×

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे?

Published On :    5 Oct 2022
साझा करें:

कुत्र्या मांजरांना जनावरांना पाणी पिण्याचा अधिकार होता.पण माणसांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला त्यांच्या क्रांतिकारी विचारांशी गद्दारी करणारी एक जमात सध्या डोके वर काढत आहे. तिला रोखण्याचे प्रयत्न आज न केल्यास ती समाजाला मोठी घातक ठरणार आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे? असा रोखठोक प्रश्‍न विचारावा लागत आहे.



गणेशोत्सव व नवरात्र उत्सव साजरा करणारा महार,मांग,चांभार मोठ्या संख्येने वाढत चालला आहे.काही लोक महारांचे बौद्ध झाले पण त्यांनी धम्म स्वीकारला नाही हे त्यांच्या आचरणातून दाखवून देत आहेत. पूर्वी ज्या धर्माने त्यांना पशुसारखी वागणूक दिली तो धर्म आणि त्यांच्या देवांनी यांना माणूस म्हणून कधीच दया दाखवली नाही. कुत्र्या मांजरांना जनावरांना पाणी पिण्याचा अधिकार होता.पण माणसांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला त्यांच्या क्रांतिकारी विचारांशी गद्दारी करणारी एक जमात सध्या डोके वर काढत आहे. तिला रोखण्याचे प्रयत्न आज न केल्यास ती समाजाला मोठी घातक ठरणार आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे? असा रोखठोक प्रश्‍न विचारावा लागत आहे.


सम्राट अशोक कालीन धम्म विजया दिन हाच दिवस विश्‍वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेण्यासाठी निवडला.त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात.त्या ऐतिहासिक दिनाला ६६ वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी दिलेले बुद्ध धम्म आजही समाजात पूर्ण रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.त्यामुळे आम्ही खूप पुढे गेलो असे म्हणता येत नाही. आणि खूप मागे राहीलो असे म्हणता येत नाही. 


बाबासाहेबाचा पुतळा,चबुतरा असलेल्या चौकात निळी दही हंडी आणि बुद्ध विहारासमोर गणपती,नवरात्र उत्सव आता उघडपणे मोठ्या उत्सवात साजरा होतो. मातृसंस्थाचे प्रशिक्षक बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, पदाधिकारी, उपासक, उपासिका हताशपणे त्यांच्याकडे पाहतात. त्यावर उपाय योजना करण्यास ते असमर्थ ठरताना दिसतात. त्यांच्यातील संघ भावना संपली म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक मनुवादी-ब्राम्हणवादी संघटना घराघरात विषमतेचे अज्ञान अंधश्रद्धा पेरण्यास यशस्वी होत आहे.


मनुवादी-ब्राम्हणवादी संघटनेचे स्थानिक राजकीय कार्यकर्ते सर्वधर्मसमभावच्या राजकीय मंत्राचा मनापासून आदर करण्याचा आव आणतात. आणि आमच्या कार्यकर्त्या नेत्यांच्या हातून वर्णव्यवस्थेचे समर्थन करणार्‍या ब्राम्हण धर्माचे उत्सव साजरे करून घेतांना दिसतात. गुणवंत सदावर्ते सारखा विधीतज्ञ वकील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगात आदर्श असल्याचे सांगतो.


मग रोजगार हमीवर काम करणारा शेतमजूर,घरकाम करणारी महिला त्यांच्या मालकाने सांगितलेले उत्सव साजरे करीत असतील तर दोष कोणाला द्यावा? आम्ही कुठे कमी पडतो ते शोधले पाहिजे. आम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही. कारण घरात संघ नाही म्हणून त्यांचा धम्म नाही. संघ नसल्यामुळे संपूर्ण समाज व आंबेडकरी चळवळ दिशाहीन झाली आहे. कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही.


 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी असंघटीत अशिक्षित शोषित अस्पृश्य समाजाच्या यातना आणि वेदना स्वत: भोगल्या. आपण उच्च विद्याविभूषित झाल्यानंतरही चातुवर्ण मानणार्‍या चौकटीच्या समाज व्यवस्थेत आपल्याला माणूस म्हणून माणुसकीची व समानतेची वागणूक मिळत नाही.तर माझ्या गोरगरीब असंघटीत असुशिक्षित शोषित अस्पृश्य समाजाची काय अवस्था असेल.या चिंतेने ते सतत तळमळत.


यामुळेच त्यांच्यातील विचारवंताने या समाजाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचे व्रत हातात घेऊन क्रांतीची मशाल पेटविण्यासाठी जीवनभर संघर्ष केला आणि समाजाचे प्रबोधन करून समाज संघटीत केला. इंग्लंड,अमेरिका,रशिया सारख्या परदेशातून उच्च विद्याविभूषित होऊन कायदे पंडित झालेला हा विद्वान समाजाच्या न्याय,हक्क व प्रतिष्ठेसाठी रस्त्यावर उतरून सतत संघर्ष करीत राहिला. आणि त्याच्या संघर्षाला कायद्याचा सनदशीर मार्गाचा आधार होता.त्यांनी वैचारिक अधिष्ठान असलेला युक्तिवाद,संघटना व राजकीय दबाव याचा समाजाकरिता एक हत्यार म्हणून वापर केला. पण त्यांनी कधी ही बेकायदेशीर कारवाया अथवा हिंसाचाराचा कधीच अंगीकार केला नाही. कारण बळाचा वापर न करता त्यांनी बुद्धिचातुर्य वापरून सामाजिक क्रांतीचे ध्येय गाठले. 


आजचे नेते एका आमदार,खासदारकीसाठी समाजाला वैचारिक शत्रूशी युती आघाडी करतात.तीच परिस्थिती धम्मभूमी,दीक्षाभूमी चैत्यभूमीच्या वापराची (व्यापाराची) झाली आहे. ती मुक्त करण्यासाठी संघ भावना नाही. तर द्वेष भावनेने ती आणखी माणसा-माणसांत विभागली जात आहे. दरवर्षी येथे एकत्र येणारी लाखोंची गर्दी ही विचारधारा मानणार्‍या माणसांची नाही,तर स्वार्थी मतलबी भक्तांची आहे हे दरवर्षी सिद्ध होत आहे. त्याकाळी ब्राम्हणी धर्माच्या चातुवर्ण व्यवस्थेमुळे अस्पृश्य शोषित समाज मानसिकदृष्ट्या पंगू बनत चालला आहे.


उच्चवर्णीयानी देव,धर्म व धर्मशास्त्राच्या जोखडात त्याला भोळा भक्त (अंधश्रद) बनवून माणुसकी शून्य पशुपेक्षा ही हीन-दीन असे गुलामीच जीवन जगणे भाग पाडले जात होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या जिवापाड प्रयत्न केला.  त्यासाठी मनुस्मृती जाळली, महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष ज्ञात आहेच.नाशिक काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे देवाला त्याच्या भक्ताला सुबुद्धी देण्याचे जाहीर आव्हान होते. 


चातुवर्ण समाज व्यवस्थेवर घणाघाती घाव घातले,पण जेव्हा काहीच हाती लागत नाही हे लक्षात आले तेव्हा बाबासाहेबांनी १९३५ ला येवले येथे धर्मातराची घोषण केली आणि प्रतिज्ञा घेतली. अस्पृश शोषित समाजाला स्वाभिमान व माणुसकी मिळवून देऊन त्याच्यात क्रांतिकारी बदल घडवून नवसमाज निर्माण करून दाखविणार. आणि आज खरेच अस्पृश्य शोषित समाजात जास्तीच बदल झाला. 


त्याकाळी त्याला सर्वधर्मसमभावचा अर्थ समजत नव्हता त्यावेळी त्याची बुद्धी शेण खात होती.आज सर्व आंबेडकरी समाज वस्त्यातील बालेकिल्ल्यात शेणखत काढून पोट भरणार्‍याची पोरं खेड्यातून शहरात आले आणि स्वभिमानी झाले.विविध पक्षाचे घाणीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.त्याचे ऐतिहासिक काम हेच ही बाबासाहेबाच्या सर्व संस्था,संघटना, पक्षात फुट पडून वाटोळे करणे.त्यामुळेच जाहीरपणे विचारावे लागते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे?


माणसाच्या जीवनात धर्माची गरज आहे. माणसाचे मन सुसंस्कृत होण्याकरिता त्याला धर्माची आवश्यकता असते. यावर बाबासाहेबाची श्रद्धा होती.ते स्वत: अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.म्हणून त्यांना धर्माची आवश्यकता वाटत होती. त्यामुळेच त्यांनी सर्व धर्माचा मन लावून अभ्यास केला.नुसते वाचले नाही.(जसे आज आम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म वाचतो तसे.) 


त्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला म्हणजे हिंदुच्या विजया दशमीला नव्हे तर सम्राट अशोक कालीन धम्म विजयादिनाचे महत्व लक्षात घेऊन त्या दिवशी धर्मातर करून देशात नव्हे तर जगात रक्ताचा एक थेंब न सांडता सामाजिक धार्मिक क्रांती केली. आणि १९३५ ला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली. धर्म आणि धम्म यातील ठळक फरक या देशातील चातुवर्ण समाज व्यवस्था मानणार्‍या ढोगी लोकांना दाखवून दिला.


धर्म म्हणजे निव्वळ वर्तुणुकीचे व सामाजिक आचरणाचे नियम नव्हे तर नितीमता हे धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे. धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नये. ईश्‍वराने काही लोकांना केवळ दारिद्र्यात व सर्व प्रकारच्या सुखसोयीपासून वंचित राहण्यासाठी जन्माला घातले या उलट इतरांना केवळ गर्भश्रीमंतीत लोळून आणि विशेषाधिकार वापरून गरिबांवर अधिराज्य गाजविण्यासाठी जन्मा घातले आणि घडविले अशी शिकवण कोणत्याही धर्माने देऊ नये. तर इतरांशी ते आपले बंधू आणि भगिनी आहेत असे समजून वागण्यासाठी श्रद्धा भिन्नभिन्न असल्या तरी प्रत्येकाने एकमेकाशी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून वागावे. 


यासाठी धर्माने आपल्या अनुयायांना उत्तेजन दिले पाहिजे जे धर्म माणसाला माणसा सारखे वागविण्याची शिकवण देत नाही तो कसला धर्मं? या सर्व कसोट्यांवर परिपूर्ण उतरेलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे बुद्ध धर्म (धम्म) आहे. याची पूर्ण खात्री बाबासाहेबांना झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला, आता त्याचे नांव घेणारे अनुयायी त्या त्यागाला परिश्रमाला राजकीय फायद्या करिता सर्वधर्मसमभावची फोडणी देण्याचा केविलवाणा प्रत्यन करीत आहेत.


 बुद्धाचा धम्म मानवतावादी, विज्ञानवादी असून तो याच जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर व आचरणावर भर देणारा आहे. मैत्री,करुणा व शांततेवर जोर देतो. जीवना विषयीचे स्पष्ट आणि रास्त स्पष्टीकरण देऊन सुरवात आणि शेवटही मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करतो.


शिल,सदाचाराची शिकवण देतो.या धर्मात धम्मात ईश्‍वराला,काल्पनिकतेला, कर्मकांड व थोतांडाला अजिबात थारा नसून तो वास्तववादी व परिवर्तनशील आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचे महत्व चळवळ आणि समाज यात कमी दिसते सर्वच राजकीयदृष्ट्या  सर्वधर्मसमभावचा मागे जाताना दिसतात. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे? याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
देशसेवा करू इच्छिणारा कधीच अग्निवीर बनणार नाही
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ७० ट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper