×

पेगाससच्या रडारवर जगभरातले १४ नेते

Published On :    22 Jul 2021  By : MN Staff
शेयर करा:


फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन, पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश





नवी दिल्ली: इस्त्रायल कंपनी एनएसओच्या पेगासस स्पायवेअरच्या जाळ्यात जगातील १४ देशांचे प्रमुख वा सरकारे असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन, पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सीरिल रामाफोसा, मोरोक्कोचे राजे मोहम्मद, आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेचे अध्यक्षांची नावे आहेत.


पेगासस स्पायवेअरमार्फत पाळत ठेवल्याचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी या स्पायवेअरच्या माध्यमातून ५० हजारांवर पाळत ठेवल्याचा डेटाबेस फ्रान्सस्थित विना नफा तत्वावर काम करणारी वृत्तसंस्था फॉरबिडन स्टोरीजने उघडकीस आणला होता. या डेटाबेसचे फोरेन्सिक विश्‍लेषण अमनेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने केले होते. त्यात ही माहिती उघडकीस आली आहे.


या माहितीनुसार सौदी अरेबियातील सरकारविरोधात भूमिका घेणारे वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार दिवंगत सौदी पत्रकार जमाल खशोगी यांची पत्नी व प्रेयसीचा मोबाइल क्रमांक पेगासस स्पायवेअरसाठी निश्चित करण्यात आला होता. त्याच बरोबर इराकचे अध्यक्ष बरहाम सलीह, इजिप्तचे प्रधानमंत्री मोस्तफा मॅडबाउली, मोरोक्कोचे प्रमुख साद-इदीन अल ओथमनी, लेबनॉनचे प्रधानमंत्री साद हरीरी, युगांडाचे माजी प्रधानमंत्री रुहाकाना रुगुंडा, अल्जेरियाचे अध्यक्ष नरुद्दीन बेदुईनी, बेल्जियमचे प्रमुख चार्ल्स मायकेल यांचे मोबाइल क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आले होते.


पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांचा मोबाइल क्रमांक २०१९ मध्ये पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. तर २०१७-१९ या काळात भारतातील शेकडो मोबाइल क्रमांक, ज्या मध्ये विरोधी पक्षांचे नेते, केंद्रातील मंत्री, न्यायाधीश, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे मोबाइल क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आले होते.


२०१९ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता व भारताने पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या काही प्रदेशामध्ये घुसून हवाई हल्ले केले होते, त्याला पाकिस्ताननेही प्रत्युत्तर दिले होते. इस्त्रायलची कंपनी एनएसओचे पेगासस स्पायवेअर सॉफ्टवेअर हे लष्करी हेरगिरीसाठी वापरण्यात येते व ते फक्त देशांना विकले जाते. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोबाइल फोनमधील सर्व प्रकारच्या फाइल्स, फोटो, संभाषणाची यादी, मेसेज व अन्य डेटा मिळवता येतो. हे स्पायवेअर मोबाइल फोनमधील कॅमेरा व मायक्रोफोनवरही नियंत्रण ठेवू शकते.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
जातीनिहाय जनगणना झाल्यास ओबीसी ब्राम्हणी गुलामीतून मुक
मुंबई जगातील ५० सर्वाधिक सुरक्षित शहरांत
ज्या मुलांसाठी आयुष्य वेचले, त्यांच्याकडून निर्वाह खर्
महाराष्ट्रात रद्द झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्
शेतकर्‍यांवरील लाठीमाराची निवृत्त न्यायाधीशामार्फत ह
चंद्रपुरात मायलेकीचा अन्न व पाण्यावाचून तडफडून मृत्यू
भारतात बेरोजगारी, भूक यापेक्षा धर्मभावना मोठी
नरेंद्र मोदी आरएसएसने ठेवलेलं बुजगावणं
खासगी व अभिमत विद्यापीठातील मागासवर्गीय विद्यार्थ्यां
१३ हजार कोविड अनाथ बालकांचा बालसंगोपन निधी लालफितीतच
निवडणूक न लढविणार्‍या पक्षांची नोंदणी रद्द करा
देशातील आणखी १३ विमानतळांवर केंद्राचा डोळा, खासगी भांडव
तीन वर्षांत आश्रमशाळेतील ३५३ आदिवासी विद्यार्थ्यांचा म
कोविड लस न घेतल्यास सरकारी कर्मचार्‍यांना घरी बसवण्याच
देशातील शेतकरी डुबला कर्जाच्या खाईत
ब्राम्हण विदेशी असल्याचे वक्तव्ये करणारे नंदकुमार बघेल
२०१३ छत्तीसगडमध्ये मारले गेलेले नक्षलवादी नव्हे तर आदि
साकीनाका बलात्कार प्रकरण: खटला फास्ट ट्रॅकवर चालणार
महिलांच्या सहभागाबाबत तालिबान आणि आरएसएसची विचारधारा ए
ईव्हीएम घोटाळा करून निवडणूक जिंकणार्‍या नितीन गडकरींनी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper