×

महाबीजसह २२ कंपन्यांनी बोगस बियाणे मारली शेतकर्‍यांच्या माथी

Published On :    6 Jul 2020  By : MN Staff
शेयर करा:


राज्यभरातून ३० हजार तक्रारी, कृषी मंत्र्यांकडून कारवाई





उस्मानाबाद: आधीच वाढणार्‍या महागाईने शेतकरी पिचला असताना त्याला नाडण्याचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. शेतकरी म्हटल्यानंतर कुणीही त्याला पिळा अशी आज अवस्था आहे. असेच शेतकर्‍यांना नाडण्याचे काम महाबीज सह २२ कंपन्यांनी केले असून त्यांनी बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारली आहेत.त्यामुळे संताप व्यक्त होत असून कापूस, सोयाबीनच्या बोगस बियाणांच्या राज्यात ३० हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींनुसार कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.


राज्यात खरीपाचा पाऊस वेळेवर आणि चांगला झाला. खरीपाची पेरणी झाल्यानंतर लगोलग सोयाबीन बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्याच्या बातम्या सातत्याने प्रसारीत झाल्या. त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठानं मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांमध्ये याची प्राथमिक पाहणी केली. या पाहणीमध्ये महाबीजचे आणि काही खासगी कंपनीचे बियाणे बोगस असल्याचं निदर्शनास आलं आहे. महाबिजसह २२ कंपनीच्या विरोधात राज्यांत विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत.


हे पण वाचा: वीज, नेटवर्क नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ


राज्यात सुमारे ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीज सह २२ कंपनीचे बियाणे बोगस किंवा कमी दर्जाचे असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. महाबीज कडून तूर्तास कारवाई पूर्ण होईपर्यंत शेतकर्‍यांना पर्यायी बियाणे उपलब्ध करून द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत महाबीजने दहा हजार क्ंिवटल बियाणे शेतकर्‍यांना दिले आहे. परंतु हे पुन्हा दिलेले बियाणे सुध्दा उगवले नाही अशाही काही तक्रारी आलेल्या आहेत.


शेतकर्‍यांनी घरचेच बियाणे वापरावे असं सांगण्यात आलं होतं. प्रत्येक गावात कृषी सहायकांच्या माध्यमातून घरगुती बियाण्यांचे उत्पादन क्षमताही निश्चित करण्याचे प्रयोग राबवण्यात आले. यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी घरच्याच बियाणांचा वापर केला. त्यामुळे बोगस बियाणांमुळे होणार्‍या नुकसानीचा प्रमाण बर्‍याच अंशी कमी करता आला आहे. आता ज्या कंपनीकडून अशा बियाण्यांचा पुरवठा झाला त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.


सध्याच्या बियाणे नियंत्रण कायद्यानुसार कंपन्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करणे ही प्रक्रिया किचकट आहे. याशिवाय परभणी कृषी विद्यापीठासह इतर ठिकाणच्या झालेल्या परीक्षणानंतर सुद्धा या कंपन्या राज्य सरकारच्या कारवाईच्या विरोधामध्ये न्यायालयात जाऊ शकतात. यापूर्वीही असं घडलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकर्‍यांना नुकसान भरपाई किती आणि नेमकी केव्हा मिळणार याविषयी मात्र आता काहीही सांगता येत नाही.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
..अन्यथा थोबाड फोडो आंदोलन
खासदार संभाजीराजेंची तीन पत्रे केराच्या टोपलीत?
५ ते ६ टक्क्यांचा विकासदर गाठण्यासाठी भारतीय अर्थव्यवस
आदिवासी विद्यार्थ्यांवर राज्य सरकारची वक्रदृष्टी
चिपळूण ते मुंबई प्रवासासाठी रुग्णवाहिकेचा दर तब्बल ३५ ह
अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला पत्
२४ सप्टेंबर १८७३ सत्यशोधक समाजाची स्थापना- राष्ट्रपिता
देशात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार वाढले
सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची पुन्ह
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper