×

गरीबांच्या नावावर वर्ल्ड बँक व आंतराष्ट्रीय नाणेनिधीतून घेतलेला पैसा कुठे गेला?

Published On :    7 Jan 2022  By : MN Staff
शेयर करा:


भारतावर १०० लाख करोडपेक्षा जास्त कर्ज, शिक्षणावर २.५ टक्केदेखील खर्च नाही, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या हापूड येथील महारॅलीत वामन मेश्राम यांनी केंद्राच्या नीतीवर ओढले कोरडे





हापूड: भारतावर १०० लाख करोडपेक्षा जास्त कर्ज आहे. गरीबांच्या नावावर तुम्ही वर्ल्ड बँक व आंतराष्ट्रीय नाणेनिधीतून पैसा घेतला तो कुठे गेला? असा सवाल करतानाच तुम्हांला १०० करोड व्याज देणे आता मुश्कील बनले आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांची पेन्शन रद्द केली. आता ३५ लाख करोड भारताचा बजेट आहे. पैशांची कमतरता नाही. मात्र गरीबाच्या कल्याणाची कुठलीही कुठल्याही प्रधानमंत्र्याने योजना बनवली नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहले आणि विचारले, तुम्ही समाजवादी आहात, राष्ट्रीय संपत्तीचे वितरण करायला हवे असे समाजवादी बोलतात तसे मी बोलत नाही. तर या लोकांच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था करा, ते स्वत: रोजगाराची व्यवस्था करतील. जीडीपीच्या ६ टक्के शिक्षणावर खर्च करू असे युनोच्या परिपत्रकावर भारत सरकारने सही केली. मात्र आजपर्यंत २.५ टक्केदेखील खर्च केलेला नाही. त्यामुळे कुठलेही काम न करणार्‍या प्रधानमंत्र्यांना मी नालायक सर्टीफिकेट देत आहे अशा शब्दात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केंद्राच्या नीतीवर कोरडे ओढले आहेत. राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनात हापूड येथील महारॅलीत ते बोलत होते.


ते म्हणाले, आमच्याकडे काळा सोडा सफेददेखील धन नाही, मात्र आमच्याकडे जनधन आहे. त्यामुळे लगातार महारॅली काढण्यात येत आहेत. आजच्या वर्तमानपत्रात मोठी बातमी जनधन संबंधात छापण्यात आली आहे. प्रधानमंत्री रॅली होणार होती, त्याठिकाणी ७० हजार खुर्च्या लागल्या होत्या. परंतु तेथे ७०० लोक बसले होते. ही बातमी प्रधानमंत्र्यांना देण्यात आली. ७० हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत आणि केवळ ७०० लोक आहेत काय करणार? आपण कुठलीही चिंता करू नका, मी यातून मार्ग काढतो असे प्रधानमंत्र्यांनी सांगितले. 


माझ्या जीवाला धोका होता, परंतु त्यातून बचावलो आहे अशाप्रकारे मार्ग काढत मोदी यांनी देशभरात हवा पसरवली. बचाव करत परत आलो आहे. असा मेसेज त्यांनी सार्‍या देशभरात दिला. ज्यावेळी एखादा व्यक्ती प्रधानमंत्री होतो त्यावेळी तो भाजपाचा नसतो तर देशाचा असतो. ज्यावेळी विदेशात भाजपाचा नव्हे तर भारताचे प्रधानमंत्री म्हणून जातात. त्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कुठल्याही प्रकारे समझोता केला जाऊ शकत नाही अशाप्रकारे राष्ट्रीय सहमती असते. 


समझोता केलाही जाऊ शकत नाही. राष्ट्रीय सहमतीला आम्ही कालही, आजही आणि उद्याही समर्थनात आहोत. कारण हा देशाच्या सुरक्षेशी जोडलेला विषय आहे. ७० हजार खुर्च्या असताना ७०० लोक आले, याला आधार मानून सुरक्षेच्या मुद्याला मजाकचा मुद्दा नरेंद्र मोदींनी बनवला. त्यामुळे ही शरमेची बाब आहे. केवळ दु:खाची बाब नाही तर शरमेची आहे. येथेही त्यांच्याकडे जनधन नाही.


२०१९ च्या निवडणुकीचा एडीआरचा रिपोर्ट आहे. आकडे तपासल्यानंतर ते घोषित करतात. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी ६० हजार करोड रूपये खर्च केले. त्यामध्ये २७ हजार करोड रूपये एकट्या भाजपाने खर्च केले. भाजपाकडे नोटा छापण्याचा कारखाना आहे का? असा सवाल करतानाच रिझर्व्ह बँकेला नोटा छापण्याचा अधिकार आहे. मात्र ते स्वायत्त आहे. मग हे रूपये कुठून आले तर हे काळा धन आहे. काळ्या धनाचा उपयोग सर्वात जास्त निवडणुकीत होतो. ही बाब समजून घ्यायला हवी. दुसरी बाब ज्यांच्याकडे ३.५ टक्के मत आहेत. ३.५ टक्के मतांच्या आधारावर हे लोक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडून आणू शकत नाही. मग सरपंच बनवण्याचा प्रश्‍नच नाही. 


जे सरपंच बनवू शकत नाही ते लोक देशाचा प्रधानमंत्री नॉमिनेट करत आहेत. काळ्या धनाच्या आधारे ते नॉमिनेट करत आहेत. ज्यांच्याकडे नोट जास्त आहेत मात्र वोट नाहीत आणि ज्यांच्याकडे वोट आहेत त्यांच्याकडे नोट नाही. ज्यांच्याकडे वोट नाही त्या लोकांनी निवडणुका महागड्या केल्या. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी भाजपाने ९०० करोड रूपये खर्च केले. कधी खर्च केले तर ईव्हीएमध्ये घोटाळा करण्याची सुविधादेखील आहे.  निवडणुका महागड्या करून ज्यांच्याकडे जास्त वोट आहेत त्यांना निवडणुकीतून बाहेर केले. आपण केवळ निवडणुकीत रांगा लावून मत टाकणारे झालो आहोत. रांगा लावून मत टाकणारे बनवण्यात आले आहे. 


यावर कुठलाही मीडिया बोलत नाही. प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर काहीच बोलत नाही, लिहित नाही. मीडियाने याविरोधात अभियान चालवले पाहिजे होेते. कारण मीडिया काही उद्योग नाही. मीडिया चालवण्यासाठी इंडस्ट्रीयल लाययन्स घेता येत नाही, संविधान कलम क्र. १९ नुसार तुम्हांला तो अधिकार मिळालेला आहे. मीडिया लोकतंत्राचा चौथा स्तंभ आहे. ही काही इंडस्ट्री नाही. लोकतंत्र व संविधानाने त्यांना अधिकार दिला अशी माहिती मेश्राम यांनी दिली.


 दि. ८ ऑक्टोबर, २०१३ ला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, की ईव्हीएममुळे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही, मग कुठल्या दैनिकाने पहिल्या अथवा शेवटच्या पानावर बातमी छापली का? असा सवाल प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षाला विचारले. शेवटच्या पानावरदेखील बातमी छापली नाही, हे लोक स्वत:ला नॅशनल मीडिया समजतात, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तुम्ही ब्लॅकआऊट करत आहात, कसा काय नॅशनल मीडिया? असे...असे आहे त्याची चौकशी करा, परंतु त्यांनीही आजपर्यंत चौकशी केली नाही. 


सर्वोच्च न्यायालयाच्या रिटायर्ड न्यायाधीशाविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात जात आहे. साधी बाब त्यांना समजून येत नाही. जाणूनबुजून मी ते रेकॉर्डवर घेत आहे. रिटायर्ड न्यायाधीश खुदा नाही, तोदेखील संविधानाच्या अधीन आहे. तुमचा व्यवहार समीक्षेच्या अधीन आहे. संविधानाच्यावर कोणीच नाही. त्यामुळे आम्ही संविधानाच्या कक्षेत राहून ही लढाई लढत आहोत. हातात हत्यार घेऊन लढा असे आम्ही सांगत नाही. १८५७ मध्ये इंग्रजांच्याविरोधात याच ब्राम्हणांनी हत्यारबंद आंदोलन छेडले होते. मात्र ते आंदोलन स्वातंत्रता संग्राम होता असे ते आपल्या मुलांना सांगतात व शिकवतात. 


तर आदिवासी आपल्या हक्क व अधिकारासाठी हत्यार हाती घेत आहेत, त्यांना नक्षलवादी म्हणता हे कसे काय? हैराण करणारी बाब आहे. तुमची व्याख्या अजबच म्हणावी लागणार आहे. ते आपल्या जमीनी वाचवण्यासाठी लढत आहेत. आत्म संरक्षणासाठी हत्यार हाती घेऊ शकतो असे भारताच्या संविधानात सांगितलेले आहे. अशाप्रकारे त्यांनी व्यवस्था या देशात बनवली आहे. निवडणुकीला त्यांनी महागडे बनवले आहे. आपल्या लोकांना मत देण्याच्या रांगेत उभे केले आहे. रांगेत उभे राहून केवळ मत देणे एवढीच तुमची औकात आहे. बाकी तुमची औकात नाही. कितीवेळापर्यंत हा मामला चालवणार आहात? असा सवालही मेश्राम यांनी केला.


सोशल मीडिया ग्लोबल आहे. त्यामुळे सार्‍या जगात आवाज पोहचत आहे. कुठल्या वर्तमानपत्रात अथवा चॅनेलवर वामन मेश्राम यांची बात येत नाही याचा अर्थ आमचा आवाज पोहचत नाही असा नाही, हा तुमचा भ्रम आहे. तो भ्रम संपला आहे. राष्ट्रीय अधिवेशनात मी भाषण दिले तेव्हा १ दिवसात १ करोड ४० लाख लोकांपर्यंत तो पोहचला. आम्ही गैरसंविधानिक बोलत नाही. यामध्ये परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत मेश्राम यांनी व्यक्त केले.


आरएसएसच्या लोकांनी बजरंग दल बनवले, त्याचा पहिला प्रमुख होता विनय कटीयार. फैजाबादमधील कुणबी पटेल आहे. हे लोक आपल्या एससी, एसटी, ओबीसीला बजरंग दलात भरती करतात. त्यांच्या दिमाख बिघडवतात आणि १०-२० लोक एकत्र येऊन एका मुस्लीमाला पकडतात आणि त्याला मारतात. हा काय पुरूषार्थ आहे का? आरएसएसच्या लोकांनी किती पुरूषार्थ शिकवला. एका मुस्लीमाला पकडतात आणि बोलतात तू पाकिस्तानी आहेस. पाकिस्तानात जा. परंतु मुस्लीम विदेशी नसून मूलनिवासी आहे असे आम्ही सांगितले. तेव्हा मोहन भागवत यांनी उलटी केली. 


हिंदू व मुसलमानांचे वारस एकच होते. पाकिस्तानी, विदेशी होते असे पहिले बोलत होते अचानक कसे काय बदलले? आपण निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बोलत आहात, मग हा इतिहास का सांगत आहात? असे लोक विचारू शकतात. तर आरएसएसचे लोक कुठल्या विषयावर बोलत आहेत. सार्‍या खोट्या बाबी ते सांगत आहेत. गाय, गंगा, गोमूत्र आणि गोबर असे आरएसएस व भाजपाचे ४ जी चालतो. गोबर खाल्ल्याने कोविड समाप्त होतो म्हणून एका आरएसएस-भाजपाच्या माणसाने गोबर खाल्ला तो मरून गेला. असे हे लोक पागल आहेत. या लोकांना दवाखान्यात नव्हे तर पागलखान्यात भरती करायला पाहिजे. ही धोकेबाजी केली जात आहे, त्यामुळे बोलावे लागत आहे. कारण तुम्हांला समजले पाहिजे. 


ज्यांच्याकडे केंद्र व राज्य सरकार आहे, मात्र विकास काय केला हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही. ज्याचा आधार बनवून मते मागता येतील. या लोकांनी अनेक कंपन्या विकल्या आहेत. त्या देशाला बोजा आहेत असे सांगायचे, आता त्यांनी त्या विकल्या आहेत. धंदा करणे सरकारचे काम नाही असे ते आता बोलत आहेत. सार्वजनिक कंपन्या केवळ धंदा नाही तर त्यांच्याबरोबर राष्ट्रीय सुरक्षेचा मामला जोडलेला असल्याचे स्पष्टोक्ती मेश्राम यांनी केली.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
महागाईने होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकार अजून एक धक्का
निवडणुका तूर्त ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविनाच!
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा उद्या भारत बंद, बामसेफसहि
५ वर्षांत सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार
ज्ञानवापी मशीदीत शिवलींग नसून तो कारंजा आहे
केतकी चितळे पुन्हा वादात
राज्यातील ४५५ गावांना ४०१ टँकरने पाणीपुरवठा
२५ मे भारत बंदला रोखण्यासाठी ब्राम्हणवाद्यांकडून हनुमा
कोरोना काळात जगात दर ३० तासांनी एका अब्जाधीशाचा उदय, तर द
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत २७ मे रोजी सर्वपक्षीय ब
अनधिकृत शाळांचे फुटले पेव
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, मुस्लिमांना केले जातेय टा
यूएपीएची तरतूद देशद्रोहापेक्षा धोकादायक
मध्य प्रदेशात २९ आणि राजस्थानमध्ये दररोज १४ मुले हरवतात
टुकार अभिनेत्री केतकी चितळेच्या जामीन अर्जावर २६ तारखे
ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे नसून बुद्धीस्ट स्थळ
ज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ
ज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका
कर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा
कोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper