×

कावेबाजीपणा करून मी पुन्हा आलोच...!

Published On :    3 Oct 2022
साझा करें:

आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परिस्थिती त्या माश्यासारखी झाली आहे. मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन असे म्हणत कावेबाजी करून ते आले.



वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन म्हणणारे राजकारणातील तरुण तडफदार, कावेबाज अण्णाजी पंत म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास आपण पाहत असाल,वाचत असाल.तो महाराष्ट्राला कुठे नेणारा आहे. 


निसर्गाचा नियम जल बिन मछली म्हणजे पाण्याच्या बाहेर जिवंत मासळी काढली तर ती कशी करते कधी पाहिले काय? ती पाण्यात जाण्यासाठी ज्या जिद्दीने तडफड करते ते पाहिल्यावर कोणत्याही माणसांचे मन हेलावून निघते. असाच प्रकार सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू आहे. आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परिस्थिती त्या माश्यासारखी झाली आहे. मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन असे म्हणत कावेबाजी करून ते आले.


महाराष्ट्रात अहोरात्र खोटे बोलून शेतकरी,मराठा,धनगर,ओबीसी,मागासवर्गीय आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करून ईव्हीएममुळे निवडणूक जिंकली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पद आपले हक्काचे आहे शंभर टक्के गृहीत धरून चालले असतांना शिवसेनेच्या वाघांची डळकाळी फोडून शिकार्‍याने शिकार सहजतेने करून नेली. 


त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची हालत एका वाटसरू सारखी झाली. विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा. पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी.तिने वेग घेण्यापूर्वी,एखाद्या फांदीचा वेध घ्यावा. वर येण्याचा प्रयत्न करावा. 


वरती भूकेला वाघ असावा. त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा. फांदी वरील मधमाशांनी भडका करावा. आणि अशा अवस्थेत मधाच्या पोळीतून पडणारा, मधाचा एक थेंब तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.तर हात सुटून विहीरीत पडण्याची भिती यालाच तोंडाशी आलेला घास गेला असे म्हणतात. म्हणूनच आपण प्रतिज्ञा केली होती. मी काही करीन आणि मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आता आला तर महाराष्ट्राचा विकास करण्याचे स्वप्ना पहा. गुजरातचे नाही.


देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असतांना केवळ महाराष्ट्रात नाही? सर्व राज्यासह देशभरात सुरू असतांना देवेंद्र फडणवीस यांना रात्रंदिवस झोप लागत नव्हती.जागोजागी त्यांना महाराष्ट्र आणि राज्याचा मुख्यमंत्री दिसतो. त्यांना सारखा शेतकरी आत्महत्या करतो,वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील मंत्रालयात येऊन आत्महत्या करतो.जेंव्हा ऐशी वर्षाच्या शेतकर्‍याने आपल्या कार्यकाळात मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व आपण कित्येएक दिवस त्याच्या कुटुंबियांना आपण नजरकैदेत ठेवले होते. हा इतिहास शेतकरी विसरला नाही. विसरला असेल तर तो शेतकरी नसावा.


एक मराठा लाख मराठा मराठ्यांचे लाखोंचे क्रांती मूक मोर्चे शिस्तप्रीय पद्धतीने निघाले होते व बावीस बांधवांनी बलीदान दिले तरी आपन मुग गिळून गप्प बसलात होता. म्हणे अभ्यास सुरु आहे. जेव्हा न्याय्य मागण्यासाठी आमचा आदिवासी कष्टकरी बांधव नाशिक ते मुंबई पायी प्रवास करत आसताना उन्हामुळे पिघळणार्‍या डांबरी रस्त्यावर चालल्यामुळे त्याचे पाय सोलून निघत असतांना ही तो आझाद मैदानात आला होता. त्याच्या सातबाराचे काय केले. हा इतिहास वनविभागाची जमीन कसणारा आदिवासी विसरला नाही. विसरला असेल तर तो भूमिहीन आदिवासी नसावा.


 फडणवीस महाराष्ट्र कोरोना महामारीमुळे आर्थिक आडचणींचा सामना करत असताना, तुम्ही मोदीच्या पीएम केअरला मदत करा असे आवाहन करत होता. हे सांगताना महाराष्ट्र राज्याशी थोडी तरी सामाजिक बांधिलकी ठेऊन बोलले पाहिजे होते. आपण फार अभ्यासू राजकारणी व्यक्तीमत्व आहात असे तुमचे लोक म्हणतात. संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करीत होता.


तेव्हा जगाच्या पाठीवर कोरोनाचे राजकारण  करणारे आपण एकटेच होता. आपणही पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलात आपण राज्यात कीती हॉस्पिटल व पायाभुत सुविधा उभ्या केल्या होत्या व महाआघाडी सरकारने त्या बंद केल्या त्यामुळे महाराष्ट्र संकटात सापडला. हे सांगितले पाहिजे ना?


अच्छे दिन दाखविण्यासाठी तुम्हाला वृतपात्रांना संपूर्ण पाच वर्षात दरदिवशी ऐशी हजार रुपये जाहीरातींवर खर्च करावे लागले. हे आम्ही सांगत नाही माहिती अधिकारात उघड झाले आहे.देवेंद्र फडणवीस संपुर्ण देशामध्येच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत होता. मग ते अपयश मोदींचे नव्हते का? 


जीएसटीचे २१ हजार कोटी केंद्राकडे अडकून पडले होते.मी काही करीन ते राज्यात घेऊन येण्यास मदत असे कधीच म्हटले नाही. मदत करण्या ऐवजी महाराष्ट्राला संकटात टाकण्याचे महापाप आपण त्यावेळी केले होते. असे आम्हाला वाटते. तुम्हाला वाटत नाही काय?


सांगली महापुराच्या वेळी आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना काय मार्गदर्शन करीत होता, त्याच्या बातम्या आणि व्हीडीओ क्लिप पाहता काय? राजकारणात यशस्वी होण्यासाठी सहकार्याचा आणि मतदारांचा विश्‍वासघात करण्याचा अनुभव प्रचंड असतांना आपणास विरोधीपक्ष नेते बनावे लागले. आणि कोणताही राजकारणात विश्‍वासघात करण्याचा अनुभव नसणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात अतीशय चांगले काम करत होते. ते आपणास शांतपणे पाहण्याची इच्छा नव्हती.


म्हणूनच मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन असे जाहीरपणे सांगत होता.ते आपण पूर्ण करून दाखवले कावेबाजीपणा करू. आता आला आहात तर मतदारसंघात फिरतांना मतदारांनी महाराष्ट्र संकटात असतांना आपण काय करीत होता? असे विचारले पाहिजे, यासाठी महाराष्ट्रातील जनतेला मतदारांना वाचविण्यासाठी संविधानाच्या चौकटीत काम करा.

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
देशसेवा करू इच्छिणारा कधीच अग्निवीर बनणार नाही
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ७० ट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper