×

कोरोनापेक्षा जेवण न मिळाल्यास आम्ही उपासमारीनं मरू, हातावर पोट असलेल्या मजुरांच्या व्यथा

Published On :    26 Mar 2020  By : MN Staff
शेयर करा:


सगळ्यांनाच घरात राहण्याच्या सूचना करण्यात आल्यानं हातावर पोट असणार्‍या मजुरांना उपासमारीची चिंता सतावू लागली आहे. दिल्लीत जवळपास १५० हून अधिक मजूर आणि त्यांचे कुटुंबीय भुकेनं व्याकूळ असून, त्यांच्याकडे पाहणारं कोणीच नाही.





नवी दिल्ली:  देशात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला असून, संक्रमितांची संख्याही ५६० हून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं जनतेही चिंतेत असून, केंद्र आणि राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. 


दिल्ली-एनसीआरमध्येही कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढतच चाललं आहे. त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचंही आवाहन केलं जातं आहे. सगळ्यांनाच घरात राहण्याच्या सूचना करण्यात आल्यानं हातावर पोट असणार्‍या मजुरांना उपासमारीची चिंता सतावू लागली आहे. दिल्लीत जवळपास १५० हून अधिक मजूर आणि त्यांचे कुटुंबीय भुकेनं व्याकूळ असून, त्यांच्याकडे पाहणारं कोणीच नाही.  


दक्षिण दिल्लीतल्या छत्तरपूरस्थित फतेहपूर बेरीच्या चंदन होला भागात मजुरांची संख्या लक्षणीय आहे. घराबाहेर पडून हे मजूर हात जोडून उभे राहिलेले आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्या मजुरांना काहीही मिळालेलं नाही. ते दररोज मोलमजुरी करून पोटाची खळगी भरण्यापुरते पैसे कमावतात. त्या पैशातच कुटुंबाचाही उदरनिर्वाह केला जातो. 


संचारबंदी लागू केल्यानं जे काही पैसे उरलेले होते, त्यात दोन दिवस त्यांचं भागलं. परंतु आता घरात काहीही अन्न शिल्लक नाही. तसेच त्यांच्याजवळ आता पैसेसुद्धा नाहीत.


यांच्याकडे रेशन कार्डही नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले हे मजूर रोजंदारी करून पोट भरतात आणि उदरनिर्वाह करतात. दिल्लीत जनता कर्फ्यूनंतर लॉकडाऊन करण्यात आल्यानं ते स्वतःच्या गावीसुद्धा आता जाऊ शकत नाहीत. या मजुरांकडे जेवणासाठी सामान आणि पैसेसुद्धा नाहीत.


एका मुलानं पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितलं की, ४ दिवसांपासून उपाशी आहे, मला खाण्यासाठी काहीही  मिळालेलं नाही. वडील बाजारात गेल्यास पोलीसवाले त्यांना मारून परत पाठवतात. नोकरदारांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, परंतु ज्यांचं हातावर पोट असलेल्यांनी काय करायचं, अशा प्रश्न आता विचारला जात आहे. 


ज्या मजुरांकडे रेशनिंग कार्ड आहे, त्यांना धान्य मिळेल. परंतु ज्यांच्याकडे रेशनकार्डच नाही, अशा मजुरांनी काय खायचं. यावर सरकारकडून ठोस अशी उपाययोजना करण्यात आलेली नाही.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित,
अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल, विशिष्ट धर्
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, शिवसेनेने भाजपल
भारतात शाळा कधी आणि कशा सुरू होणार?
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कला मिळतेय आंतरराष्ट्रीय सम
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनाही आता ‘वर्क फ्रॉम
देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, मध्यप्रदेश, राजस्
माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळेल का...?
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाला राष्ट्रीय ख्रिश्‍च
अमेरिकेतील लढा आणि भारतातील भूमिपुत्रांचा लढा
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
राज्य सरकार कर्जाच्या खाईत, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी
सीबीआयच्या विशेष न्यायालयात ३२ पैकी चार आरोपींनी दिली ज
रविवारपासून घरोघरी वृत्तपत्र वितरणाला परवानगी
लॉकडाऊनच्या काळातील पगार हा मालक-कामगारांचा प्रश्‍न, के
‘ऍटलस’ सायकल कंपनीला टाळे, हजारो कर्मचार्‍यांवर बेकारी
आठ वर्षात देशात ७५० वाघांचा मृत्यू, महाराष्ट्र-मध्यप्रद
राज्यपाल कोशियारी यांच्या हाकलपट्टीची प्रधानमंत्र्या
गोंदियात महामंडळाचे दोन लाख क्विंटल धान उघड्यावर, पावसा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper