×

आतंकवादी संघटन आरएसएसविरोधात राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलनाची घोषणा

Published On :    6 Oct 2022
साझा करें:

आरएसएसवर बंदी घालण्याची वामन मेश्राम यांची मागणी



नागपूर: आतंकवादी संघटन आरएसएसविरोधात राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून हे आंदोलन चार चरणात होणार आहे. तर आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केली आहे. एमएनटीव्हीवर त्यांनी आंदोलनाची घोषणा केली.


दि. ६ ऑक्टोबरला आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याची आम्ही घोषणा केली होती. माझ्या माहितीनुसार आमच्या संघटनेचे १.५ लाखांपेक्षा जास्त लोक नागपुरात पोहचलेे आहेत. ते लोक नागपुरातील वेगवेगळ्या जागांवर थांबले आहेत. बेजन बाग ग्राऊंडवर त्यांना एकत्रित जमण्यास सांगण्यात आले होते. ही माहिती कार्यकर्त्यांना पहिल्यापासून देण्यात आली होती. यासंदर्भात मी काही खास बाबी सांगू इच्छित आहे. 


नागपूर हायकोर्टाच्या माध्यमातून मोर्चा व कार्यक्रमाला परवानगी देण्यापासून मनाई केली. न्यायपालिकेला धमकी देऊन असे करण्यात आले, त्याची सारी साक्ष वकीलांकडे आहे. वकीलांनी याची माहिती संघटनेला दिली आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्ही हा विषय सर्वोच्च न्यायालयात घेऊन गेलो आहोेत. आज सकाळी त्याची सुनावणी होण्याची संभावना आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर आम्ही आंदोलनाची रूपरेखा घोषित करू. 


हे पण वाचा: विदेशी ब्राम्हण मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस यांची झुंडशाही-डिटेंशनची ऑर्डर नसताना पोलीसांना पुढे करून जबरदस्तीने वामन मेश्राम यांना घेतले ताब्यात


सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरच्या फ्रेमवर्कमध्ये राहून, कायदा व संविधानाच्या चौकटीत राहून आमच्या कार्याची पद्धत आहे. आम्ही त्याचे उल्लंघन न करता आम्ही आमचे काम करू. आरएसएस मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याची जी मूळ योजना आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी एक पद्धत सांगतो. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत आम्ही त्याठिकाणी कार्यक्रम करणार होतो. तिथून चरणबद्ध पद्धतीने मोर्चा आम्ही काढणार होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. त्या चौकटीत आम्ही अंतिम निर्णय घोषित करणार आहोत असे मेश्राम यांनी सांगितले.


हायकोर्टाच्या माध्यमातून जो निर्णय दिला गेला. त्यासाठी षड्यंत्र करण्यात आले. आर्टीकल १९ आमचा मौलिक अधिकार आहे त्याला रोखण्याचे जे षड्यंत्र करण्यात आले. न्यायपालिकेला आमच्या बाजूने निर्णय न देण्यासाठी षड्यंत्र करण्यात आले. हे षड्यंत्र लक्षात घेऊन आम्ही आमचा कार्यक्रम करण्याची योजना बनवत आहोत. आरएसएसची योजना काय आहे तर आरएसएस एक राष्ट्रव्यापी आतंकवादी संघटन आहे. 


अजमेर बॉम्बस्फोटात त्यांच्या कार्यकर्त्यांना आजीवन कारावास झाला. याचा अर्थ मी जे सांगतोय ते न्यायपालिकादेखील मानत आहे. त्यांच्याविरोधात १८ खटले देशभरात सुरू आहेत. एक खटला असा आहे की, देशद्रोहाचा गुन्हा आरएसएसवर दाखल करण्यात आला आहे. जे स्वत:ला देशभक्त संघटन सांगतात त्यांनी संविधानावर विश्‍वास व्यक्त करतो अशाप्रकारचा कुठलाही प्रस्ताव पारित केलेला नाही. 


उलट त्यांच्या कार्यकर्त्यांना संविधानाविरोधात बोलायला लावतात. राष्ट्रीय स्तरावर आमच्याकडे जी माहिती हाती आली आहे, त्यामध्ये या मोर्चाला रोखणे अथवा तमाम आतंकवादी गतीविधीची माहिती लोकांना कळू नये यासाठी तसा त्यांचा प्रयत्न आहे. तशाप्रकारचा डाटा आमच्याकडे उपलब्ध आहे. या बाबी लक्षात घेऊन हे संघटन आतंकवादी आहे. संविधानविरोधी आहे असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


हिंदू-मुस्लिम थेरीच्या आधारावर १४ ऑगस्ट १९४७ ला भारताचे विभाजन झाले तशीच हालत त्यांनी दुसर्‍यांदा निर्माण केली आहे. याविरोधात आमचे आंदोलन जारी राहणार आहे. आरएसएसच्या नागपूर मुख्यालयावर मोर्चा जाऊ न देण्याचे ते प्रयत्न करत आहेत. पोलीस व कोर्टाचा व धमकीचा सहारा घेऊन ते केले जात आहे. ते संघटन आतंकवादी, संविधानविरोधी व देशाच्या विभाजनाच्या षड्यंत्रात सहभागी आहे ही माहिती लोकांपर्यंत पोहचू नये म्हणून त्यांची रणनीती आहे. 


या रणनीतीला लक्षात घेऊन आम्ही आमचे आंदोलन पुर्नपरिभाषित करत आहोत. ते एका ठिकाणी मोर्चा घेऊन जायला रोखण्याचे काम करत आहेत. तर ३१ राज्यात, ६७४ जिल्ह्यात, ४ हजारापेक्षा जास्त तहसील आणि २२ हजारापेक्षा जास्त ब्लॉकमध्ये व १.५ लाखांपेक्षा जास्त गावात आमचे आंदोलन चार चरणात घोषित करत आहोत. 


१४ ऑक्टोबरला देशभरातील सार्‍या जिल्ह्यात धरणे प्रदर्शन केले जाणार आहे. २२ ऑक्टोबरला श्रृखंलाबद्ध उपोषण केले जाईल. २९ ऑक्टोबरला देशभरात प्रदर्शन रॅली काढली जाईल. ६ नोव्हेंबरला देशभरात आरएसएच्या विरोधात  जेलभरो आंदोलन होईल. एक महिन्यात जेलभरोसाठी ११ लाख लोकांना आंदोलनासाठी तयार करू. हे अभियान आजपासून सुरू होईल. सार्‍या देशभरातील ११ लाख लोकांना तयार केले जाणार आहे असे मेश्राम म्हणाले.


आरएसएस संविधानविरोधी व आतंकवादी संघटन आहे. हे राष्ट्रव्यापी आतंकवादी संघटन आहे. यासंदर्भात राज्यस्तरीय मोठे पोलीस अधिकारी एस.एम.मुश्रीफ यांनी व्हिडीओ व पुस्तके छापली आहेत. पुस्तके लिहली आहेत. सर्वच्या सर्व पुरावे दिले आहेत. याचे सारे पुरावे सोशल मीडियातून तुम्हांला देण्यात येतील. त्यासाठी ११ लाख लोकांना जेलभरो आंदोलनासाठी रजिस्टर केले जाईल आणि आरएसएसवर बंदी घातली जावी अशी मागणी केली जाणार आहे. 


आतंकवादी संघटना म्हणून दुसर्‍या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आरएसएसदेखील आतंकवादी संघटन आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना अजमेर बॉम्बस्फोटात आजीवन कारावास झालेला आहे. २०००-२०२० या कालखंडात जेवढे बॉम्बस्फोट झाले आहेत, त्यामध्ये आरएसएसच्या लोकांचाही हात आहे. याचे सारे पुरावे मुश्रीफ यांनी पुस्तकात दिले आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हादेखील दाखल झाला आहे. 


या सारी बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारकडे मागणी आहे की, आरएसएसवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घाला. हे आतंकवादी संघटन आहे. देशविरोधी संघटन आहे. हिंदू-मुसलमानाच्या नावावर देशाच्या विभाजनाचे षड्यंत्र आखले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालावी अशी आमची मागणी आहे. त्यासाठी ११ लाख लोकांना जेलभरो आंदोलनासाठी तयार करत आहोत. याच्या तयारीची घोषणा करत आहोत. हे चार चरणात आंदोलन होईल अशी घोषणा मेश्राम यांनी केली.


जो आरएसएस मुख्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार होतो. त्याला हायकोर्टाने रोख लावला. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाने आम्हांला मोर्चा काढण्याची परवानगी दिली तर येणार्‍या कालखंडात मोर्चा काढला जाईल. आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याच्या कार्यक्रमापेक्षा २५ पट जास्त मोठा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम करत आहेत. 


यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याला जोडून घ्यावे. सारी ताकद, क्षमता व शक्तीने  या आंदोलनात सार्‍या देशभरात लोकांना जोडावे लागेल. हे आमच्या भविष्यासाठी व देशाला व संविधानाला वाचवण्यासाठी सर्वात जास्त गरजेचे आहे. एससी, एसटी, ओबीसी, एमबीसी, एनटी, मायनॉरिटीच्या लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मेश्राम यांनी केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
देशसेवा करू इच्छिणारा कधीच अग्निवीर बनणार नाही
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ७० ट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper