×

देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर

Published On :    25 Nov 2022
साझा करें:

गुजरातमधील राजकोट एम्समध्ये ९० टक्के जागा रिक्तनवी दिल्ली: आठ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त करून केंद्रातील आरएसएस-भाजपाचे सरकार आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामासह वैद्यकीय शिक्षणावर विविध दावे करत आहे. मात्र हे दावे फोल ठरत असून देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव असल्याने आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर असून शेवटची घटका मोजत आहे. तर गुजरातमधील राजकोट एम्समध्ये ९० टक्के जागा रिक्तअसल्याचे समोर आले आहे.


२०१४ आणि २०२२ ची तुलनात्मक आकडेवारी सादर केली जात आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ५५ टक्क्यांनी वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. जागांमध्ये ८० टक्के वाढ करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या विस्तारासाठी दावे केले जात आहेत. कोरोना काळात गंगेत तरंगणार्‍या मृतदेहांची हृदयद्रावक दृश्ये तुम्ही पाहिली असतीलच. किंबहुना, सत्य हे आहे की भारताची आरोग्य व्यवस्था केवळ कोलमडलीच नाही, तर भारतातील आरोग्य पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय शिक्षणाची स्थिती वाईट परिस्थितीतून जात आहे. एका एम्समध्येही पूर्णपणे जागा भरलेल्या नाहीत. यावरून याचा अंदाज लावता येतो.


दरम्यान, गुजरात निवडणुकीदरम्यान गुजरातमधील राजकोेट एम्समध्ये ९० टक्के पदे रिक्त असल्याची आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी १५ मार्च २०२२ रोजी राज्यसभेत सादर केलेल्या अहवालानुसार, देशात एकूण १९ एम्स आहेत. यामध्ये शिक्षकांची ४ हजार २०९ मंजूर पदे असून त्यापैकी केवळ १ हजार ९९८ पदे भरण्यात आली असून २ हजार २११ पदे रिक्त आहेत. 


एकूण पदांपैकी जवळपास निम्मी म्हणजे ४७.४ टक्के पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ निवासी २ हजार ७९४ पदे मंजूर आहेत, त्यापैकी १ हजार १९० पदे म्हणजे ४२.५ टक्के पदे रिक्त आहेत. त्याच वेळी, कनिष्ठ निवासी २ हजार ६३८ पदे मंजूर आहेत, त्यापैकी ४७० पदे रिक्त आहेत. या सर्व १९ एम्समध्ये शिक्षकेतर कर्मचार्‍यांची ३५ हजार ३४६ पदे मंजूर असून त्यापैकी १७ हजार ८०४ पदे रिक्त आहेत. देशातील एकाही एम्समध्ये पुरेसे शिक्षक नाहीत याचा हा भक्कम पुरावा आहे.


गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमुळे भाजपकडून मोठे दावे केले जात आहेत. पण, ग्राउंड रिऍलिटी काय आहे हे सांगत नाहीत. किंबहुना निवडणूक सभांमध्ये ज्या एम्सचे गुणगान केले जाते तेच व्हेंटिलेटरवर आहे. हे एम्स कसे चालू आहे हे सांगितले जात नाही? वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवांबाबत भाजप खरोखरच गंभीर आहे की निवडणुकीचा स्टंट आहे? Aएम्ससारख्या वैद्यकीय संस्थांचे उद्दिष्ट केवळ चांगले उपचार देणे नसून चांगले डॉक्टर तयार करणे, दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देणे आणि आरोग्य क्षेत्रात उच्चस्तरीय संशोधन करणे हे आहे हे सर्वज्ञात आहे. पण यापैकी एकाही उद्देशात राजकोट एम्स यशस्वी होताना दिसत नाही. कारण राजकोट एम्समध्ये जवळपास ९० टक्के पदे रिक्त असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घाईघाईने सुरू करण्यात आल्याचे दिसते.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने १५ मार्च २०२२ रोजी राज्यसभेत एम्समधील डॉक्टर आणि प्राध्यापकांच्या स्थितीबाबत जारी केलेल्या अहवालानुसार, राजकोट एम्समध्ये १८३ अध्यापन शिक्षक पदांना मान्यता देण्यात आली आहे, त्यापैकी फक्त ४३ पदांची भरती करण्यात आली आहे. तर १४० पदे रिक्त आहेत. ज्येष्ठ निवासी पदांची ४० मंजूर पदे असून त्यापैकी केवळ १५ पदे भरलेली असून २५ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ निवासी ४० पदे मंजूर असून त्यापैकी केवळ २८ पदे भरलेली असून १२ पदे रिक्त आहेत. म्हणजेच एकूण २६३ पदे मंजूर असून त्यापैकी १७७ पदे म्हणजे ६७ टक्के पदे रिक्त आहेत. केवळ डॉक्टर्स आणि अध्यापकांचीच कमतरता आहे असे नाही, तर शिक्षकेतर पदांच्या भरतीची स्थिती आणखी बिकट आहे. राजकोट एम्समध्ये ९५ टक्के शिक्षकेतर पदे रिक्त आहेत. अहवालानुसार, राजकोट एम्समध्ये शिक्षकेतर कर्मचार्‍यांची ९५१ पदे मंजूर असून त्यापैकी फक्त ४६ पदांची भरती करण्यात आली आहे. अशाप्रकारे, राजकोट एम्समध्ये शिक्षकेतर कर्मचार्‍यांची ९०५ पदे म्हणजेच ९५ टक्के पदे रिक्त आहेत.


नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाइन राजकोट एम्सची पायाभरणी केली होती. एम्सचे बांधकाम सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू झाले. २०२०-२१ च्या वार्षिक अहवालात असे लिहिले आहे की सरकार एम्स लवकरच कार्यान्वित करण्यास उत्सुक आहे. परिणामी, बांधकाम पूर्ण न करता, सरकारने पीडीयू मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल, राजकोटमध्ये तात्पुरत्या जागेची व्यवस्था केली. म्हणजे इमारत, प्रयोगशाळा आणि इतर सुविधांशिवाय एम्स सुरू झाली. एवढेच नाही तर राजकोट एम्समध्ये एमबीबीएसची पहिली बॅच पुरेशा शिक्षकांशिवाय सुरू झाली. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ओपीडी सुरू करण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले होते.


आता प्रश्न पडतो की सरकारला इतकी घाई का झाली? लोकांच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत सरकार गंभीर होते की २०२२ मध्ये गुजरातमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठी दबाव होता. एमबीबीएसची पहिली बॅच २०२१ मध्ये एम्स राजकोटमध्ये सुरू झाली. पण तेथे पुरेसा व्याख्यान कक्ष, थिएटर आणि शिक्षक होते का? नक्कीच नाही. वैद्यकीय अध्यापकांची एकूण १८३ पदे मंजूर असताना केवळ १५ पदे भरण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले. शिक्षकेतर कर्मचार्‍यांची ९०० पदे मंजूर असून त्यापैकी केवळ ९ पदे भरण्यात आली आहेत. हे आकडे मार्च २०२१ चे आहेत आणि एम्स राजकोटच्या वार्षिक अहवालातून घेतले आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर करण्यासाठी आरएसएस-भा
प्रजासत्ताक दिन: भारतात प्रजेचे राज्य आहे का?
’संविधानाने सवलत नाही संधी दिली’
देशाची आरोग्य व्यवस्था कोमात, सार्वजनिक आरोग्य केंद्रा
ईव्हीएम भंडाफोड यात्रेला रोखण्याचे षड्यंत्र
ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा रोखण्या
भारत मुक्ती मोर्चाची उद्यापासून कन्याकुमारी ते काश्मीर
बहुजन महापुरूषांचा अपमान करणारे कोश्यारी यांच्या राजीन
जेएनयुमध्ये बीबीसी डॉक्युमेंटरी स्क्रीनिंगवरून राडा
शिंदे आणि फडणवीसांना सरकार स्थापण्यासाठी पत्र अथवा निम
२००२ च्या दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंटरी रोखण्याची सरका
हिंदू-मुस्लिम दंगली व ब्राम्हण्यवादी (भाग-१)
हिंदू-मुस्लिम दंगली व ब्राम्हण्यवादी (भाग-२)
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केंद्राची दडप
बुवाबाजी ही सामाजिक किड...!
पेट्रोल स्वस्त होईल अशी अपेक्षा करू नका
न्यायाधीशांच्या नियुक्तीचा निर्णय स्वत:कडे घेऊन सर्वोच
गरिबांसाठीच्या योजनेत आलिशान घर मालकांची नावेही समाविष
२००२ मधील गुजरात दंगलीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच
राजस्थानवर जीडीपीच्या तब्बल ४० टक्के, १८ टक्के व्याज असल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper