×

दसर्‍याला रावण दहन केल्यास ऍट्रोसिटी दाखल करा

Published On :    5 Oct 2022
साझा करें:

आदिवासी बचाव अभियान आणि आदिवासी संघटनेची मागणी, सटाणा पोलीसांना निवेदन



नाशिक : दसर्‍याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यास सटाणा तालुक्यातील आदिवासी बचाव अभियान आणि आदिवासी संघटनांनी विरोध केला आहे. तर कुणी रावण दहन केल्यास त्याच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या संघटनेने पोलिसांकडे केली आहे.


रावण हा विविध गुणांचा समुच्चय आहे. तो संगीत तज्ञ, राजनीतीज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी होता. इतके असताना त्याच्या प्रतिमेचे दहन करून त्याला व त्याच्या गुणांना अपमानित करणे चुकीचे आहे, असे म्हटले आहे. 


हे पण वाचा: बिहारमध्येही ओबीसी आरक्षणास ब्रेक-महापालिका निवडणुकीतील आरक्षण बेकायदा-पाटणा उच्च न्यायालय


दसर्‍याच्या दिवशी न्यायप्रिय, महात्मा राजा रावण दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्राच्या आदिवासी बचाव अभियान आणि सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र येतात सटाणा पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार आणि पोलीस अधिकारी पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी जे नियम आहे त्या नियमानुसारच कारवाही करण्यात येईल असे आश्‍वासन दिले आहे.


हे पण वाचा: ‘आरएसएस’ देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन


रावण हा सर्वांना न्याय देणारा, न्यायप्रिय राजा होता. असे असताना इतिहासाचे विकृतीकरण करुन रावणाला खलनायक ठरविण्यात आले. तसेच दरवर्षी दसर्‍याला रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. कारण अशा राजाला इतिहास वर्ण व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही वास्तविक राजा रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही आणि यापुढे देखील होणार नाही, असं निवेदनात म्हटलं आहे.


हे पण वाचा: भारत मुक्ती मोर्चा-बहुजन क्रांती मोर्चाची नागपूरमध्ये उद्या विशाल महारॅली-देश व संविधानाला वाचवण्यासाठी ‘आरएसएस’ मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च


तमिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरं आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्य प्रदेशात आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाट छत्तीसगड, झारखंड येथे रावणाची मिरवणूक काढून पूजा केली जाते. रावण आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान आणि दैवत आहे. परंतु आदिवासींची श्रद्धा असलेल्या राजाला जाळण्याची कुप्रथा आणि परंपरा जाणीवपूर्वक करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून रावण दहनाची परवानगी कोणालाही देऊ नये तर ही प्रथा कायमस्वरूपी बंद करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
जुलैनंतर १ हजार शेतकर्‍यांनी संपवले जीवन!अतिवृष्टीची म
नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी भाजपशासित राज्यांक
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper