×

तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी..!

Published On :    5 Oct 2022
साझा करें:

इतिहासाच्या सुवर्णकालखंडात दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमी या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अश्पृश्य बांधवांसह नागपूर येथील दिक्षाभूमीवर मानवतावादी बुद्ध धम्म स्विकारून जातीवरून माणसाची होत असलेली ओळख संपुष्टात आणली.



नागपूरच्या मातीत,
केली बुद्धत्वाची पेरणी !
धम्म देऊनी बा- भीमाने,
दीपवली सारी धरणी !!

इतिहासाच्या सुवर्णकालखंडात दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमी या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अश्पृश्य बांधवांसह नागपूर येथील दिक्षाभूमीवर मानवतावादी बुद्ध धम्म स्विकारून जातीवरून माणसाची होत असलेली ओळख संपुष्टात आणली. आणि तुच्छ म्हणून लेखल्या जात असलेल्या समस्त मानवजातीला माणूस म्हणून जगण्याची मुभा मिळवून दिली. 


खरं तर नरक यातनेतून मुक्त झालेल्या जीवांना ही नवसंजीवनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिली होती. त्याकाळी वर्णवादी व्यवस्थेविरूद्ध विश्‍वात गाजलेली एक रक्तविरहीत समाजक्रांतीच होती ती...!, या धर्मांतराची दखल जगाच्या पाठीवर प्रतिक्रांतीविरूद्धची क्रांतीच ठरली. मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हतं, पण मी हिंदू म्हणुन मरणार नाही. 


अशी १३ ऑक्टोबर १९३५ ला येवला, नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्मांतरांविषयीची घोषणा प्रत्यक्षात खरी केली ती १४ ऑक्टोबर १९५६ ला....!, सुमारे ५ लाख अस्पृश्य बांधवाच्या साक्षीने तत्कालीन बौद्ध भन्ते चंद्रमणी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनात हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्विकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवकल्याणाचा मार्ग सुकर केला.


जातीच्या जमिनीत बुद्धत्वाची पेरणी करून धम्माचा शिवार फुलविणारा तो अजरामर सोहळा होता. ज्यात मांग, महार, वडार, चांभार, लोहार, सुताराचं पीक नाहीतर माणुसकीचं पीक फुलणार होतं. या धर्मांतराने आत्महिन झालेल्या लोकांमध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटविण्यात आली. षंढ होऊन झोपलेल्या कुंभकर्णी अश्पृश्यांना तू माणूस आहे. याची जाणीव करून अन्याय -अत्याचाराविरूद्ध जागृत केले गेले. स्वत:चे अस्तित्व हरविले असतांना अस्मिता मिळवून दिली. असं हे दैदिप्य लाभलेलं ऐतिहासिक धर्मांतरण झालं होतं. आणि ते ही नागवंशीय नागपुरात..! 


प्राचीनकाळी नाग संस्कृतीचे केंद्र नागपूर होते. तसेच शुरता, धाडस, स्वाभिमानाची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी नागपूर नगरीला लाभलेली होती. म्हणून मुंबई, औरंगाबाद, सारनाथ आणि नागपूर या शहरांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या शहराची धर्मांतरासाठी निवड केली होती. नागपुरातील ज्या जागेवर  बाबासाहेबांनी धर्मांतरण करून माणुसकीची बीजे रोवली होती. तेव्हा देशातील  हिंदू धर्माच्या प्रस्थापितांचे धाबे दणाणले होते. आज त्याच जागेवर विश्‍वविख्यात दिक्षाभूमी नटलेली आहे.


 कुठल्याही आमिषाला बळी न पडता स्विकृत केलेले जगातील एकमेव असे हे ऐतिहासिक धर्मांतरण होते. काळोखात दडलेल्या समाजाला प्रकाशित करून लाखो अश्पृश्य बांधवांना डॉ. आंबेडकरांनी सन्मानाची, स्वाभिमानाची, अस्मितेची शिकवण देऊन माणूस म्हणून ओळख दिली. दरवर्षी दिक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात जागतिक बौद्ध विचारवंताना, जागतिक भिक्खू वर्गाला, बौद्ध अभ्यासकांना, इतिहासकारांना बोलावून बुद्धत्वाची, धम्माची अमृतवाणी गुंजत असते.


 डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यावर बर्‍याच धर्माचे धर्मगुरू त्यांच्याशी भेटले. अनेकांनी त्यांना आपल्या धर्माचे महत्त्व पटवून, काही अंशी प्रलोभन देऊन त्यांचा धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण दिले. ५ ऑगस्ट १९५६ ला धर्मांतराबाबत चर्चा करत असतांना दिल्लीतील अश्पृश्यवर्गीय कार्यकर्ते सोहनलाल शास्त्री यांनी बाबासाहेबांना अनेक प्रश्न विचारलेत. बौद्ध धम्मापेक्षा इस्लामी किंवा इसाई धर्म आपल्याला जास्त फायदेशीर होणार नाही का..? 


असा बाबासाहेबांना सोहनलालजी यांनी प्रश्न केल्यावर बाबासाहेब त्यावर प्रतिक्रिया देतात की, कदाचित फायदा नक्की होणार पण इस्लामी, ईसाई हे धर्म भारतात निर्माण झालेले धर्म नाहीत. हे धर्म स्वीकारले तर बाहेरील देशातून आपल्या लोकांच्या भौतिक प्रगतीसाठी भरपूर पैसा मिळेल. भारतीय राजकारणात देखील भरपूर बळ कमविता येणार. आणि या सर्व गोष्टी आपल्याला त्यांच्या स्वाधीन राहून कराव्या लागतील. दुसर्‍यांच्या ओंजळीने दुसर्‍यांचे पाणी पिऊन आपल्या सर्वांगीण प्रगतीची तहान भागविणे हा खरा पुरुषार्थ नाही. 


स्वतःचा ताकदीने, स्वाभिमानाने, स्वावलंबनाने आणि स्वदेशी नव्या बौद्ध धम्माच्या आश्रयाने आपण आपली प्रगती केली तर तो खरा पुरुषार्थ राहील. तसेच भारता बाहेरील धर्म स्वीकारून आपली भारतीय संस्कृती नष्ट होईल. आणि जातिवंत संस्कृती जपणे हेच बौद्ध धम्माचे रहस्य आहे. बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे आणि सारा भारत बौद्धमय करणे हेच माझे उद्दिष्ट आहे. आणि याच उद्दिष्टांसह बाबासाहेबांच्या एका हाकेवर लाखो अनुयायी घरातील देव, धर्म सोडुन ‘बुद्धम् सरणम् गच्छामी’ म्हणत बौद्ध झाले.  


१४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमीदिनी दिक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांनी लाखो शोषित पिडीत लोकांना बुद्ध धम्माची दिक्षा देऊन धम्मक्रांतीचे चक्र महान राजा सम्राट अशोक नंतर या देशात गतिमान केले. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी अथक परिश्रमातून फुलविलेला हा धम्माचा मळा सदैव सुजलाम सुफलाम राखणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम आद्य कर्तव्य असले पाहिजे. सागरासारखा दिलेला विशाल बुद्ध धम्म जपणे आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक अनुयायाने स्वीकारणे यासारखे दुसरे अभिवादन आजच्या दिनी या महामानवास असू शकणार नाही.
     
अखिल खैरे
 ७७६९८७४४००

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
जुलैनंतर १ हजार शेतकर्‍यांनी संपवले जीवन!अतिवृष्टीची म
नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी भाजपशासित राज्यांक
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper