देशभरात चर्चेत आलेल्या ईव्हीएमविरोधातील लोकभावनेला डायव्हर्ट करण्यासाठीच राहुल गांधींच्या मुद्यावर ब्राम्हण-बनिया मीडिया व शासकवर्ग विदेशी ब्राम्हणाने फोकस ठेवला आहे. म्हणून ईव्हीएमविरोधी चर्चा बंद आणि राहुल गांधींचीच चर्चा सुरू झाली आहे. यामागे कसे षड्यंत्र आहे हे समजून घेण्याची गरज आहे.
राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथे २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारसभेमध्ये ‘सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे?’ असे विधान केले होते. त्यानंतर सुरतचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. सुरतच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एच. एच. वर्मा यांनी या खटल्यावर निकाल देत राहुल यांना २ वर्षांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला. याच निर्णयावर कारवाई करत लोकसभा सचिवालयाने तत्काळ अधिसूचना काढत राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले.
तर राहुल गांधी यांचे ‘सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे?’ हे विधान ‘ओबीसींविरोधातील हल्ला’ असा कांगावा भाजपाने केला आहे. केंद्रातील भाजपा सरकार ओबीसींची जातीनिहाय जनगणना करायला तयार त्याच भाजपाला ओबीसींचा पुळका केव्हापासून आला? असा प्रश्न निर्माण होतो. एवढेच नाही तर भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण लढत आहोत, आणि त्यासाठी कोणतीही किंमत चुकविण्यास आपण तयार असल्याची बतावणी राहुल गांधी यांनी केली आहे. या सर्व घटनाक्रमामागे क्रोनोलॉजी पाहिल्यास देशभरात चर्चेत आलेल्या ईव्हीएमविरोधातील लोकभावनेला डायव्हर्ट करण्यासाठीच राहुल गांधींच्या मुद्यावर ब्राम्हण-बनिया मीडिया व शासकवर्ग विदेशी ब्राम्हणाने फोकस ठेवला आहे. म्हणून ईव्हीएमविरोधी चर्चा बंद आणि राहुल गांधींचीच चर्चा सुरू झाली आहे. यामागे कसे षड्यंत्र आहे हे समजून घेण्याची गरज आहे.
२००४-०९ आणि २०१४-२०१९ मध्ये अनुक्रमे कॉंग्रेस व भाजपा या विदेशी ब्राम्हणांच्या पक्षाने खुलेआमपणे ईव्हीएम घोटाळा केला आणि केंद्राची सत्ता ताब्यात घेतली. त्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरण्यात आले. म्हणजे कॉंग्रेस-भाजपा आणि निवडणूक आयोग ईव्हीएममध्ये खुलेआमपणे घोटाळा करत आहेत. १३० कोटी लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत. म्हणून भारताची निवडणूक जगात सर्वात महागडी ठरत आहे. लोकांना मूर्ख बनवून ईव्हीएम घोटाळा करून कॉंग्रेस-भाजपाने केंद्राची सत्ता ताब्यात घेतली.
याची पोलखोल व्हायला हवी व लोकांना खरीखुरी माहिती मिळावी या एकाच उद्देशापोटी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा पार्ट-२ कन्याकुमारी ते कश्मीर अशी सुरू झाली आहे. ही परिवर्तन यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएम घोटाळा करून कॉंग्रेस-भाजपा आणि निवडणूक आयोग लोकशाही व संविधानाच्या विरोधात काम असेल तरआपल्यालाही लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएम फोडावेच लागतील असा इशारा मेश्राम यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी लाखो कार्यकर्त्यांना तयारीदेखील करायला सांगितले आहे. कारण ईव्हीएम फोडणे एकट्या-दुकट्याचे काम नाही तर ते लाखो लोकांचे काम आहे.
दरम्यान, या राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचा परिणाम आता राजकीय पक्षांवरदेखील झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनीही ईव्हीएमविरोधी भूमिका घेतली आहे. त्याचीच परिणिती म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली आणि त्या बैठकीत ईव्हीएमविरोधी मुद्दा उचलण्यात आला. ईव्हीएमविरोधी मुद्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला कॉंग्रेसचे दिग्विजय सिंह, समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभा सदस्य असलेले कपिल सिब्बल, सीपीआय(एम)चे डी.राजा, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, शिवसेना, आरजेडी आणि इतर अनेक पक्षांचे उपस्थित होते.
ईव्हीएमविरोधी मुद्दा देशभरात तापला आणि लोकांनीच आंदोलन केले तर आपल्याला गाशा गुंडाळावा लागेल, वेळप्रसंगी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर आणावे लागतील अशी शक्यता बळावली. बॅलेट पेपर आले तर कॉंग्रेस-भाजपाविरोधात लोकभावना आहे, त्याचे पडसाद निवडणुकीत उमटू शकतात याची भीती असल्यानेच राहुल गांधी यांचा मुद्दा तापवण्यात आला आहे.
सुरत न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत लोकसभा सचिवालयाने तत्काळ अधिसूचना काढत राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात ईव्हीएमविरोधी मुद्दा बाजूला पडला असून राहुल गांधी यांच्या मुद्याकडे लोकांना डायव्हर्ट करण्यात विदेशी ब्राम्हणवादी शक्ती यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचा लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा मुद्दा चर्चेत ठेवण्यात आला आहे.
राहुल गांधी यांच्यावर फोकस ठेवून ईव्हीएमविरोधी मुद्दा डायव्हर्ट करण्याचा त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी देशभरातील लोकभावना ईव्हीएमविरोधी बनलेली आहे. त्यामुळे देशभरात ईव्हीएमविरोधी जनआंदोलन उभे राहिले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण आजच्या घडीला बहुजनांना शासक वर्ग बनण्यासाठी ईव्हीएम हाच अडथळा आहे. ईव्हीएम आधुनिक मनुस्मृती आहे. विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने मिळालेला मताचा अधिकार ईव्हीएममुळे संपुष्टात आला आहे. हा मताचा अधिकार कॉंग्रेस-भाजपा या ब्राम्हणांच्या पक्षांना शासक वर्ग बनवण्यासाठी नाही तर बहुजनांना शासक वर्ग बनण्यासाठी आहे. म्हणून ईव्हीएमला गाडणे गरजेचे बनले आहे.
दिलीप बाईत
९२७०९६२६९८
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.