×

जम्मू काश्मीरातून धारा ३७० हटविण्याचा निर्णय एकतर्फी व बेकायदा, चीनचा भारतावर आरोप

Published On :    7 Aug 2020  By : MN Staff
शेयर करा:


विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० जम्मू काश्मीरातून हटवल्यावरुन चीनने भारतावर निशाना साधला आहे. ५ ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होत असताना चीनने भारताचा हा निर्णय एकतर्फी व बेकायदा असल्याचा गंभीर आरोप केला आहे.





नवी दिल्ली : विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० जम्मू काश्मीरातून हटवल्यावरुन चीनने भारतावर निशाना साधला आहे. ५ ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होत असताना चीनने भारताचा हा निर्णय एकतर्फी व बेकायदा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. चीनच्या या आरोपावर भारताने तीव्र शब्दात विरोध करत चीनचा या प्रकरणात कसलाही संबंध येत नसून भारताचा हा निर्णय संपूर्णपणे अंतर्गत आहे व चीनला भारताच्या अंतर्गत धोरणात बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

५ ऑगस्टला जम्मू व काश्मीरचे ३७० कलम हटवण्याचा निर्णयावर चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते बीजिंगमध्ये संवाद साधताना म्हणाले की, काश्मीर प्रश्न हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या माध्यमातून सोडवला गेला पाहिजे व ३७० कलम काश्मीरमध्ये पुनर्प्रस्थापित केले पाहिजे.  काश्मीरसंदर्भातील कोणताही निर्णय एकतर्फी घेणे हे बेकायदा व गैर असून हा प्रश्न चर्चेतून सोडवला गेला पाहिजे, असे चीनचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी सांगितले.

भारत व पाकिस्तान हे शेजारी देश आहेत, दोन्ही देशांमध्ये सामंजस्य राहणे गरजेचे आहे. या दोघांमधील तणाव कमी व्हावा अशी चीनची प्रामाणिक इच्छा असून तो संवादाच्या माध्यमातून सुटावा असे वाटत आहे. या दोन देशांमधील कटुता कमी झाल्यास त्या प्रदेशात समृद्धी व विकासास संधी मिळेल, असे वेनबिन यांनी म्हटले. त्यावर भारतीय परराष्ट्र खात्याने चीनचा या प्रश्नी कसलाच संबंध येत नसल्याचे प्रत्युत्तर दिले.

गेल्या वर्षी ३७० कलम रद्द करून जम्मू व काश्मीरची जम्मू व काश्मीर आणि लडाख अशी दोन केंद्रशासित प्रदेशात विभागणी केली. यावर चीनने तीव्र आक्षेप घेतला. चीनच्या परराष्ट्र खात्याने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याबद्दलही नाराजी प्रकट केली होती. लडाख हा चीनचा भाग असून गेली अनेक वर्षे हा प्रदेश भारताने आपल्या ताब्यात ठेवल्याचा आरोप चीनने केला होता. 



हे पण वाचा : कोरोना ने तोड़ी मिडिल क्लास लोगों की आर्थिक कमर


लडाख हा थेट केंद्राच्या अखत्यारित येत असल्याने व तेथील कायदे बदलण्याच्या निर्णयाने चीनच्या सार्वभौमत्वाला ते आव्हान असल्याचे चीनने म्हटले होते. मात्र चीनच्या या आक्षेपाला त्यावेळी भारताच्या परराष्ट्रखात्याने खोडून काढले होते. भारतीय संसदेत संमत झालेला कायदा हा भारताचा अंतर्गत मामला असून त्यात चीनने लक्ष देण्याची गरज नाही, असे उत्तर देण्यात आले होते.

१९६३मध्ये पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील ५,१८० चौ. किमीचा अक्साई चीनचा प्रदेश चीनला दिल्यानंतर भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. गेल्या मे महिन्यात चीनने लडाखमधील गलवान खोर्‍यात घुसखोरी करून हा प्रदेश गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी दोन्ही देशांमध्ये संघर्ष उफाळल्याने भारताचे २० जवान चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीत शहीद झाले होते. १९६२ नंतर घडलेला हा पहिलाच प्रसंग होता.



हे पण वाचा : झूठे आरोपों की मानसिक प्रताड़ना के लिए कार्यकर्ताओं को मुआवजा दे छत्तीसगढ़ सरकार : एनएचआरसी


चीनने गुरुवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या बैठकीतही काश्मीरचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला पण या प्रयत्नाला अन्य देशांनी पाठिंबा दिला नाही. पण चीनच्या या कृतीचा निषेध करत काश्मीरप्रश्नी चीनने हस्तक्षेप करू नये, हा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असे प्रत्युत्तर भारताने दिले.


PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक’विरोधात आणखी एक गुन्हा
राज्याचा हक्काचे जीएसटीचे ३८ हजार कोटी केंद्र सरकारने थ
डॉक्टरांची तडकाफडकी हकालपट्टी करण्याचा निर्णय तीन दिवस
संसदीय समितीकडून फेसबुकच्या अंखी दास यांची चौकशी
कांद्याचे भाव भिडले गगनाला
टीव्ही वाहिन्या व सोशल मीडियाकडून भारतीय समाजात फूट पाड
पूर्वीचे पत्रकार तटस्थ आणि जबाबदार, आता प्रसारमाध्यमां
हाथरस पुन्हा एकदा हादरले
बेकायदा फी वसुलीवरुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - राज्य
काश्मीरचा झेंडा परत मिळेपर्यंत कोणत्याही झेंड्याला सला
मोदींनी आपल्या मित्रासाठी अंथरला लाल गालिचा
मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा फटका एमपीएससीच्या यशस्वी व
टीआरपी घोटाळा, एका चॅनेलच्या बँक खात्यात आले ७०-८० कोटी
गडचिंचले हत्या प्रकरणी ३२ आरोपींना १५ दिवसांची न्यायाल
पाकिस्तान, बांग्लादेशपेक्षा भारत कर्जाच्या खाईत डुबणार
आता एमटीएनएल काढली विक्रीला
पूर्वी जाती-धर्माच्या तर आता व्हॅक्सिनच्या नावावर वाटण
एसटी महामंडळाची ४० टक्के ई- तिकीट मशिन नादुरूस्त
ही मदत आम्हाला मान्य नाही, शेतकरी तुमच्या दारात भिकेचे क
अखेर एकनाथ खडसेंच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper