×

अशोक स्तंभ बदलणारे संविधान का बदलणार नाहीत?

Published On :    30 Jul 2022  By : MN Staff
शेयर करा:


देशात एकहाती सत्ता दिल्यास हुकुमशाही येण्यास वेळ लागत नाही, असे अनेक जाणकारांनी म्हटले आणि लिहून ठेवले आहे. त्यात विरोधी पक्ष जर निद्रिस्त अवस्थेत असेल तर देशाचा व देशातील प्रतिकांचा सत्यानाश होण्यास वेळ लागत नाही. हे आज तरी तंतोतंत लागू पडते.





देशात एकहाती सत्ता दिल्यास हुकुमशाही येण्यास वेळ लागत नाही, असे अनेक जाणकारांनी म्हटले आणि लिहून ठेवले आहे. त्यात विरोधी पक्ष जर निद्रिस्त अवस्थेत असेल तर देशाचा व देशातील प्रतिकांचा सत्यानाश होण्यास वेळ लागत नाही. हे आज तरी तंतोतंत लागू पडते. कारण देशात जे सरकार आहे ते ईव्हीएम मशिन्सची पैदास असून कॉंग्रेसने केलेल्या कारनाम्याची ही लोकांसमोर आलेली आपत्ती आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. 


कारण हे दोन्ही पक्ष ‘मिल बाटके खानेवाले और लोगों के बहोत बहोत चाहनेवाले’ पक्ष आहेत. त्यामुळे मा. कांशीराम म्हणत की, कॉंग्रेस आरएसएस की, मॉं है !, त्याच आरएसएस निर्मित भाजपची पिलावळ सत्तेच्या मस्तीने नवनवे उपद्व्याप करताना दिसत आहे. हा उपद्व्याप म्हणजे राष्ट्रीय चिन्हाची हेळसांड हे संघ धार्जिणे लोक करत असताना मात्र आमचा बहुजन समाज आपली बायको लेकरं अन् बायकोची साडी यापलीकडे समाजात काय चालले हे पहायला तयार नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते नवीन संसद भवन येथे बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण झाले. तेव्हा तो स्तंभ पाहून मोदी सरकारला असा अक्राळ-विक्राळ स्तंभ उभारून नेमके काय साध्य करायाचे आहे? असा प्रश्‍न अनेकांना पडल्यामुळे यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. या वादात अनेकांचे बेगडी प्रेम व्यक्त होताना दिसत आहे. 


या वादात अभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेत एक ट्विट करत म्हणतात की, नव्या अशोक स्तंभावरील सिंह हा स्वतंत्र भारतातील आहे. आणि सिंहाला दात असतील तर तो दाखवणारच तो स्वातंत्र्यातील सिंह आहे. गरज लागली तर तो चावेल सुद्धा असे म्हणत त्यांनी या सिंहाच्या चेहर्‍याची भावमुद्रेची पाठराखण करणारी भूमिका घेतली आहे. त्या दिसण्यास व बुद्धीने अर्धचंद्र असलेल्या अनुपम खेर यांना विचारावे वाटते की, आज जे राष्ट्रीय चिन्हाची हेळसांड करत आहेत ते स्वातंत्र्य लढ्यात सामिल होते का? ज्यांच्या धमन्यात केवळ षंढत्वाचं रक्त वाहत आहे त्यांच्याकडून स्वातंत्र्याच्या गप्पा झोडणे म्हणजे सत्तेत बसलेल्या भाजपच्या तृतीय पंथीयांकडून लहान मुलाला पाजण्यासाठी दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे.


यासंदर्भात, संजय सिंह यांनी एक ट्विट शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. मला १३० कोटी भारतीयांना विचारायचे आहे की, राष्ट्रीय चिन्ह बदलणार्‍यांना ‘देशविरोधी’ बोलायचे की नाही? मी १३० कोटी भारतीयांना विचारू इच्छितो की जे राष्ट्रीय चिन्ह बदलतात त्यांना ‘देशद्रोही’ बोलावे की नाही? असा त्यांनी प्रश्‍न केला. तणमूल कॉंग्रेसचे खा. जवाहर सरकार यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. 


मोदी सरकारने आपल्या राष्ट्रीय चिन्हाचा, भव्य अशोक स्तंभाचा अपमान केला आहे. मूळ अशोक स्तंभ शांत, संयमी, सुंदर आणि डौलदार आहेत. तर मोदींनी अनावरण केलेला अशोक स्तंभ रागीट, असुरक्षित हिंसेचे प्रतीक वाटत आहे. त्यामुळे नवीन इमारतीवरील अशोक स्तंभ ताबडतोब बदलावा अशी मागणीही त्यांनी केली. तसेच संभाजी ब्रिगेडचे संघटक संतोष शिंदे म्हणाले की, नरेंद्र मोदी साहेब तुम्ही नवी संसद नवीन अशोक स्तंभ बनवणार पण तुम्ही नवीन भारत बनवू शकत नाहीत. 


तुम्ही धर्मांध व जातीयवादी भारत बनवू शकता पण संविधानाचा जागर करू शकत नाहीत. नवीन संसदेवर अशोक स्तंभ बसवला गेला त्यातील सिंह उग्र हिंस्त्र  डरकाळी फोडणार बसवला त्यामुळे मित्रांनो आज यांनी अशोक स्तंभ बदलला उद्या भारतीय संविधान बदलतील. जणू काय मोदींना हा देश गिळून टाकायचा आहे अशी भावमुद्रा त्यांनी सिंहाची केली आहे असे म्हणाले. https://youtu.be/i1Em2elTsRehY 


ह्या संघोट्या पिलावळींनी दिल्ली येथील जंतर मंतर येथे संविधान दहन केले त्याच वंशाच्या पिलावळीच्या हाती सत्तेची सुत्रे आहेत त्यामुळे अशा विकृतींचा नायनाट करायचा असेल तर केवळ बॅलेट पेपरची मागणी करून त्या मताच्या अधिकाराच्या माध्यमातून यांचा कृष्णा भास्कर केल्याशिवाय पर्याय नाही.


भारताचे राष्ट्रीय प्रतिक म्हणजेच आपली राजमुद्रा, सारनाथ येथील अशोक स्तंभावरूनच घेतलेली आहे. सारनाथ येथील स्तंभ खूप प्रसिद्ध आहे. हा अशोक स्तंभ मौर्य साम्राज्याचे तिसरे शासक सम्राट अशोक यांनी निर्माण केला आहे. त्याशिवाय त्यांनी भारतात असे अनेक स्तंभ निर्माण केलेले आहेत. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणून हे स्तंभ खूप प्रसिद्ध आहेत. बौद्ध धम्माचे अखंडतेचे प्रतिक म्हणून हे स्तंभ उभारण्यात आलेले आहेत. या स्तंभावर चार सिंह आहेत. 


हे चारही सिंह चार दिशांना तोंड करून उभे आहेत. या सिंहांच्या खाली हत्ती, घोडा, सिंह आणि बैल इ. प्राण्यांचे चित्र कोरले आहे. स्तंभावर एक चक्र आहे या चक्राला अशोक चक्र असे संबोधतात. स्तंभावर कमळाचे फुल देखील कोरलेले आहे. यात जे सिंहाचे प्रतिक दाखवले आहे तो सिंह म्हणजे शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतिक आहे. हे सिंह गर्जना करत आहेत असे दर्शविले गेलेले आहे. 


ही गर्जना म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार असा अर्थ मानला जातो. तसेच बौद्ध धम्मात सिंहाला खूप महत्वाचे मानले गेले आहे. तर घोडा म्हणजे गती आणि उर्जेचे प्रतिक आहे तसेच बैल म्हणजे कठोर परिश्रम, मेहनत आही स्थिरतेचे प्रतिक आहे. तर हत्ती म्हणजे अफाट सामर्थ्याचे प्रतिक आहे. या प्राण्यांशिवाय स्तंभावर २४ आरे असलेले एक चक्र देखील आहे. या चक्राला अशोक चक्र म्हणतात. 


चक्रातील २४ आरे मनुष्यातील २४ गुणांचे वर्णन करतात. काही इतिहासकारांच्या मते हे २४ आरे दिवसातील २४ तास दर्शवितात. म्हणून या चक्राला ‘समय’ चक्र देखील म्हणतात. त्यामुळे सांगावेसे वाटते की, देशात नथुरामचा जागर करणारे विदेशात फिरताना बुद्धांचे नाव घेऊन फिरतात, कारण ह्यांच्या हेडगेवार, गोळवलकर, शामाप्रसाद मुखर्जी, सावरकर गोडसे यांना देशाबाहेर फिरस्ती श्‍वास देखील ओळखत नाही. बाहेर ओळखण्यासाठी कार्य म्हत्वाचे आहे. ह्यांचं कार्य पृष्ठभाग थंड करणे आणि करून घेणे त्यापलीकडे ह्या षंढांचे काय काम आहे?


नवीन संसद भवनावर उभारण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर विरोधी पक्षांनी प्रधानमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रधानमंत्री मोदींनी संसदेच्या आवारामध्ये केलेल्या पूजेवरुनही आक्षेप घेत यामुळे भारताची सर्व धर्मसभावाची भूमिका यामधून दिसून येत नसल्याची टीका केली आहे. 


संसदेच्या नवीन इमारतीच्यावर राष्ट्रीय बोधचिन्हाचं अनावरण करतेवेळी प्रधानमंत्र्यांनी पुजेचा घाट बांधणे योग्य आहे का?त्यांनी खुशाल काकड आरती माकड आरती करून पुजा करत बसावी त्याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही पण जर ते संविधानिक पदावर बसून असले फडतूस चाळे करणार असतील तर आम्ही त्याचा निषेध का म्हणून करू नये? नरेंद्र मोदींनी आपण संविधानिक पदावर आहोत याचे भान ठेवले पाहिजे. पण, ज्यांच्या मस्तकाला रेशिमबागेचा विषाणू डसला आहे. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार आहोत? 


मोदींच्या ह्या गैरवर्तनुकीमुळे समाजातून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत त्यात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी ट्वीट करत म्हटले की, संविधान आपल्या संसदेच्या, सरकारच्या आणि न्यायव्यवस्थेच्या शक्ती एकमेकांपासून वेगळ्या ठेवते. सरकारचे प्रमुख या नात्याने प्रधानमंत्र्यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्यावर राष्ट्रीय बोधचिन्हाचं अनावरण करणं योग्य नाही, त्यांनी सर्व संसदीय नियमांची पायमल्ली केली आहे तर लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात. 


लोकसभा ही सरकारपेक्षा गौण नाहीय असही ते म्हणाले. तर सीपीआय (एम)चे नेते सिताराम येच्चुरी हे म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी नवीन संसदेच्या इमारतीवर राष्ट्रीय बोधचिन्हाचं अनावरण करतेवेळी त्यांनी पूजा केली. आपल्या संविधानामध्ये प्रत्येक भारतीयाला त्यांच्या विचारणीनुसार धार्मिक मान्यतांवर विश्वास ठेवण्याचा अधिकार आणि संरक्षण देण्यात आलं आहे. मात्र त्याचवेळी संविधानाने सरकारचा कोणताही धर्म नसतो असं स्पष्ट केलंय त्यामुळे हे संविधानातील नियमांचं उल्लंघन आहे. 


संविधानात लोकशाहीच्या तिन्ही वेगवेगळ्या तत्वांना वेगळं स्थान आहे- कार्यकारी (सरकार), विधिमंडळ (संसद आणि राज्यांच्या विधानसभा) आणि न्यायपालिका. तसेच कॉंग्रसेचे नेते आणि प्रतोद मणिकम टागोर यांनीही ट्विटरवरुन म्हटले की, अध्यक्ष महोदय, संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असतात. इथं विरोधी पक्षाचे नेते कुठे आहेत? माझ्या मते हे काही भाजपाचं कार्यालय नाही.


त्यामुळे बहुजन समाजाला सांगावेसे वाटते की, भाजपची सत्ती ही देशातील केवळ ३३ टक्के लोकांची पसंती आहे बाकी ६७ टक्के लोकांना ही ब्राम्हणी-मनुवादी व्यवस्था नको आहे. ह्या लोकांना सांगावेसे वाटते की, देशाच जे मानांकन अशोक स्तंभ यात जसे  ते छेडछाड करू शकतात तसेच ते तुमचे मुलभूत हक्क म्हणजे भारतीय घटनेचे कलम १९ मध्ये जो बोलण्या लिहण्याचा अधिकार दिला आहे त्यात बदल करू शकतात. 


कारण संसदेतील भाषणात अनेक शब्दांवर अनेक निर्बंध या मनुच्या व्यवस्थेने घातले आहेत. त्यामुळे वेळीच डोळे उघडा अन्यथा तुम्ही कसे रहावे कसे आणि किती बोलवे याची नियमावली रेशिमबागेच्या मस्तकातून निघाल्यास नवल वाटू देऊ नका. तेव्हा अजून वेळ बाकी आहे ही मनुवादी व्यवस्था पायदळी तुडवायची असेल तर त्यावर एकमात्र उपाय म्हणजे ईव्हीएम बंदीसाठी जनांदोलन उभारून मताचा अधिकार बजावण्यासाठी केवळ बॅलेट पेपरचीच मागणी करा. 


तुमचे हक्क अधिकार हा माणूस कधीच वाचवू शकणार नाहीत ते वाचवायचे असतील तर त्यासाठी आधी बॅलेट पेपरवर सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या पाहिजेत. तेव्हा उठा संघर्षाची तयारी ठेवा. कारण संघ धार्जिणे लोक ज्यांनी आज अशोक स्तंभ बदलला ते उद्या संविधान का बदलणार नाहीत? त्यामुळे ही मनुची व्यवस्था पायदळी तुडवा, त्यातच तुमचे भले होणार आहे. अन्यथा तुमचा आणि सर्व समाजाचा सत्यानाश तर अटळच आहे.

नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२६३६६६२



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय महापरिवर्तन मोर्चाची स्थापना, 32 प्रादेशिक पक्
महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत पुन्हा सर्वसाामान्यां
ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या वाढली, तर ऑगस्ट 2023
जन्माचा दाखला देशभरात महत्त्वाचा पुरावा, आता आधार कार्ड,
साता़रात इ.स. १९१९ पर्यंत शिवाजी महाराजांची वाघ नखे असल्
भाजपा सरकार लवकरच बुडणार, आरएसएस संघटना आणि भाजपा सरकारच
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने कर्ज काढून जन
भाजपा नेत्यांची 80 टक्के भडकाऊ व जातीयवादी वक्तव्ये आणि ध
विदर्भ व मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी जात प्
जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, युुनोला युद्ध थांबवण्
नेत्यांकडून मुस्लिम द्वेषात व मुस्लिम धर्माविषयी वादग्
नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात
देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नको आहेत, त्यांच्या हाता
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या सरकारकडून जाणुनबुजून स
2 वर्षात डेंग्यूच्या आजाराने 600 मृत्यू, तर 4 लाख लोकांना डे
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीचेे 2 प्लांट बंद कर
शिरूर तालुक्यातील जांबूत येथील घरकूल घोटाळा प्रकरणी बह
भारत देशात बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, नाहीतर निवडणूक आ
आरएसएस या आतंकवादी संघटनेचा प्रमुख विदेशी ब्राम्हण मोह
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper