×

उत्तराखंडमध्ये व्याघ्र प्रकल्पासाठी ६ हजारांहून अधिक झाडे बेकायदेशीरपणे तोडली

Published On :    4 Oct 2022
साझा करें:

फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा अहवाल



डेहराडून: उत्तराखंडमध्ये कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पातील टायगर सफारीसाठी ६ हजारांहून अधिक झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत असे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.


कॉर्बेट व्याघ्र प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पासाठी उत्तराखंड सरकारने १६३ झाडे तोडण्याची परवानगी दिली होती, परंतु फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार कापलेल्या झाडांची संख्या ६ हजारांपेक्षा जास्त आहे. राज्याच्या वनविभागाने एफएसआयचा दावा फेटाळून लावला आहे. 


उत्तराखंड वन विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पाखरो ब्लॉक, कालू शहीद ब्लॉक, नलखट्टा ब्लॉक आणि कलागढ ब्लॉकमध्ये सुमारे नऊ महिन्यांत अहवाल तयार केल्यानंतर, एफएसआयला असे आढळून आले की सीटीआरमध्ये साफ केलेले क्षेत्र १६.२१ हेक्टर आहे. साफ केलेल्या जागेत झाडांची अंदाजे संख्या ६ हजार ९३ आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन दलाचे प्रमुख विनोद सिंघल यांनी कबूल केले की एफएसआयला ६ हजार ४२१ झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आल्याचे आढळले.


दिल्लीतील पर्यावरण कार्यकर्ते आणि वकील गौरव बन्सल यांनी हजारो झाडांच्या बेकायदेशीर तोडणीचा मुद्दा उपस्थित केला होता. बन्सल यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (एनटीसीए) तक्रार केली, ज्यात त्यांनी संरक्षित क्षेत्रात १० हजार झाडे तोडल्याचा आरोप केला. 


एनटीसीए आणि केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण (सीझेडए) ने उत्तराखंड वन विभागाकडून तोडलेल्या झाडांची वास्तविक स्थिती मागितली तेव्हा त्यांनी एफसीआयला सर्वेक्षण करण्यास सांगितले. ५०० चौ.कि.मी.मध्ये पसरलेले, सीटीआर २३० वाघांचे निवासस्थान आहे आणि जगातील सर्वाधिक वाघांची घनता आहे, प्रति १०० चौरस किमीवर १४ वाघ आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
देशसेवा करू इच्छिणारा कधीच अग्निवीर बनणार नाही
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ७० ट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper