×

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एका खासदारावर खर्च केले ९०० करोड

Published On :    8 Jan 2022  By : MN Staff
शेयर करा:


निवडून आणण्यासाठी काळ्या धनाचा वापर, देशाला वाचवण्यासाठी भाजपाचा पराभव गरजेचा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या अलीगढ येथील महारॅलीत वामन मेश्राम यांचा निशाणा





अलीगढ: जे लोक काळ्या पैशांचा वापर करून सरकार बनवतात ते गरीबांचे कधीच कल्याण करू शकत नाहीत. आमच्याकडे जनधन असल्याने मोठ्या महारॅली उत्तर प्रदेशात करत आहोत. तर भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एक खासदार निवडून आणण्यासाठी ९०० करोड रूपये खर्च केले, एवढा पैसा आला कुठून? असा सवाल करतानाच देशाला वाचवण्यासाठी भाजपाचा पराभव करणे गरजेचे आहे अशा शब्दात भारत मुक्ती मेर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी निशाणा साधला. बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या अलीगढ येथील महारॅलीत ते बोलत होते.


ते म्हणाले, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा अंतर्गत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत २०० दल एकत्रित करू.राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा सार्‍या देशभरात निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बनवण्यात आला आहे. सार्‍या देशभरात पहिल्यापासून आमचा सामाजिक आधार मजबूत आहे. आरएसएसचा सामाजिक आधार मजबूत असल्याने केंद्रात भाजपाचे सरकार आले. आमचाही सामाजिक आधार असल्याने केंद्रात आमचेही सरकार येऊ शकते. थोडा वेळ लागेल, एवढाचा विषय आहे. ब्राम्हणांची संख्या केवळ ३.५ टक्के असूनही त्यांनी देशावर कब्जा केला आहे. ते देशाचा प्रधानमंत्री नॉमिनेट करत आहेत, कारण त्यांच्याकडे नोट आहे. नोटदेखील सफेद नाही काळा आहे. देशातील राजकीय पक्षांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत  ६० हजार करोड रूपये खर्च केेले.  त्यामध्ये २७ हजार करोड रूपये एकट्या भाजपाने खर्च केले. हा एडीआरचा रिपोर्ट आहे. भाजपाने ३०३ जागा जिंकल्या, एका खासदारामागे त्यांनी ९०० करोड रूपये खर्च केले. कुठून आला एवढा पैसा? सारा पैसा काळा धन आहे. 


काळ्या नोटाच्या माध्यमातून हे लोक जास्त वोट असलेल्या लोकांचे वोट खरेदी करतात. जे लोक काळ्या पैशांचा वापर करून सरकार बनवतात ते गरीबांचे कधीच कल्याण करू शकत नाहीत. आमच्याकडे जनधन असल्याने मोठ्या महारॅली उत्तर प्रदेशात करत आहोत. लोक आम्हांला वोट देण्याचा वादा करत आहेत आणि नोट देण्याचाही वादा करत आहेत. मी त्यांचा नोट घेतो त्यावेळी व्हिडीओ बनवला जातो. सफेद आहे, घाबरायचे काही कारण नाही. हा धन सफेद का आहे तर आमच्या घामाचा आहे. हा हरामीचा धन नाही. आमच्याकडे जास्त वोट आहे, मात्र सरकार नोटवाल्यांची बनत आहेत. त्यामुळे ते यशस्वी होत आहेत. त्यांना रोखणे गरजेचे आहे.


समाजवादी पार्टीला वाटते, की आम्ही उत्तर प्रदेशात एकटेच सरकार बनवू, हे स्वप्न आहे. असे होऊ शकत नाही. मी १९९० पासून उत्तर प्रदेशात आहे. मला संघटनेने इकडे पाठवले होते. ३२ वर्षे मी उत्तर प्रदेशात आहे. येथील कुठले राजकारण आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे भाजपाला पराभूत करण्यासाठी महाआघाडी बनवावी लागणार आहे. मी तर कागदावर आकडेवारी काढत आहे, तर कागदावरही भाजपचा पराभव होत नाही, तर जमीनीवर काय असू शकते? 


समाजवादी पार्टी कागदावरही भाजपाचा पराभव करू शकत नाही. मी आकड्यांची गणती करत आहे. मात्र तो आकडा मिळत नाही. महाआघाडी बनेल तेव्हाच यश मिळू शकते. आम्ही महाआघाडी बनवण्यासाठी काम करत आहोत. ४१ राजकीय पक्षांची आघाडी बनलेली आहे. त्यांच्या पाठीमागे बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व उत्तर प्रदेशातील १० हजार सामाजिक संघटना यांची आघाडी बनली आहे. यामध्ये एक मोठी पार्टी सहभागी झाली तर महाआघाडी होईल. 


आमची समाजवादी आणि कॉंग्रेसकडेही वार्ता सुरू आहे. एवढेच नाही तर ओवेसी यांच्याशीही वार्ता सुरू आहे. देशाला वाचवण्यासाठी भाजपाचा पराभव करणे गरजेचे आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत सेमी फायनलमध्ये भाजपाचा पराभव झाला नाही तर २०२४ मध्ये त्यांचा पराभव करणे कठीण आहे असे मेश्राम यांनी सांगितले.


देशात व उत्तर प्रदेशात ज्यांचे सरकार आहे त्यांना सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे हिंदू-मुसलमानचा मामला उभा करत आहेत. मुसलमान तुमचा दुश्मन आहे असे एससी, एसटी, ओबीसीला सांगितले जात आहे. कुठल्या आधारावर दुश्मन आहे? काय मुसलमानांनी वर्णव्यवस्था बनवली, त्याआधारे आम्हांला गुलाम बनवण्यात आले. काय मुसलमानांनी जातीव्यवस्था बनवली. त्यामुळे ६.५ हजार जातींचे तुकडे करण्यात आले, अस्पृश्यता व ओबीसीवर शुद्रत्व काय मुसलमानांनी थोपवले, तर नाही. मुसलमानांनी काहीच केले नाही. महिलांनाही या लोकांनी दास बनवले. घुमंतू जातीला बहिष्कृत केले, आदिवासींना जंगलात राहण्यासाठी मजबूर केले. हे मुसलमानांनी केले नाही, तर ब्राम्हणांनी केले. हे कागदोपत्री पुराव्याच्या आधारे बोलत आहे. 


सम्राट ब्रहद्रथ मौर्य यांच्या हत्येपूर्वी येथील सारे लोक बुद्धीस्ट होते. बुद्धीस्ट असण्यापूर्वी मूलनिवासी होते. तक्षशीला कुठे आहे, तर पाकिस्तानात आहे. पाकिस्तानात का आहे तर सारा पाकिस्तान बुद्धीस्ट लोकांचा होता. या आधारावर बोलत आहेत, की मुसलमान या देशाचा मूलनिवासी होता, आहे आणि राहणार आहे. त्यावेळी मोहन भागवत यांच्या लक्षात आले, आता खतरा वाढत आहे. एससी, एसटी, ओबीसी व मुसलमान आपापसात एकत्र येतील. कारण आता माहित झाले आहे, डीएनए-डीएनए भाई-भाई होतील. त्यामुळे भागवत यांनी उलटी करत मुसलमान आणि हिंदूचा वारसा एकच आहे असे सांगितले. 


मूलनिवासी नावाची गोळी मुसलमान लोकांनी खावी, यांचा आवाज पुढून नाही तर मागून येईल असा टोला आरएसएस व भाजपाला लगावतानाच एससी, एसटी, ओबीसीला फसवून मुस्लीमांविरोधात दंगलीसाठी वापरले जाते. केवळ जागृती पसरावला हवी, आम्ही त्यांचा रस्ता बंद करून टाकू. जागृती पसरवण्याचा अभियान राष्ट्रीय स्तरावर सुरू असल्याचे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


या देशात अल्पसंख्य ब्राम्हण आहेत. मुसलमान अल्पसंख्य नाही. ब्राम्हणांची संख्या ३.५ टक्के, ३.५ टक्के ब्राम्हण १५ टक्के मुसलमानांना काय बोलतो, अल्पसंख्य. अरे, तुमची संख्या ३.५ टक्के आणि १५ टक्के मुसलमानांना अल्पसंख्य कसे काय बोलता? मुसलमानदेखील स्वत:ला मानतात, की आम्ही अल्पसंख्य आहोत. मुसलमान मूलनिवासी आहे, म्हणजेच तो बहुसंख्यांक आहे. या देशात आजपर्यंत  आम्हांला गुलाम कुणी बनवले आहे याची जागृती वाढणे गरजेचे आहे. यासाठीच या सारी बाबी मी तुम्हांला सांगत आहे. 


२६ जानेवारी, १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले. प्रत्येक २१ वर्षाच्या व्यक्तीला मताचा अधिकार दिला. मताचा अधिकार हा केवळ मत देण्याचा अधिकार नाही तर स्वत:ला शासक बनण्याचा आहे. ज्या दिवशी शासक बनण्यासाठी मताच्या अधिकाराचा उपयोग कराल त्या दिवशी शासक बनाल. गेल्या ७५ वर्षापासून दुसर्‍यालाच शासक बनवत आहात. हे काम दुसर्‍यासाठी आहे असे आपण मानता म्हणून दुसर्‍याला शासक बनवत आहात. 


देश आमचा आहे. या देशाची माती आमची आहे. हा देश चालवणे, त्याचा विकास करणे, त्याचा उद्धार करणे हीदेखील आमचीच जबाबदारी आहे. त्यामुळे याबाबत गंभीरतेने विचार करून देशाला चालवण्याचे कामदेखील आपल्या हातात घेतले पाहिजे. ही बात समजून घेतली तर सोपे काम होऊन जाईल. या लोकांना बदलण्यासाठी २०२२ व २०२४ मध्ये संधी आलेली आहे. मताच्या अधिकाराचा वापर बदलण्यासाठी करावा लागेल. आम्हांला परिवर्तन हवे आहे. बदल आणि परिवर्तनासाठी आम्ही देशात काम करत आहोत असे मेश्राम यांनी सांगितले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
महागाईने होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकार अजून एक धक्का
निवडणुका तूर्त ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविनाच!
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा उद्या भारत बंद, बामसेफसहि
५ वर्षांत सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार
ज्ञानवापी मशीदीत शिवलींग नसून तो कारंजा आहे
केतकी चितळे पुन्हा वादात
राज्यातील ४५५ गावांना ४०१ टँकरने पाणीपुरवठा
२५ मे भारत बंदला रोखण्यासाठी ब्राम्हणवाद्यांकडून हनुमा
कोरोना काळात जगात दर ३० तासांनी एका अब्जाधीशाचा उदय, तर द
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत २७ मे रोजी सर्वपक्षीय ब
अनधिकृत शाळांचे फुटले पेव
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, मुस्लिमांना केले जातेय टा
यूएपीएची तरतूद देशद्रोहापेक्षा धोकादायक
मध्य प्रदेशात २९ आणि राजस्थानमध्ये दररोज १४ मुले हरवतात
टुकार अभिनेत्री केतकी चितळेच्या जामीन अर्जावर २६ तारखे
ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे नसून बुद्धीस्ट स्थळ
ज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ
ज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका
कर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा
कोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper