×

तामिळनाडू-महाराष्ट्रासह १३ राज्यांनी ५ हजार कोटींची थकबाकी न भरल्याने वीजेचे संकट गडद

Published On :    19 Aug 2022
साझा करें:

पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमीटेडकडून वीज व्यवसाय थांबवण्याचा आदेश



नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमीटेडने आयईएक्स, पीएक्सआयएल, आणि एचपीएक्स या तीन पॉवर मार्केटला १३ राज्यांमधील २७ वीज वितरण कंपन्यांचा वीज व्यवसाय थांबवण्यास सांगितले आहे. वीजनिर्मिती करणार्‍या कंपन्यांकडे या वितरण कंपन्यांची मोठी थकबाकी आहे. प्रत्यक्षात, तामिळनाडू-महाराष्ट्रासह १३ राज्यांकडे ५ हजार कोटींहून अधिकची थकबाकी आहे, जी अद्यापपर्यंत भरलेली नाही. त्यामुळे वीजेचे संकट गडद झाले आहे.


पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमीटेडने इंडियन एनर्जी एक्सचेंज, पॉवर एक्स्चेंज ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज यांना १३ राज्यांच्या वितरण कंपन्यांच्या व्यापारावर निर्बंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड यांचा समावेश आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमीटेड देशातील ऊर्जा प्रणालीच्या एकात्मिक ऑपरेशनचे व्यवस्थापन करते.


दुसरीकडे, पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमीटेडने तीन पॉवर मार्केटला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की १३ राज्यांमधील २७ वितरण कंपन्यांसाठी वीज बाजारातील सर्व उत्पादनांची खरेदी आणि विक्री १९ ऑगस्ट २०२२ पासून पुढील सूचना येईपर्यंत पूर्णपणे प्रतिबंधित असेल. पत्रात पुढे असे म्हटले आहे की पावती (पेमेंट कन्फर्मेशन आणि उत्पादकांच्या इनव्हॉइसिंगमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी वीज खरेदी विश्‍लेषण) पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, या वितरण कंपन्यांची थकबाकी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


पेमेंट सिक्युरिटी सिस्टीम अंतर्गत, सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपन्यांना वीज बाजारपेठेत उत्पादन करणार्‍या कंपन्यांना थकबाकी न भरल्याबद्दल बंदी घातली जाऊ शकते. या अंतर्गत, जर पुरेशी पेमेंट सुरक्षा व्यवस्था ठेवली गेली असेल किंवा त्याच्या अनुपस्थितीत आगाऊ पैसे दिले गेले तरच वीज पुरवठा केला जाईल. या निर्णयामुळे या १३ राज्यांमध्ये विजेचे संकट अधिक गडद होऊ शकते, त्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
विदेशी ब्राम्हण मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस यांची झुंडश
आतंकवादी संघटन आरएसएसविरोधात राष्ट्रव्यापी चरणबद्ध आं
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे?
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी..!
भारत मुक्ती मोर्चा-बहुजन क्रांती मोर्चाची नागपूरमध्ये
‘आरएसएस’ देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन
बिहारमध्येही ओबीसी आरक्षणास ब्रेक
दसर्‍याला रावण दहन केल्यास ऍट्रोसिटी दाखल करा
राजकीय पक्षांकडून मोफत देण्याच्या घोषणा अर्थव्यवस्थेस
चाकू, कोयता तयार ठेवा.. हत्यार उचला, नरेंद्र मोदींकडून हिं
भारताचा विकास दर घसरणार; येऊ शकतो ५.७ टक्क्यांपर्यंत
१ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नो
उत्तराखंडमध्ये व्याघ्र प्रकल्पासाठी ६ हजारांहून अधिक झ
छत्तीसगडमध्ये ३२ टक्के आरक्षणासाठी हजारो आदिवासींचे धर
एनआयएकडून यूएपीएची ८० टक्के प्रकरणे केंद्रातील आरएसएस
मोदींची रॅली कव्हर करण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र आणण
असमानता, गरीबी, उपासमारी, बेरोजगारीवर आरएसएसचे वक्तव्य:
६ ऑक्टोबरचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार कुंठल्याही परि
गरिबी, बेरोजगारी, वाढती विषमता चिंताजनक
असंविधानिक कॉलेजियमच्या माध्यमातून ३.५ टक्के ब्राम्हणा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper