×

भारत मुक्ती मोर्चा-बहुजन क्रांती मोर्चाची नागपूरमध्ये उद्या विशाल महारॅली

Published On :    5 Oct 2022
साझा करें:

देश व संविधानाला वाचवण्यासाठी ‘आरएसएस’ मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च



नागपूर: भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाची उद्या ६ ऑक्टोबर, २०२२ रोजी गुरूवारी विशाल महारॅली आयोजित करण्यात आली आहे. बेजन बाग ग्राऊंड, कामठी रोड नागपूर येथे ही महारॅली होणार आहे. विशाल महारॅलीचे उद्घाटन अलाहाबाद हायकोर्टाचे माजी न्यायाधीश विरेंद्र यादव यांच्याहस्ते होणार आहे. तर मुख्य अतिथी म्हणून भन्ते हर्षबोधी, चौधरी विकास पटेल, हिजबुल रहमान उपस्थित राहणार आहेत. 


प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.विलास खरात, बी.बी.जाधव, बिशप डॉ.प्रदीप कांबळे, ज्ञान प्रकाश स्वामी, एच.एन.रेकवाल, प्रेमकुमार गेडाम, प्रदीप फलटणे, पुरूषोत्तम नागपुरे, घुगे शास्त्री महाराज, प्रताप पाटील, विशाल लोमटे-पाटील, विकास पाथरीकर उपस्थित राहणार आहेत. या महारॅलीचे अध्यक्षस्थान भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम भूषवणार आहेत. तर देश व संविधानाला वाचवण्यासाठी आरएसएस मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च काढण्यात येणार आहे.


भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चातर्फे आरएसएस मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च का काढण्यात येणार आहे, याचे पत्रक जाहीर करण्यात आले आहे. २७ जून २०२२ रोजी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हरियाणात रोहतक जिल्ह्यात डीएनए परिषद आयोजित करण्यात आली होती, मात्र या डीएनए परिषदेला ब्राम्हणांनी विरोध केला. 


२१ ऑगस्ट २०२२ रोजी कानपूरमध्ये बामसेफचे ३७ वे राज्य अधिवेशन होते. त्या अधिवेशनालाही आरएसएस-भाजपाच्या लोकांनी प्रशासनाच्या माध्यमातून विरोध केला. त्यासाठी ब्राम्हण अधिकार्‍यांना पुढे करण्यात आले. हा आरएसएसद्वारे संविधानद्रोह करण्यात आला. आरएसएस-भाजपा ईव्हीएमचा खुलेआमपणे वापर करत आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा करत त्यांची सत्ता आणत आहेत. त्यामुळे मतदारांचा मताचा अधिकारही संपुष्टात आला आहे.


१९३१ नंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात आलेली आहे. त्यामुळे ओबीसीला शासन-प्रशासनात हिस्सेदारी मिळत नाही. ओबीसींच्या बहुतांश जागांवर ब्राम्हणांनी कब्जा केला आहे. आरएसएस-भाजपा ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला विरोध करत आहे. लॉकडाऊनच्या कालखंडात कामगार कायदे समाप्त करण्यात आले. 


नव्या हिंदू राष्ट्राची संकल्पना ब्राम्हणांकडून मांडण्यात येत आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राम्हणांचे गुलाम राष्ट्र होय. संविधान बदलण्याचे षड्यंत्र आखण्यात आले आहे. एवढेच नाही तर हिंदू राष्ट्राच्या संविधानाचे प्रारूप तयार आहे. हे संविधान वर्णव्यवस्थेच्या आधारित आहे. अल्पसंख्य विदेशी ब्राम्हणांनी भारतावर कब्जा केला आहे. आरएसएसच्या माध्यमातून जबरदस्तीने आदिवासींना हिंदू बनवले जात आहे.


एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले तरी वैदिक मंत्रोच्चार करून शुद्धीकरण राष्ट्रपती घोषित करण्यात आले आहे. ओबीसीलाही जबरदस्तीने हिंदू बनवले जात आहे. हिंदूचा अर्थ दुष्ट, कपटी, चोर, डाकू, गुलाम आहे. हिंदू शब्द शिवी असताना आरएसएस ब्राम्हणांकडून तो जबरदस्तीने थोपवला जात आहे. आरएसएसच्या माध्यमातून बौद्ध वारसा स्थळांवर कब्जा केला जात आहे. देशातील तमाम मंदिरात बुद्धांच्या मूर्ती आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ महू, दीक्षाभूमी, बोधगया, अयोध्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव आंबडवे येथेही आरएसएसच्या ब्राम्हणांनी कब्जा केला आहे.


राजस्थानमध्ये जालौर जिल्ह्यात इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याची जातीय मानसिकतेतून हत्या करण्यात आली. त्याला ब्राम्हणांनी निर्माण केला जातीयवाद जबाबदार आहे. ब्राम्हणांनी बॉम्बस्फोट केले आणि मुस्लिमांना फासावर लटकावले अशाप्रकारे संशोधनपर पुस्तक लिहून एस.एम.मुश्रीफ यांनी आरएसएस आतंकवादी संघटन असल्याचे पुरावे समोर आणले आहेत. 


हा देश आमचा नाही, त्यामुळे या संविधानाच्याविरोधात व येथील लोकाच्याविरोधात लढायला हवे असे वक्तव्य गुप्त मिटींगमध्ये कर्नल प्रसाद पुरोहितने केले आहे. गुजरातमधील बिल्कीस बानोला न्यायच मिळाला नाही. उलट ज्यांनी बलात्कार केला त्या ब्राम्हणांना सोडण्यात आले.


भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. विलास खरात यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. यासह विविध मुद्यांना घेऊन हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. देश भाजपा चालवत आहे असे कुणाला वाटत असेल तर ते चूक आहे. देश आरएसएस चालवत आहे. 


आरएसएसचे सारे निर्णय मूलनिवासी बहुजनांच्याविरोधात आहेत. त्यामुळे विदेशी ब्राम्हणांची आतंकवादी संघटना असलेल्या आरएसएसच्या मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च काढणे गरजेचे आहे. कारण या संघटनेपासून भारताला व संविधानाला फार मोठा धोका आहे. देश व संविधान वाचवण्यासाठी हा प्रोटेस्ट मार्च काढण्यात येणार असल्याचे भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
जुलैनंतर १ हजार शेतकर्‍यांनी संपवले जीवन!अतिवृष्टीची म
नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी भाजपशासित राज्यांक
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper