×

पितृसत्ताक व्यवस्थेमुळे देशात महिलांना दुय्यम स्थान

Published On :    3 Oct 2022
साझा करें:

ऑक्सफॅम इंडिया डिस्क्रिमिनेशन रिपोर्ट २०२२ चा अहवालात समोर आल्या बाबी



नवी दिल्ली: देशात आजही स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी वेतन किंवा कमी पगार असतो असे ऑक्सफॅम इंडिया डिस्क्रिमिनेशन रिपोर्ट २०२२ च्या अहवालात दिसून आले आहे. यामागची कारणे केवळ आर्थिक नसून त्याचे मूळ समाजाच्या पितृसत्ताक व्यवस्थेत दडलेले आहे. पितृसत्ताक व्यवस्थेमुळे देशात महिलांना दुय्यम स्थान असल्याचे दिसून येते.


काही दिवसांपूर्वी ऑक्सफॅमचा असमानतेवरील अहवाल बाहेर आला आहे जो श्रमिक बाजारपेठेतील महिलांच्या असमानतेबद्दल बोलत आहे. या अहवालानुसार, भारतातील श्रमशक्ती सहभाग आणि वेतन व मजुरी यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना असमानतेचा सामना करावा लागतो. 


या विषमतेची मुळे आपल्या पुरुषप्रधान समाजात आहेत. भारतातील श्रमशक्तीमध्ये महिलांचा वाटा इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि गेल्या दहा वर्षांत त्यात आणखी घट झाली आहे. नोकरदार आणि कामाच्या शोधात असलेल्या महिलांचा समावेश करून श्रमशक्तीचा वाटा मोजला जातो.


२०११-१२ आणि २०१८-१९ दरम्यान २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांचा हिस्सा ग्रामीण भागात ३६ टकक्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत घसरला, तर शहरी भागात तो सुमारे २० टक्के राहिला. मार्च २०२० मध्ये कोविड आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे महिलांच्या रोजगाराला मोठा धक्का बसला. 


कोविड दरम्यान, केवळ १९ टक्के नोकरदार महिला आपला रोजगार चालू ठेवू शकल्या, तर ६१ टक्के नोकरदार पुरुष कोणत्या ना कोणत्या कामात गुंतले होते. ४७ टक्के  महिलांनी त्यांचा रोजगार कायमचा गमावला होता जो त्यांना डिसेंबर २०२० पर्यंत परत मिळाला नाही. केवळ ७ टक्के पुरुष होते ज्यांनी कायमस्वरूपी आपली नोकरी गमावली आणि ते पुन्हा कामावर गेले नाहीत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
जुलैनंतर १ हजार शेतकर्‍यांनी संपवले जीवन!अतिवृष्टीची म
नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी भाजपशासित राज्यांक
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper