×

३१ जानेवारी २०२२ ला राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा भारत बंद

Published On :    28 Nov 2021  By : MN Staff
शेयर करा:


राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांची घोषणा, १० डिसेंबर २०२१ ची तारीख पुढे ढकलली, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनामुळे घेतला निर्णय





लखनौ: केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात लिहून दिल्याच्याविरोधात, तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात, ईव्हीएमला लावण्यात आलेल्या पेपर ट्रेलची गणना केली जावी अथवा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, खासगी क्षेत्रात आरक्षणासाठी, एनआरसी, सीएए, एनपीआर रद्द करण्यासाठी किंवा एनआरसी लागू करायची असेल तर डीएनएच्या आधारावर या मागण्यांसाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून पाच टप्प्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती, त्यातील चार टप्पे पार पडले आहेत. 


मात्र पाचवा टप्पा असलेला १० डिसेंबरचा भारत बंद हा ३१ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येणार आहे. कारण २५ ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन होत असल्याने हा भारत बंद पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी केली आहे.


हे पण वाचा: गुजरातमध्ये ६०० जागांसाठी मोठी गर्दी



पहिल्या टप्प्यात १५ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतातील ५५० जिल्ह्यातून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात २९ ऑक्टोबर २०२१ रोजी देशातील ५५० जिल्हा मुख्यालयासमोर धरणे प्रदर्शन करण्यात आले. तिसर्‍या टप्प्यात १२ नोव्हेंबर २०२१ रोजी तहसील कार्यालयीसमोर धरणे प्रदर्शन करण्यात आले तर चौथ्या टप्प्यात २५ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतातील ५ हजार तहसील कार्यालयावर रॅली व जेलभरो आंदोलन करण्यात आले. पाचव्या टप्प्यात १० डिसेंबरला भारत बंद करण्यात येणार होते. 


हे पण वाचा: एकाच दिवसांत ३ हजार कर्मचारी निलंबित


या अगोदर बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा या देशातील मोठे संघटना आहेत त्यांनी अनेकदा भारत बंद केला आहे. या संघटनांच्या माध्यमातून राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या आंदोलनाला समर्थन करण्यात आले होते. मात्र २५ ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला कार्यकर्त्यांची ताकद लागली पाहिजे. राष्ट्रीय अधिवेशनामुळे ताकद विभाजित होत होती. कार्यकर्त्यांची ताकद विभाजित होता कामा नये यासाठी भारत बंद पुढे ढकलण्यात आला आहे. 


तर सार्‍या ताकदीनिशी भारत बंद केल्याशिवाय आमच्या मुद्यांना सरकारला झुकवू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की, १० डिसेंबरऐवजी ३१ जानेवारी २०२२ रोजी भारत बंद करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्या अगोदर बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सार्‍या ताकदीनिशी तयारी करावी. राष्ट्रीय अधिवेशन सफल झाल्यानंतर पुन्हा मिळून-मिसळून ३१ जानेवारी २०२२ च्या भारत बंदची तयारी करून ते सफल बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून दिले पाहिजे. या बाबीची माहिती देण्यासाठी ही घोषणा करत असल्याचे चौधरी विकास पटेल म्हणाले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
व्यक्ती केंद्री शिक्षणाची समाज विरोधी सिद्धता
महाराष्ट्रातील मराठा ब्राह्मणाच्या छायेत का गेला?
राज्यपाल-कोर्टाने बंडखोरांना बळ दिले
धक्कादायक! मुंबईत दररोज चार मुलींचे अपहरण
ओबीसींच्या भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी
वेगळ्या ‘सरना’ धर्मासासाठी ५ राज्यातील आदिवासींची दिल्
एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे नेते नाहीत, उद्धव ठाकरेंचं पत्
१५ ऑक्टोबर २०२२ रोजी नागपुरातील आरएसएस मुख्यालयावर एक ल
झाकीया जाफरी यांची याचिका फेटाळल्यानंतर ३०० वकीलांनी व
उदयपूर हत्या: हरियाणा रॅलीत मुस्लिम समुदायाविरोधात ‘प्
नवीन कामगार कायद्यांविरोधात ‘आरएमबीकेएस’चे राज्यभरात
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper