×

नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी भाजपशासित राज्यांकडून १८ कोटींची उधळपट्टी

Published On :    27 Nov 2022
साझा करें:

जनतेच्या पैशांचा अपव्यय, आरटीआयमधून उघड



नवी दिल्ली: गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि कर्नाटकसह भाजपशासित राज्य सरकारांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्याकरिता तब्बल १८ कोटी ३ लाख ८९ हजार २५२ रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. आरटीआयमधून ही बाब समोर आली आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यय करण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.


खरं तर, सुप्रीम कोर्टाने सरकारी जाहिरातींसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ‘कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्त्वाचा गौरव टाळा,’ असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. तरीसुद्धा अशा प्रकारची सरकारी जाहिरात दिली जाते, हे आश्‍चर्यकारक असल्याचं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. अशा प्रकारे ‘संवैधानिक जबाबदारी पार पाडल्याबद्दल’ राज्य सरकारे प्रधानमंत्र्यांचे आभार मानतात, हा प्रकार विचित्र असल्याचं कायदेतज्ज्ञांचं मत आहे.


दरम्यान, या सर्व जाहिरातींचा संबंध भारतीय जनता पक्षाशी नाही, असं स्पष्टीकरण भाजपच्या नेत्यांनी दिलं आहे. शिवाय, वर नमूद केलेल्या सर्व भाजपशासित राज्य सरकारांनीही याप्रकरणी कोणतंही उत्तर देण्याचं टाळल्याचं दिसून आलं. यानुसार, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि कर्नाटकमधील भाजपशासित सरकारांनी कोरोना लसीकरणासंदर्भात धन्यवाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तसंच नल से जल आणि प्रधानमंत्री आवास योजना यांच्याबाबत धन्यवाद देण्यासाठी जाहिरात दिली. 


या जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही केंद्र सरकार राज्य सरकारांना ‘कोरोना लसीबद्दल प्रधानमंत्री मोदींचे आभार’ अशा जाहिराती करण्यास सांगत आहे, अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या.त्यावेळी करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. गुजरात  २ कोटी १० लाख २६ हजार ४१०, उत्तराखंड  २ कोटी ४२ लाख ८४ हजार १९८, हरियाणा  १ कोटी ३७ लाख ४३ हजार ४९०, कर्नाटक  २ कोटी १९ लाख.


बिगर भाजप राज्यांमध्येही अशा प्रकारच्या जाहिराती देण्यात आल्या का याविषयीही बीबीसीने माहिती मागवली. त्या माहितीनुसार, दिल्ली आणि महाराष्ट्रात (जून २०२१ मध्ये राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेत होतं) या राज्यांच्या सरकारांनी अशी कोणतीही जाहिरात दिली नव्हती. याशिवाय, मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच ‘नल से जल’ योजना आणि ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या जाहिरातींमध्ये ‘प्रधानमंत्री मोदींचे आभार’ म्हणून ९ कोटी ९४ लाख ३५ हजार १५४ रुपये खर्च केल्याचं उघड झालं आहे. 


ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि बिझनेस स्टँडर्ड वर्तमानपत्राचे राजकीय संपादक सिद्धार्थ कालहंस यांच्या मते, वरील जाहिराती या जनतेच्या पैशाचा अपव्यय होत्या. गेल्या काही वर्षांपासून भाजपची सरकारे कोणत्या ना कोणत्या योजनेच्या किंवा उपक्रमाच्या निमित्ताने प्रधानमंत्र्यांचा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांचा चुराडा होतो. सरकार आता आपल्या कामाचा प्रचार करण्यासाठी किंवा प्रधानमंत्री मोदी यांच्या जाहिरातीसाठी कोणत्याही निवडणुकांची वाट पाहत नाही. उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये जाहिरातींसाठी वेगळा निधी देण्यात आला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर करण्यासाठी आरएसएस-भा
प्रजासत्ताक दिन: भारतात प्रजेचे राज्य आहे का?
’संविधानाने सवलत नाही संधी दिली’
देशाची आरोग्य व्यवस्था कोमात, सार्वजनिक आरोग्य केंद्रा
ईव्हीएम भंडाफोड यात्रेला रोखण्याचे षड्यंत्र
ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा रोखण्या
भारत मुक्ती मोर्चाची उद्यापासून कन्याकुमारी ते काश्मीर
बहुजन महापुरूषांचा अपमान करणारे कोश्यारी यांच्या राजीन
जेएनयुमध्ये बीबीसी डॉक्युमेंटरी स्क्रीनिंगवरून राडा
शिंदे आणि फडणवीसांना सरकार स्थापण्यासाठी पत्र अथवा निम
२००२ च्या दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंटरी रोखण्याची सरका
हिंदू-मुस्लिम दंगली व ब्राम्हण्यवादी (भाग-१)
हिंदू-मुस्लिम दंगली व ब्राम्हण्यवादी (भाग-२)
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केंद्राची दडप
बुवाबाजी ही सामाजिक किड...!
पेट्रोल स्वस्त होईल अशी अपेक्षा करू नका
न्यायाधीशांच्या नियुक्तीचा निर्णय स्वत:कडे घेऊन सर्वोच
गरिबांसाठीच्या योजनेत आलिशान घर मालकांची नावेही समाविष
२००२ मधील गुजरात दंगलीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच
राजस्थानवर जीडीपीच्या तब्बल ४० टक्के, १८ टक्के व्याज असल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper