉयल सोसायटीला जन्म देण्याचे कामही सर विल्यम्स जोन्स यांच्या माध्यमातून झाले. विल्यम जोन्स यांना जिज्ञासा झाली की, अल्पसंख्य ब्राम्हण देशावर कसे काय राज करतात? त्यांचा सिक्रेट लॉ काय आहे? तर त्यांनी १७९२ मध्ये मनुस्मृतीचा अनुवाद केला हे खरे आहे. अनुवाद करण्यासाठी काशी येथील ब्राम्हणांनी त्यांना आर्थिक मदत केली. 


आरएसएसचे ब्राम्हण असे म्हणतात, विल्यम जोन्स अधुरीच बात करत आहेत, ब्राम्हणांना दक्षिणा दिली आणि आम्ही तुम्हांला शब्द न शब्द अनुवाद करण्यासाठी मदत करू शकतो. मात्र आमचे नाव सांगू नका. या आधारावर आरएसएसचे लोक खोटे बोलत आहेत, त्यांनी पुरे बोलायला हवे. ब्राम्हण आणि आरएसएसच्या ब्राम्हणांचा खरे बोलण्यासाठी कुठलेही नाते नाही. त्यांचा दूरदूरचा संबंध नाही. दुसरी बात ब्राम्हण लोक मनुचे समर्थन का करत आहेत? संविधान असताना मनुचे समर्थन करणे पाप आहे. ते त्यांच्या चेलेचपाटे यांच्या माध्यमातून मनु चांगला आहे असे सांगत आहेत तर भागवत यांच्या लोकांनी आमच्याशी डिबेट करावे. आम जनतेला तुम्ही फसवू शकता. लढाई करायची आहे. कुस्ती खेळायची आहे तर बरोबर असलेल्या पैलवानाबरोबर खेळायला हवे. मनुस्मृती काय आहे? उदाहरणासाठी तुम्हांला सांगत आहे की, १९१० ची गोष्ट असेल, उत्तर प्रदेशमध्ये २०११ मध्ये एका निवृत्त न्यायाधीशाने सांगितले की, बनारसमध्ये एक ब्राम्हण महिला होती, ती विधवा होती, तिला एक मुलगी होती. तिची मुलगी मोठी झाली. त्या विधवा महिलेने आपल्या मुलीचे लग्न लावले. तिचा जावई ब्राम्हणच होता. काही वर्षे गेल्यानंतर तिला एक वाईट बातमी समजली की, तिच्या जावयाने तिच्या मुलीला काही रूपयात विकले. ती संतप्त झाली. ती रडायला लागल्यानंतर काही सज्जन लोकांनी तिला सांगितले की, आता ब्रिटीशांचे राज आहे, तुम्ही त्यांचाकडे जा. ब्रिटीश कालखंडात कोर्टात खटला चालला. काही पैशासाठी माझ्या मुलीला माझ्या जावयाने विकून टाकले आहे असे कोर्टात सांगितले.  त्यावेळी ब्रिटीश लोक हैराण झाले हे कसे काय संभव आहे? आपल्या बायकोला कोण विकून टाकू शकतो? त्यामुळे कोर्टात तिला पार्टी बनवण्यात आली. कायदेशीरदृष्ट्या मुद्दा बनवला गेला की, महिला क्रय वस्तू आहे का? काय, महिला विक्री करण्याची वस्तू आहे का? या आधारावर तो खटला चालला एक न्यायाधीश होता. जास्त क्रिटीकल खटला असल्याने तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे तो खटला चालला. १९१७-१८ ला निर्णय आला, त्यावेळी ब्राम्हण लोकांनी काही पुरावे आणले, त्यामध्ये मनुस्मृती एक पुरावा होता. धर्मग्रंथ पुरावा आणला. आम्ही महिलांची विक्री करतो महाभारतात उदाहरण आहे. पाच लोकांनी एक महिलेला जुवेला लावले होते. ती महिला हारली आणि ब्राम्हण जिंकला. याचा अर्थ आपल्या आधारावरच तो तसा निर्णय झाला. दुसरी बात मनुस्मृतीत महिलांना गुलाम, पापी, दुराचारी, पापाची जननी म्हटले. कुठल्या आधारावर समर्थन करणार आहात ब्राम्हणांनो? ओबीसीला शुद्र म्हटले. मनुस्मृतीचे समर्थन करणारा व्यक्ती संविधानविरोधी आहे. आरएसएसचे लोक संविधान असताना मनुला आपले संविधान मानत आहेत.  आम्ही अनेकदा हेच ओरडून सांगत आहोत की, आरएसएसवर बंदी घातली पाहिजे. आरएसएस संविधानाला मानत नाही. हेच तर आम्ही सांगत आहोत.


आरएसएस व ब्राम्हणांचा उल्लेख आला आहे. ट्विटरवर एक ट्रेंड सुरू आहे, आपल्या माहितीतही असेल की, आरएसएस मुख्यालयाला घेराव. एक टेंड्र सुरू आहे. जबरदस्त ट्रेंड चालू आहे. मोठ्या प्रमाणात एससी, एसटी, ओबीसीचे लोक आहेत तेदेखील त्याचा वापर करत आहेत. आरएसएसला ट्रोलदेखील करत आहेत. आम्ही संसदेचा घेराव ऐकला आहे. मुख्यमंत्र्यांना घेराव ऐकला आहे. आमदार व खासदारांना घातलेला घेराव आम्ही ऐकला आहे. परंतु बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हा घेराव घालण्यात येत आहे. त्यात वामन मेश्राम आणि आपण लीड करत आहात. का घेराव घालणार आहात? या प्रश्‍नावर डॉ.विलास खरात म्हणाले, संविधानात काय लिहलेले आहे. तर देशाचा एक प्रधानमंत्री असेल. सत्ताधारी व विरोधी पक्ष असेल. संविधानात असे लिहलेले नाही की देशाच्या बाहेर कुणाच्या चरणावर लोळण घ्यावी. ज्यावेळी भाजपाची सत्ता आली तेव्हा प्रधानमंत्र्यांनी आपल्या मंत्रीमंडळासोबत संघ कार्यालयात पोहचले व मोहन भागवत यांच्या चरणावर लीन झाले. काय हे संविधानाच्या विरोधात नाही. मात्र नरेंद्र मोदी मुखवटा आहेत, देशाला आरएसएसचे लोक चालवत आहेत. आरएसएसचे ब्राम्हण लोक चालवत आहेत. नीती आरएसएस आखत आहे. सत्तेवर नियंत्रण आरएसएस करत आहे. न्यायालयाचा निर्णय काय व्हायला हवा, पाच न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की, आमच्यावर वर्तमान सरकार दबाव टाकत आहे. त्या पाच न्यायाधीशांमध्ये न्या. गोगोईदेखील होते. 


आरएसएस-भाजपाने गोगोई यांना ब्लॅकमेल करून जो बुद्धांचा वारसा ज्याच्यामध्ये आहे, त्या बुद्धांना दूर सारले आणि मुसलमानांना पाच एकर जागा देऊन त्यांचा विषय संपवून टाकला. बुद्धीस्ट वारसा स्थळावर कब्जा केला. तर आमचे मत असे आहे की, देशात भाजपा काम करत नाही तर आरएसएस काम करत आहे. देवेंद्र फडणवीस कोण आहे? मूलत: आरएसएसचे प्रचारक आहे. त्यानंतर ते सत्तेत जातात. आरएसएस फॅक्टरी आहे. येथून निघाल्यावर ते भाजपा नामक दलात जातात. आमचा आरएसएसविरोधात मोर्चा का जात आहे तर पहिली बाब ते संविधानाला मानत नाहीत. दुसरी बाब ते खुलेआमपणे एससी, एसटी, ओबीसींच्या अधिकाराचे हनन करत आहेत. त्यांनी १०० टक्के खासगीकरण केले. देशाला विकले आणि संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. आमची रोहतकमध्ये डीएनए परिषद होती, त्या परिषदेत डीएनएनुसार ब्राम्हण हा विदेशी आहे असा विषय होता. ब्राम्हणांना कुठली आपत्ती होती तर ते कोर्टात गेले असते. कोर्टात जावून विषय सोपा झाला असता. जो ब्राम्हण आपत्ती करत आहेत त्यांचादेखील डीएनए टेस्ट झाला असता. ज्यांच्याविरोधात आपत्ती करत आहेत त्यांचादेखील डीएनए टेस्ट झाला असता. तर जजमेंट डीएनएच्या आधारावर आला असता. किंवा त्यांनी काऊंटर कार्यक्रम करायला हवा होता. डीएनएननुसार ब्राम्हण विदेशी आहेत, स्टेप पॅस्टॉलिरिस्ट त्यांचे ओरिजिनल नाव आहे. ते विदेशी आहेत. हे जगाला माहित आहे. मात्र भारतीय जनतेला मूर्ख बनवण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून ब्राम्हण स्वत:ला मूलनिवासी बोलत आहे. राखीगढी उत्खननात त्यांचा डीएनए मिळालाच नाही. डीएनए कॉन्फरन्सला रोखण्यासाठी त्यांनी षड्यंत्र केले. कानपूरमधील ३७ व्या राज्य अधिवेशनाला रोखलेच नाही तर १४४ कलम लावले. त्याचवेळी आम्ही घोषणा केली, हरियाणात व गुजरात, उत्तर प्रदेशात भाजपाची सरकार आहे. आम्हांला तीन राज्यात रोखले जात आहे. देशात संविधान आहे. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. भाषण स्वातंत्र्य आहे. संविधानाच्या कक्षेत राहून संघटन चालवण्याचे स्वातंत्र्य आहे. आरएसएसचे लोक सत्तेचा दुरूपयोग करत असून खरे सांगणार्‍या विद्रोही लोकांना ते रोखत आहेत. त्यामुळे आम्ही घोषणा केली की, जिथून हा आजार आला आहे. तेथून जी गटारगंगा येत आहे त्याचा मेन होल तेथे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागेवर ते रोखले जाऊ शकत नाही. जेथून त्याचा स्त्रोत वाहत आहे. तिथूनच त्या गटारगंगेला रोखावे लागणार आहे. त्यासाठी आम्ही आरएसएस हेडक्वॉर्टरला घेराव करत आहोत. केवळ देशभरात नाही तर सार्‍या जगाचे समर्थन आम्हांला मिळत आहे.


आपले जे आंदोलन सुरू आहे. त्यातून आणखी एक बाब समोर येत आहे की, आरएसएसचा अजेंडा हिंदुत्व राष्ट्र असा आहे. आपण बात करत आहात त्याच्या विपरित मात्र लोक हिंदू राष्ट्राच्या समर्थनात आहेत, ते सरकारी कंपन्यांची विक्री करत आहेत असे आपण म्हणता, हे खासगीकरण आहे असे लोक म्हणतात, हे लोकांमध्ये असलेला भ्रम दूर होत नाही. कुठेना कुठे हिंदुत्वाच्या अजेंड्याशी लोक आहेत. बामसेफ हिंदुत्वाच्या अजेंड्याविरोधात काम करत आहे, लोक आपल्यासोबत आहेत की नाहीत? या प्रश्‍नावर डॉ.खरात यांनी सांगितले की, रोहतक डीएनए परिषदेदरम्यान जाट लोकांना त्यांनी सोबत घ्यायचा विचार केला तेव्हा जाट म्हणाले, आम्ही तुमच्यासोबत का येऊ? आम्ही बामसेफसोबत आहोत. तेथे ब्राम्हण लोकांनी विरोध केला. भाजपाच्या ब्राम्हणांनी विरोध केला, भाजपामध्ये असलेल्या ओबीसींनी त्यांना समर्थन दिले नाही. आरएसएसमध्ये जे काम करणारे आहेत त्यांनी त्यांचे समर्थन केले नाही. कानपूरमध्ये ब्राम्हणांनी ‘मैं हूँ ब्राम्हण महासभा’ या नावाने विरोध केला. ओबीसीच्या लोकांनी त्यांना समर्थन केले नाही. तर मी तुम्हांला सांगतो की, ब्राम्हणासोबत ओबीसी नाही. ब्राम्हणासोबत ओबीसी असता तर मध्यप्रदेशात एक समाज आहे ते सारे रस्त्यावर का आले असते. भाजपामध्ये काम करणारा त्यांचाच व्यक्ती आहे. ओबीसी लोकांनी त्यांचा विरोध केला. त्यामुळे त्यांच्यासोबत कुणीच नाही. मीडियावर जे सांगितले जात आहे ते खोटे आहे. जमीनीवर काय आहे? अंजना ओम कश्यप जाते का? अंजना ओम कश्यप जाते तेव्हा तिच्यासमोर लोक शिवी देतात. याचा अर्थ विद्रोह होत आहे. जो मीडिया सांगत आहे ते खोटे आहे. मेकअप करून मोदींना उभे करणे. मेकअप करून समाजाचा नेता कसा काय होऊ शकतो? असा सवाल डॉ.खरात यांनी केला.PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
देशसेवा करू इच्छिणारा कधीच अग्निवीर बनणार नाही
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ७० ट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper