×

बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण, त्यांच्यावर चांगले संस्कार

Published On :    19 Aug 2022
साझा करें:

भाजपा आमदार सीके राऊलजी यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा



गुजरात:बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका केल्यानंतर गुजरात सरकारच्या या निर्णयावर अनेकांकडून टीका होत आहे. मात्र, गोध्रा येथील भाजपाचे विद्यमान भाजपा आमदार सीके राऊलजी यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. १५ वर्षांच्या शिक्षेनंतर मुक्त करण्यात आलेले ११ जण ब्राम्हण असून ब्राह्मणांचे संस्कार चांगले असतात, असे त्यांनी वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशा जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त होेताना दिसत आहेत.


गुजरात सरकारच्या ज्या पॅनेलने या ११ दोषींच्या सुटकेचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी एक सीके राऊलजी आहेत. यासंदर्भात बोलताना एका मुलाखतीत ते म्हणाले, या प्रकरणातील ११ दोषी हे ब्राह्मण होते आणि ब्राह्मणांना चांगले संस्कार असतात. कदाचित त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आले असावे, तसेच तुरुंगात असताना त्यांचे वर्तन चांगले होते, अशी पोपटपंची त्यांनी केली आहे.


दरम्यान, या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे सोशल मीडिया संयोजक वाय सतीश रेड्डी यांनी व्हिडिओ ट्विट करत गुजरात सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा आता बलात्काराच्या प्रकरणातील दोषींना चांगल्या संस्काराचे व्यक्ती म्हणत असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली होती. 


बलात्काराच्या प्रकरणातील दोषींना सोडणं ही भाजपची मानसिकता दर्शवते, असे म्हणाले होते. उन्नाव  भाजप आमदाराला वाचवण्याचे काम केले. कठुआ  बलात्कार्‍यांच्या बाजूने रॅली काढली. हाथरस  सरकार बलात्कार्‍यांच्या बाजूने उभे राहिले. गुजरात  बलात्कार्‍यांची सुटका आणि सत्कार केला. गुन्हेगारांना पाठिंबा देणे हे भाजपची महिलांबाबतची मानसिकता दर्शवते. प्रधानमंत्रीजी, तुम्हाला अशा राजकारणाची लाज वाटत नाही का? असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.


गुजरातमधील लिमखेडा तालुक्यात ३ मार्च २००२ रोजी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यावेळी त्या ५ महिन्यांच्या गर्भवती होत्या. यावेळी बिल्किस बानो यांच्यावरील बलात्कारासोबतच त्यांची ३ वर्षीय मुलगी आणि इतर १४ जणांची हत्या करण्यात आली होती. 


पुढे न्यायासाठी बिल्किस बानो यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणीची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. जीवे मारण्याची धमकी येत असल्यामुळे न्यायालयीन सुनावणीसाठी हे प्रकरण गुजरातमधून महाराष्ट्रात स्थानांतरित करावे, अशी मागणी बिल्किस बानो यांनी केली होती. बानो यांची ही मागणी पुढे मान्य करण्यात आली होती.


याआधी २१ जानेवारी २००८ रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील १३ जणांना दोषी ठरवले होते. त्यातील ११ जणांना सामूहिक बलात्कार तसेच हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ साली ही शिक्षा कायम ठेवली. तसेच २०९ साली सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश दीपक गुप्ता, न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या त्रिसदस्याय खंडपीठाने बिल्किस बानो यांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश गुजरात सरकारला दिले होते.


दरम्यान, या प्रकरणातील ११ दोषींची सुटका करण्यात आली. गोध्रा येथील कारागृहात ते शिक्षा भोगत होते. शिक्षा माफ व्हावी असा अर्ज या दोषींनी केला होता. गुन्हेगारांचे वय, गुन्ह्याचे स्वरुप, तुरुंगातील त्यांची वागणूक या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांची सुटका करण्यात आल्याचे गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राज कुमार यांनी सांगितले होते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे?
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी..!
भारत मुक्ती मोर्चा-बहुजन क्रांती मोर्चाची नागपूरमध्ये
‘आरएसएस’ देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन
बिहारमध्येही ओबीसी आरक्षणास ब्रेक
दसर्‍याला रावण दहन केल्यास ऍट्रोसिटी दाखल करा
राजकीय पक्षांकडून मोफत देण्याच्या घोषणा अर्थव्यवस्थेस
चाकू, कोयता तयार ठेवा.. हत्यार उचला, नरेंद्र मोदींकडून हिं
भारताचा विकास दर घसरणार; येऊ शकतो ५.७ टक्क्यांपर्यंत
१ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नो
उत्तराखंडमध्ये व्याघ्र प्रकल्पासाठी ६ हजारांहून अधिक झ
छत्तीसगडमध्ये ३२ टक्के आरक्षणासाठी हजारो आदिवासींचे धर
एनआयएकडून यूएपीएची ८० टक्के प्रकरणे केंद्रातील आरएसएस
मोदींची रॅली कव्हर करण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र आणण
असमानता, गरीबी, उपासमारी, बेरोजगारीवर आरएसएसचे वक्तव्य:
६ ऑक्टोबरचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार कुंठल्याही परि
गरिबी, बेरोजगारी, वाढती विषमता चिंताजनक
असंविधानिक कॉलेजियमच्या माध्यमातून ३.५ टक्के ब्राम्हणा
कावेबाजीपणा करून मी पुन्हा आलोच...!
पितृसत्ताक व्यवस्थेमुळे देशात महिलांना दुय्यम स्थान
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper