×

सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा कोर्स

Published On :    26 Nov 2022
साझा करें:

फुले दाम्पत्याच्या विज्ञाननिष्ठेला दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि टिळक महाविद्यालय वणीकडून सुरूंग



पुणे: राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व देशातील पहिल्या महिला शिक्षिका माता सावित्रीमाई फुले यांनी विज्ञाननिष्ठेला प्राधान्य देत देशात शिक्षणाचा पाया घातला, म्हणून फुले दाम्पत्यांकडे तालमीत तयार झालेल्या मुक्ता साळवे हिने तुमचा आणि आमचा धर्म एक कसा? असा तार्किक प्रश्‍न व्यवस्थेला विचारला होता. परंतु आता फुले दाम्पत्याच्या विज्ञाननिष्ठेला व तार्किकतेला सुरूंग लावण्याचे काम दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि टिळक महाविद्यालय वणी यांनी केले आहे. आता सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा कोर्स सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.  


पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठ संस्कृत प्राकृत विभाग, टिळक महाविद्यालय वणी संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती अथर्वशीर्षवरच्या सर्टिफिकेट कोर्सला सुरुवात झाली आहे. हा कोर्स सुरू करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. १६ नोव्हेंबर रोजी याची घोषणा करण्यात आली. हा कोर्स पूर्ण केल्यानंकर विद्यार्थ्यांना एक क्रेडिट पॉइंटही मिळणार आहे. ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार आहे. पण या कोर्सवरून आता वाद निर्माण होण्याचीही चिन्हे आहेत.


या निर्णयावरून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुणे शहराला ज्ञानार्जनाची मोठी परंपरा आहे. विज्ञाननिष्ठेची परंपरा आहे. त्याचबरोबर या विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१ नुसार विज्ञाननिष्ठेचा प्रचार आणि प्रसार करणं हे प्रत्येक नागरिकाचं आणि संस्थांचं कर्तव्य असताना सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठासारख्या एका जबाबदार विद्यापीठाने एका खाजगी संस्थेबरोबर असा अभ्यासक्रम सुरू करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. प्रमाणपत्र देणं, विद्यापीठाच्या सही शिक्क्याचं प्रमाणपत्र मिळणं यामुळे अनिष्ट पायंडा पडत आहे.


हा कोर्स ऑनलाईन करता येणार आहे. अथर्वशीर्षाचं अर्थाचे विवेचन असणारे व्हीडिओ ट्रस्टच्या यू टयूब चॅनलवर आहेत. अथर्वशीर्षाचे २१ भाग आहेत. कोर्समध्ये त्याच्यासोबत एक प्रश्नमालिका येणार आहे. त्याची उत्तरे दिल्यानंतर पुढील भाग पाहता येणार असून ती पूर्ण केल्यानंतर ई मेलवर सर्टिफिकेट मिळणार आहे. जेव्हा हा कोर्स सुरू करण्यात आला तेव्हा यावेळी सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे उपस्थित होते. या उपक्रमाचे कारभारी काळे यांनी कौतुक करत मानसिक गुलामगिरीचा नमुना पेश केला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर करण्यासाठी आरएसएस-भा
प्रजासत्ताक दिन: भारतात प्रजेचे राज्य आहे का?
’संविधानाने सवलत नाही संधी दिली’
देशाची आरोग्य व्यवस्था कोमात, सार्वजनिक आरोग्य केंद्रा
ईव्हीएम भंडाफोड यात्रेला रोखण्याचे षड्यंत्र
ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा रोखण्या
भारत मुक्ती मोर्चाची उद्यापासून कन्याकुमारी ते काश्मीर
बहुजन महापुरूषांचा अपमान करणारे कोश्यारी यांच्या राजीन
जेएनयुमध्ये बीबीसी डॉक्युमेंटरी स्क्रीनिंगवरून राडा
शिंदे आणि फडणवीसांना सरकार स्थापण्यासाठी पत्र अथवा निम
२००२ च्या दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंटरी रोखण्याची सरका
हिंदू-मुस्लिम दंगली व ब्राम्हण्यवादी (भाग-१)
हिंदू-मुस्लिम दंगली व ब्राम्हण्यवादी (भाग-२)
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केंद्राची दडप
बुवाबाजी ही सामाजिक किड...!
पेट्रोल स्वस्त होईल अशी अपेक्षा करू नका
न्यायाधीशांच्या नियुक्तीचा निर्णय स्वत:कडे घेऊन सर्वोच
गरिबांसाठीच्या योजनेत आलिशान घर मालकांची नावेही समाविष
२००२ मधील गुजरात दंगलीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच
राजस्थानवर जीडीपीच्या तब्बल ४० टक्के, १८ टक्के व्याज असल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper