×

ओबीसींच्या जातनिहाय जनगनणेच्या मुद्यावर जानेवारीत भारत बंद करणार

Published On :    29 Nov 2021  By : MN Staff
शेयर करा:


आमच्या समस्यांचे समाधान न केल्यास संविधानाच्या कक्षेत राहून तुम्हांला रस्त्यावर निपटवून टाकू-वामन मेश्राम यांचा इशारा

यवतमाळ: ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावर जानेवारीत भारत बंद करू असा इशारा देतानाच तुम्ही आमच्या समस्यांचे समाधान न केल्यास संविधानाच्या कक्षेत राहून संघटन शक्तीच्या बळावर तुम्हांला रस्त्यावर निपटवून टाकू असे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सांगितले. राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा आणि राष्ट्रीय किसान मोर्चाच्या संयुक्त अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरून यवतमाळ येथे बोलत होते.


यावेळी मेश्राम म्हणाले, मंडल आयोगाच्या माध्यमातून देशभरात ५२ टक्के ओबीसी आहेत असे सांगितले जात आहे. इंग्रजांनी १९३१ मध्ये जातनिहाय जनगनणेच्या आधारावर बोलत आहे. आज तमाम ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा विषय आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे विभाजन झाले. या विभाजनाचा इतिहास थोडक्यात सांगत आहे. या इतिहासात कमी, चुका काय आहेत त्याचे परिणाम आजही आपल्याला भोगावे लागत आहेत. भारताच्या विभाजनाचा विषय ओबीसींच्या जातनिहाय जनगनणेच्या मुद्याशी जोडलेला आहे. विभाजन झाल्यानंतर २० टक्के लोकसंख्या पाकिस्तानात गेली आणि ८० टक्के लोकसंख्या भारतात राहिली. तर आज १०० टक्क्यांचा विचार केला तर भारतात आज ओबीसींची ६०-६२ टक्के ओबीसींची संख्या असू शकते. ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली तर आकडा ६०-६२ टक्के निघेल. किती संख्या आहे याची आकडेवारी समोर येईल.   ५२ टक्के ओबीसी असलेल्या लोकांची शासक वर्ग तयार नाही. ते जनावरांची गणना करतात. सिंहाची गणना करतात. कुत्र्या-मांजरांची गणना करतात. सरकारजवळ जनावरांची आकडेवारी आहे मात्र ओबीसींची नाही. एससी, एसटीची गणना केली जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी केली होती. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत हा मुद्दा उठवला, त्यावेळी कॉंग्रेसच्या लोकांनी त्यांना रोखले आणि म्हणाले, की आपण ओबीसींचे नेते नाहीत. ओबीसींचे नेते गांधीजी आहेत. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, गांधीजी तर काहीच बोलत नाहीत, त्यामुळे मी बोलत आहे. किती आपली मोठी समस्या आहे. कोणीच बोलायलाच तयार नाही. ओबीसींच्या नेत्यांनी गांधीजींना नेता मानले. मात्र गांधीजींनी गोलमेज परिषदेत ओबीसींचा मुद्दा उठवलाच नाही. ओबीसींनी गांधीजी यांना महात्मा बनवले. ओबीसींनी गांधीजींना समर्थन दिले. त्यांच्यामुळे गांधीजी जननेता बनले.  मात्र ज्यांची समस्या आहे त्यांची समस्या उठवली तरच त्याचे समाधान होणार आहे ना. मात्र समस्या उठवलीच नाही असे मेश्राम यांनी इतिहासाचे दाखले दिले.


संविधान सभेची १९४६ मध्ये निवडणूक झाली. गांधीजी ओबीसींचे नेते होते. मात्र त्यांनी ओबीसीला एकही तिकीट दिले नाही. मी ओबीसींचा एवढा मोठा नेता आहे तर ओबीसींचा मुद्दा उठवण्याची काय गरज आहे? तुमच्याबाबत मी काहीच बोलत नाही तरीही मी ओबीसींचा नेता आहे. म्हणजे ओबीसीसोंबत इतिहासात काय धोका करण्यात आले याचे विवेचन मेश्राम यांनी केले. २ सप्टेंबर १९४२ रोजी इंग्रजांनी अंतरिम सरकार बनवले. त्यावेळी प्रधानमंत्री म्हणून पंडीत जवाहरलाल नेहरू यांना बनवले. त्या अगोदर इंग्रजांच्या मंत्रीमंडळात बाबासाहेब मंत्री होते, त्यांच्याकडे चार मंत्रालयाचा कारभार देण्यात आला होता. सिंचन, सीपीडब्ल्यू, वीज आणि कामगार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. १९४२ मध्ये कामगार मंत्री असताना बाबासाहेबांनी कामगारांसाठी कायदे बनवले हे किती लोकांना माहित आहे अशी टीप्पणी मेश्राम यांनी केली.


दरम्यान भारताचे नेतृत्व करायचे असेल तर भारताला ओळखायला शिकले पाहिजे असा सल्ला गोपाळ कृष्ण गोखले यांनी गांधीजींना दिला. भारतात फिरल्यानंतर भारतातील लोक साधू किंवा महात्म्याला जास्त मानतात ते नेत्यांना जास्त मानत नाहीत हे गांधीजींच्या लक्षात आले. गांधीजी, बॅरिस्टर होते त्यांनी महात्मा बनवण्यासाठी साधी गोष्ट अवलंबली. भारतात त्यांनी कोट-टाय बांधण्याऐवजी कमरेच्यावर कपडे घालत नव्हते आणि धोतर वापरायला सुरूवात केली. धोतर ते अर्धाच वापरायचे. असे केले तर एवढा मोठा बॅरिस्टर माणूस कपडे घालत नाही, धोतर अर्धा घालत आहे जरूर काही समस्या असेल. हा माणूस फार मोठा महात्मा असेल. आपले सारे लोक न शिकलेले त्यामुळे त्यांना काही कळत नाही. गांधीजींना महात्मा कुणी म्हटले होते? असा सवाल करतानाच जोतीराव फुले यांना मुंबईत बोलावून लोकांनी महात्मा ही पदवी बहाल केली होती. मग लाखो लोकांनी गांधीजींना कुणी पदवी दिली आहे का? कुणी सांगू शकेल का? मात्र माझ्याकडे माहिती आहे. ज्या बनिया लोकांनी वर्तमानपत्र सुरू केले त्या बनिया लोकांच्या वर्तमानपत्रांनी महात्मा व साधू लिहणे सुरू केले. मात्र त्यांनी साधू अथवा महात्मा असल्याचे कुठलेही काम केले नाही, तर काम नेतागिरीचे केले अशी टीका करतानाच मेश्राम यांनी गांधी यांची पोलखोलच केली. गांधीजींचा चरित्र, जीवन संघर्ष वाचले तर लक्षात येईल. नेहमीच ते उठल्यापासून ते झोपेपर्यंत राजकारण करत होते. गांधीजींनी रहस्य जाणले. देशाचे नेतृत्व करायचे असेल तर दाखवायला पाहिजे साधू आणि आपण महात्मा असल्याचे. गांधीजींना जे ओबीसींचे समर्थन मिळाले ते धोकेबाजीमुळे मिळाले. ओबीसीचे लोक हे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. साधू-महात्मा या लोकांना मानणारे होते. त्या लोकांनी मानले की हे तर साधू- महात्मा आहेत. त्यामुळे ओबीसींनी त्यांचे समर्थन केले असे मेश्राम यांनी सांगितले.


दरम्यान, भारताचे विभाजन झाले तरी चालेल मात्र अनु.जाती, अनु.जमातीला अधिकार मिळू देणार नाही. भारताचे तुकडे झाले तरी चालतील मात्र अनु.जाती, अनु.जमातीला अधिकार मिळू देणार नाही. ज्या लोकांनी असा विचार केला ते ओबीसींच्या बाबतीत विचार करतील. अनु.जाती, अनु.जमातीला स्वतंत्र मतदारसंघ देणार नाही, मुसलमानांना पाकिस्तानात पाठवू, आणि जे ओबीसी लोक आहेत त्यांना हिंदू बनवून ब्राम्हणांचे गुलाम बनवले जाईल. हिंदू नावाचा कुठला धर्म आहे का?  असा सवाल करतानाच ब्राम्हणांना विचारा, हिंदू धर्माच्या धर्मग्रंथाचे नाव सांगा? ते वेद, श्रृती, स्मृती, पुराण, रामायण, महाभारत, गीता अशी नावे सांगतात, मात्र हे तर ब्राम्हणी धर्माचे धर्मग्रंथ आहेत असा दुसरा प्रश्‍न त्यांना विचारा. मी तुम्हांला हिंदू धर्माच्या धार्मिक ग्रंथाचे नाव विचारत आहे. आपण तर ब्राम्हणी धर्माच्या धर्मग्रंथांची नावे सांगितली आहेत. तर ब्राम्हण उत्तर देतो, दोनही एकच आहेत. मात्र आपल्या लोकांना ते माहित नाही. त्याचे खरे नाव ब्राम्हणी धर्म आहे. मग ब्राम्हण हिंदू धर्माच्या नावावर काम का करत आहेत? तर त्याने ब्राम्हणी धर्माच्या नावावर प्रचार केला असता तर आपले लोक विचार करतील तुमचा धर्म आहे ना तुम्हीच बघून घ्या. आम्हांला त्याचे काही देणे-घेणे नाही. ब्राम्हण धर्माच्या नावावर एससी, एसटी, ओबीसीला गाढव बनवले जाऊ शकत नाही. कारण प्रत्येक २१ वर्षाच्या व्यक्तीला मताचा अधिकार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक २१ वर्षाच्या व्यक्तीला मताचा अधिकार बहाल केला आहे. ज्या लोकांना आम्ही  अंगुठाछाप बनवले त्यांना मताचा अधिकार मिळाला आहे असे ब्राम्हण विचार करतात. आपल्यासोबत धोकेबाजी केली जात आहे. आपल्या लोकांना लिहण्या-वाचण्यावाचून त्यांनी वंचित ठेवले असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


मुसलमानांना पाकिस्तान देता येईल, एससी, एसटीला स्वतंत्र मतदारसंघ देता येणार नाही. ओबीसीला ब्राम्हणांचे गुलाम बनवले जाईल. ज्या लोकांनी असा विचार केला ते ओबीसीची गणना करतील. गणना केल्यास ओबीसीला त्यांच्या लोेकसंख्येच्या आधारावर सर्व जागा मिळतील व अधिकार मिळतील. तुमची संख्या माहित झाली तर तुमचे किती लोक साक्षर आहेत, किती अधिकारी आहेत. माहिती झाले तर जागृती वाढेल, जागृती वाढली तर आंदोलन करतील. त्यामुळेच ते ओबीसींची जातनिहाय जनगणना करत नाहीत. ते जनावरांची गणना करतात मात्र ओबीसींची करत नाहीत. एससी, एसटी, ओबीसी बिनबुडाचे तांबे आहेत. कारण त्यांना बुडच नाही. ज्याचा बूड असतो त्याचा विचार केला जातो. ज्याचा विचार होतो तो विचार करतो काय खोटे आणि काय बरोबर आहे. चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही आणि चांगल्या गोष्टींचे समर्थन करू. मग समाजाच्या समस्यांचे समाधान झाले नाही तर काही उपयोग आहे का? केवळ आम्ही ५२ टक्के आहोत आमची गणना करा असे सांगत राहिल्यास आजार वाढत जाणार आहे. त्यावर इलाज केला नाही तर आजार आणखी वाढू शकतो. या आजारावर महात्मा जोतीराव फुले यांनी एक उपाय सांगितला आहे. तो उपाय म्हणजे लिहणे व वाचणे होणे गरजेचे आहे. शिक्षण झाले पाहिजे. त्यामुळे त्यांना काय खोटं आणि काय खरं याची समज येईल.जोपर्यंत आपण कुठल्या विचारधारेचा स्विकार करत नाही, कुठल्या विचारधारेचा आधार बनवत नाही, जोपर्यंत कुठले संघटन बनवत नाही तोपर्यंत बूड तयार होणार नाही.आपली कोणीच सुनावणी करणार नाही. न्यायाची बाब दूर राहिली. जगात कुठलाही मोठा बदल झाला आहे तो केवळ संघटित शक्तीच्या बळावर. मोठे परिवर्तन आपोआप झालेले नाही. १९ ते ४५ वर्षापर्यंत मी संघटन बनवण्याचे काम केले आहे. संघटन शक्तीचा प्रभाव पाहिला असेल तर ५ मार्च २०१९ रोजी १३ पॉईंट रोस्टरच्या मुद्यावर भारत बंद केला होता. त्यावेळी नरेंद्र मोदींना संविधान संशोधन करून २०० पॉईंट रोस्टर लागू करणे भाग पडले. गेल्या वर्षापासून शेतकरी आंदोलन करत होते, त्यांनी आता कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांचे काही ऐकले नाही. शेतकर्‍यांबरोबर सल्ला करून निर्णय मागे घेण्यात आला नाही. दु:खी लोकांना बोलवावे आणि त्यांच्या व्यथा जाणून घ्यावा असे मोदींना वाटले नाही. मी बनवले कायदे आणि मीच रद्द करणार. किती आकडू माणूस आहे मोदी हे देशाने पाहिले आहे. आम्ही १३ पॉईंटच्या रोस्टरवर संविधान संशोेधन करायला त्यांना भाग पाडले आणि जास्त नाही एक इंच मोदींना झुकवले. हे सारे संघटित शक्तीच्या बळावर करण्यात आले असे मेश्राम यांनी सांगितले.


२९ जानेवारी २०२० रोजी सीएएच्याविरोधात भारत बंद केला. त्यावेळी मुस्लीमांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. त्याच्या दुसर्‍या दिवशी सीएएचा विषय बंद झाला. सीएए देशभरात लागू केला जाईल असे संसदेत अमित शहा यांनी सांगितले होते. त्याबाबत विरोधी पक्षांनी संसदेत विचारले की, सीएए देशभरात लागू करणार होता तर त्याची तयारी कुठपर्यंत आली आहे? त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी अजूनपर्यंत तयारी झाली नसल्याचे सांगितले. आता तयारी केली तर वामन मेश्राम आहे ना इकडे. मी आता भारत बंद करायचा असेल तर १५ मिनिटांचा एक व्हिडीओ बनवतो आणि सोशल मीडियावर टाकतो. देशातील लोक नंतर काम करतात. हे सारे संघटित शक्तीमुळे होत आहे. आता ओबीसींच्या जातनिहाय जनगणेसाठी जानेवारीत भारत बंद केले जाणार आहे.भारत बंद होणारच, करूनच दाखवणार मग त्यांना समजेल असा इशारा मेश्राम यांनी दिला. ओबीसी प्रधानमंत्री आहे तरीही तो जातनिहाय जनगणना करत नाही. याचा अर्थ काय आहे? असा सवाल करतानाच याचा अर्थ असा आहे की, त्यांच्या हातात सत्ता नाही. जर का त्यांच्या हातात सत्ता असती तर निर्णय घेतला असता. नरेंद्र मोदी भारताचे रिअल प्रधानमंत्री नाहीत त्यांना नॉमिनेटेड करण्यात आले आहे. नॉमिनेटेड हा इंग्रजी शब्द आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९३२ मध्ये तो दुसर्‍या गोलमेज परिषदेत वापरला होता. आताचे प्रधानमंत्री ब्राम्हणांनी ठेवलेले आहेत अशी टीका करतानाच वामन मेश्राम यांना रोखण्याची कुणाचाही औकात नाही. ब्राम्हणांची बात दूरच ब्रम्हा देखील रोखू शकत नाही. कारण ब्रम्हाचा कुठला पोस्टल पत्ता नाही, त्याला मताचा अधिकार नाही. भारतात ज्याला मताचा अधिकार आहे तोच सारे बिघडवू शकतो. जो जिंकेल तो कायदा करेल जो हारेल तो हारणार आहे. या देशात लोक ठरवणारे आहेत. लोकच निर्णायक आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आहे त्याची लोकांना माहिती नाही. तुम्ही लोक निर्धारित करू शकता. देशाचे भवितव्य निर्धारित करण्याची तुमच्याकडे पॉवर आहे. आता राणीच्या पोटातून राजा जन्मणार नाही तर तो बॅलेट बॉक्समधून जन्म घेणार आहे असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावर भारत बंद केला जाईल, जोपर्यंत गणना होणार नाही तोपर्यंत भारत बंद केला जाईल. आम्ही तर हा मुद्दा उठवला आहे. बाबासाहेबांनी १९४० च्या दशकात ते कॅनडात गेले होते तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात ही बाब सांगितली होती. २०१० च्या जयपूरच्या राष्ट्रीय अधिवेशनात ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आम्ही उठवला होता. त्यानंतर हा देशभरात विषय गेला. जातीनिहाय जनगणनेचा विषय त्यापासून उठवत आहे. हा मुद्दा उठल्यानंतर पार्लमेंट तीन दिवस बंद पडली होती. भारत आताही बंद होईल. संघटित शक्तीमुळे भारत बंद केला जाणार आहे. जोपर्यंत संघटीत शक्ती निर्माण होत नाही, विचारधारा होणार नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही असे मेश्राम यांनी स्पष्ट केले. मोदींनी २८ मंत्री ओबीसींचे, १२ एससीचे आणि ८ एसटीचे मंत्री बनवले. कुठल्या विरोधी पक्षांनी त्याची मागणी केली होती का? असा सवाल करतानाच एससी, एसटी, ओबीसीचे मुद्देच मीच उठवत आहे. नरेंद्र मोदी असेच ठेवलेले आहेत. मोदी यांची अशी स्थिती असेल तर त्या नेमलेल्या २८ मंत्र्यांची काय स्थिती असेल याचा विचार करा. मंत्री बनल्यानंतर समाजाच्या हक्क व अधिकाराचे कायदे करा असे मोदींनी सांगितले नाही तर लोकांमध्ये जा आणि जनआशीर्वाद यात्रा काढा असे सूचवले. कारण आशीर्वाद तर वामन मेश्राम यांच्याकडे झुकतो आहे, तुम्ही जा नाही तर पुढच्या निवडणुकीत मेश्राम आपली पुंगी वाजवतील. समर्थन त्यांना मिळेल. आम्हांला समर्थन मिळू नये म्हणून जनआशीर्वाद यात्रा काढायला सांगितली असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


१९८२ मध्ये कांशीरामजी यांनी लिहलेल्या चमचा युग या पुस्तकात ते म्हणतात, ज्यावेळी स्वाभीमानी, स्वनिर्भर, राष्ट्रव्यापी आंदोलन पुढे जाईल त्यावेळी चमच्यांची मागणी वाढेल. दलालांचीव भडव्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढेल. जे मंत्री घेण्यात आले आहेत त्यावरून आंदोलन ताकदीनिशी वाढत आहे. राष्ट्रव्यापी होत आहे. हा त्याचा पुरावा आहे. आपल्याला संविधानाने तीन मोठे अधिकार बहाल केले आहेत. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करून आपल्या लोकांना हक्क व अधिकार देण्यासाठी काम करू. भारत बंद करून या लोकांना रस्त्यावर निपटू.  संघटन शक्ती निर्माण झाल्याने आता या भाषेचा मी का वापर करत आहे. तुम्ही आमच्या समस्यांचे समाधान न केल्यास रस्त्यावर निपटवून टाकू. कलम १९ मध्ये बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे तो म्हणजे संघटन बनवणे, चालवणे, संचालन करणे व आंदोलन करण्याचा मौलिक अधिकार दिला आहे. या अधिकाराचा वापर करून संविधानाच्या कक्षेत राहून तुम्ही आमच्या समस्यांचे समाधान न केल्यास रस्त्यावर निपटवून टाकू  असा इशारा मेश्राम यांनी दिला आहे. PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
व्यक्ती केंद्री शिक्षणाची समाज विरोधी सिद्धता
महाराष्ट्रातील मराठा ब्राह्मणाच्या छायेत का गेला?
राज्यपाल-कोर्टाने बंडखोरांना बळ दिले
धक्कादायक! मुंबईत दररोज चार मुलींचे अपहरण
ओबीसींच्या भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी
वेगळ्या ‘सरना’ धर्मासासाठी ५ राज्यातील आदिवासींची दिल्
एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे नेते नाहीत, उद्धव ठाकरेंचं पत्
१५ ऑक्टोबर २०२२ रोजी नागपुरातील आरएसएस मुख्यालयावर एक ल
झाकीया जाफरी यांची याचिका फेटाळल्यानंतर ३०० वकीलांनी व
उदयपूर हत्या: हरियाणा रॅलीत मुस्लिम समुदायाविरोधात ‘प्
नवीन कामगार कायद्यांविरोधात ‘आरएमबीकेएस’चे राज्यभरात
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper