×

डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२० मधील ३६ तासांच्या भारत दौर्‍यावर ३८ लाखांची उधळपट्टी

Published On :    18 Aug 2022
साझा करें:

परराष्ट्र मंत्रालयाची केंद्रीय माहिती आयोगाला माहिती



नवी दिल्ली: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०२० मध्ये भारत दौर्‍यावर आले होते. या त्यांच्या ३६ तासांच्या दौर्‍यावर ३८ लाखांची उधळपट्टी करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे. डोनाल्ड यांच्यासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या स्वागतासाठी भारत सरकारने गुजरातमध्ये भव्य-दिव्य तयारी केली होती.


एका आरटीआयद्वारे परराष्ट्र मंत्रालयाकडून ट्रम्प यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमाबाबत माहिती मागवण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पहिल्या भारत दौर्‍यावर ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड कुशनर आणि अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत २४,२५ फेब्रुवारीला अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट दिली होती.


ट्रम्प यांनी २४ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये तीन तास घालवले होते. यादरम्यान त्यांनी २२ किमी लांबीच्या रोड शोमध्ये भाग घेतला. यानंतर, साबरमती आश्रमात गांधींना आदरांजली वाहिली आणि नव्याने बांधलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत नमस्ते ट्रम्प सभेला संबोधित केले. यानंतर ट्रम्प त्याच दिवशी ताजमहाल पाहायला गेले. २५ फेब्रुवारी रोजी त्यांनी नवी दिल्लीला भेट दिली, तिथे त्यांची मोदींशी द्विपक्षीय चर्चा झाली.


 मिळालेल्या माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्त्याने २४ ऑक्टोबर २०२० रोजी आरटीआय दाखल केला होता, परंतु त्याला सरकारकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर अर्जदाराने पहिले अपील दाखल केले आणि नंतर आरटीआय प्रकरणांमध्ये सर्वोच्च अपीलीय प्राधिकरण असलेल्या आयोगाशी संपर्क साधला. कोविडच्या प्रादुर्भावामुळे आरटीआयला उत्तर देण्यास विलंब झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने कांगावा केला होता. यानंतर, या वर्षी ४ ऑगस्ट रोजी परराष्ट्र मंत्रालयाने आयोगाला आरटीआयची माहिती दिली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
विदेशी ब्राम्हण मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस यांची झुंडश
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे?
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी..!
भारत मुक्ती मोर्चा-बहुजन क्रांती मोर्चाची नागपूरमध्ये
‘आरएसएस’ देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन
बिहारमध्येही ओबीसी आरक्षणास ब्रेक
दसर्‍याला रावण दहन केल्यास ऍट्रोसिटी दाखल करा
राजकीय पक्षांकडून मोफत देण्याच्या घोषणा अर्थव्यवस्थेस
चाकू, कोयता तयार ठेवा.. हत्यार उचला, नरेंद्र मोदींकडून हिं
भारताचा विकास दर घसरणार; येऊ शकतो ५.७ टक्क्यांपर्यंत
१ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नो
उत्तराखंडमध्ये व्याघ्र प्रकल्पासाठी ६ हजारांहून अधिक झ
छत्तीसगडमध्ये ३२ टक्के आरक्षणासाठी हजारो आदिवासींचे धर
एनआयएकडून यूएपीएची ८० टक्के प्रकरणे केंद्रातील आरएसएस
मोदींची रॅली कव्हर करण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र आणण
असमानता, गरीबी, उपासमारी, बेरोजगारीवर आरएसएसचे वक्तव्य:
६ ऑक्टोबरचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार कुंठल्याही परि
गरिबी, बेरोजगारी, वाढती विषमता चिंताजनक
असंविधानिक कॉलेजियमच्या माध्यमातून ३.५ टक्के ब्राम्हणा
कावेबाजीपणा करून मी पुन्हा आलोच...!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper