×

‘आरएसएस’ देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन

Published On :    5 Oct 2022
साझा करें:

२००२-०३ मधील देशभरातील बॉम्बस्फोट आरएसएस व त्यांच्या सहयोगी संघटनांकडून, राज्याचे माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम.मुश्रीफ यांचा हल्लाबोल, भारत मुक्ती मोर्चाच्या ६ ऑक्टोबरच्या महारॅलीलाही पाठिंबा



पुणे: २००२ ते २००३ या काळात देशभरात जे बॉम्बस्फोट झाले, ते आरएसएस आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी केले आहेत. आरएसएस केवळ आतंकवादी संघटन नसून देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन आहे असा हल्लाबोल करतानाच दि. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी नागपूरमधील आरएसएस मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चाने महारॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे राज्याचे माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम.मुश्रीफ यांनी एम.एन.टीव्हीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


एस.एम.मुश्रीफ म्हणाले की, ५-६ वर्षांपूर्वी मी एक छोटेसे पुस्तक लिहिले. त्याचे शीर्षक होते ‘देशातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना आरएसएस.’ त्यानंतर दोन-तीन वर्षांनी मी इंग्रजीत दुसरे पुस्तक लिहिले. त्याचे शीर्षक ‘ब्राह्मणीज बॉम्बड् ऍन्ड मुस्लिमज हँग्ड’ असे आहे. म्हणजे ब्राह्मणवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले आणि मुस्लिमांना फाशी देण्यात आली. 


या पुस्तकांमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की २००२ ते २००३ दरम्यान देशभरात जे बॉम्बस्फोट झाले ते आरएसएस आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी केले होते. मात्र त्याचा आरोप मुस्लिमांवर करण्यात आला. काही बॉम्बस्फोटांची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यात हे बॉम्बस्फोट मुस्लिमांनी केले नसल्याचे दिसून आले. उलट हे बॉम्बस्फोट आरएसएस आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी केले होते. या संघटनांवर आजपर्यंत बॉम्बस्फोटाचे १८ गुन्हे दाखल आहेत. 


यातील बहुतांश स्फोटांमध्ये आरडीएक्सचा वापर करण्यात आला आहे. त्यापैकी तीन प्रकरणांमध्ये आरएसएस आणि त्यांच्या सहयोगी संघटनांच्या दहशतवाद्यांना सजाही झाली आहे. काही प्रकरणांमध्ये त्यांची सुटकाही झाली. एकतर तपास योग्य झला नाही किंवा त्यांना संशयाचा फायदा मिळाला. मात्र ही प्रकरणे अपिलातही गेली असून ती न्यायालयात प्रलंबित आहेत. मला खात्री आहे की त्यामध्येही त्यांना सजा होईल.


नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक यशवंत शिंदे यांनी नांदेड न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्या प्रतिज्ञापत्रात यशवंत शिंदे यांनी २००३ साली देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आरएसएसने रचला होता, असे सांगितले आहे. त्यामुळे देशभरात मोठे बॉम्बस्फोट झाले. हे यशवंत शिंदे २५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहेत. त्याच्या म्हणण्यावर आपण विश्‍वास ठेवला पाहिजे. 


मी पुस्तकात लिहिलेल्या सर्व बाबी, न्यायालयाचा निकाल आणि यशवंत शिंदे यांचे प्रतिज्ञापत्र एकत्र केले तर एक गोष्ट स्पष्ट होते की आरएसएस केवळ आतंकवादी संघटन नसून देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन आहे. त्यांच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चा दि. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी नागपुरातील आरएसएस मुख्यालयावर आंदोलन करणार आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
जुलैनंतर १ हजार शेतकर्‍यांनी संपवले जीवन!अतिवृष्टीची म
नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी भाजपशासित राज्यांक
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper