×

नीरव मोदीची ३२९.६६ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई, पंजाब नॅशनल बँक घोटाळा

Published On :    9 Jul 2020  By : MN Staff
शेयर करा:


पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) हजारो कोटींना चुना लावून देशातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईसह लंडन, युएई येथील तब्बल ३२९.६६ कोटींची मालमत्ता जप्त केली.





मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) हजारो कोटींना चुना लावून देशातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईसह लंडन, युएई येथील तब्बल ३२९.६६ कोटींची मालमत्ता जप्त केली.


गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने मालमत्ता जप्तीचे आदेश ईडीला दिले होते. त्यानुसार ही कारवाई झाली. ईडीने आतापर्यंत मोदीची २ हजार ३४८ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात शेकडो कोटींचे हिरे, देशविदेशाततील फ्लॅटस, कार्पोरेट कार्यालये, भूखंड आदींचा समावेश आहे. त्याच्यासह त्याचा  मामा मेहुल चोक्सी याच्यावर मनी लॉण्ंड्रिग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) गुन्हा दाखल करून फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे.


हे पण वाचा: कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक



विशेष न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी आर्थिक गुन्हेगारी कायद्यानुसार मोदींच्या मालकीची मालमत्ता जप्त करण्याची ईडीला परवानगी दिली होती. एफईओ कायद्यातील तरतुदींनुसार ही मालमत्ता ईडीमार्फत एका महिन्याच्या आत जोडली जाईल, असे विशेष कोर्टाने म्हटले होते. या कायद्यांतर्गत देशात कोठेही मालमत्ता जप्त करण्याचा हा पहिला आदेश होता.


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नीरव मोदीचा अलिबागजवळील कोळगाव समुद्रकिनारी असलेला १०० कोटींचा बंगला तोडण्याचे काम गेल्या वर्षी सुरू झाले. बांधकाम मजबूत असल्याने त्यासाठी डायनामाइटचा वापर करण्यात आला होता. तेथे बघ्यांची गर्दी होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या भागात पोलीस बंदोबस्त असल्याने आणि मालमत्ता सील करण्यात आल्याने बंगल्याच्या तोडकामाचे फोटो नंतर व्हायरल झाले होते. त्यातून त्याच्या भव्यतेची कल्पना आली.

या आहेत मालमत्ता

नीरव मोदीच्या मंगळवारी जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये वरळी येथील समुद्रमहाल या इमारतीतील चार फ्लॅट, समुद्रकिनारी फार्म हाऊस आणि अलिबागमधील जमीन, जैसलमेरमधील पवन गिरणी, लंडनमधील फ्लॅट आणि युएईमधील निवासी फ्लॅट, शेअर्स आणि बँक ठेवींचा समावेश आहे. नीरव मोदीला गेल्यावर्षी मार्च २०१९ मध्ये लंडन येथे अटक झाली होती. सध्या तो ब्रिटनच्या तुरुंगात आहे आणि भारतात परतण्यास त्याचा विरोध आहे. तर मेहुल चोक्सी हा आंटिंग्वा येथे लपला असल्याचे सांगितले जाते.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुख्य संशयित भरत रावल याला मालाड मुंबईतून अटक
इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर पेटवला
राज्यात सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्त
शेतकर्‍यांच्या कृषी विधेयकांबद्दल प्रश्‍नांना उत्तरे
सीबीआयच्या तीन माजी संचालकांची चौकशी का केली नाही?
पोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच
भीमा-कोरेगाव दंगलीची सुनावणीच होत नाही
सीबीएसई विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक
इयत्ता ९ ते १२ वीच्या वर्गांसाठी दूरदर्शनवर कार्यक्रम
जातीत विषमता आणणारे संविधान बदला
‘इंडियन एक्सप्रेस’ व ‘जनसत्ता’ विरोधात कोर्टात जाणार
केंद्राकडून राज्यांची ४७ हजार २७२ कोटींची फसवणूक
१५ मंत्र्यांवर बेस्ट उपक्रमाची मेहरबानी
‘केंद्रातील भाजपा सरकारच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांचे म
तामिळनाडूत पेरियार रामासामी यांच्या पुतळ्याची विटंबना
मराठा समाजाचे २ ऑक्टोबरला राज्यातील सर्व आमदार-खासदारा
अतिवृष्टीने पिके पाण्यात जाऊनही शेतकर्‍यांना मदतीसाठी
राजकीय नेत्यांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या पायघड्या
अशा व्यक्तीला मोदींनी ३० हजार कोटींचे राफेलचे कंत्राट क
न्यायासाठी रस्त्यावर उतरले हजारो लोक
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper