×

महाराष्ट्रावर मोजक्याच घराण्यांचे राज्य

Published On :    7 Aug 2022
साझा करें:

विधानसभेला ८१ टक्के उमेदवार घराणेशाहीतील



मुंबई: लोकशाहीच्या नावाखाली आता आधुनिक संस्थानेच निर्माण होत आहेत. लोकशाहीने प्रत्येकाला समान संधीचा अधिकार दिला असताना घराणेशाहीमुळे नेतृत्वाची संधीच हिरावून घेतली जात आहे. याचा मोठा फटका राजकारणाच्या माध्यमातून समाजासाठी काही करु इच्छिणार्‍या सामान्य कार्यकर्त्यांसह बहुजनांनाही बसत आहे. त्यांच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक विकासात घराणेशाही मोठा अडथळा ठरत आहे.


महाराष्ट्रावर फक्त ४८ घराणी राज्य करतात, असे पूर्वी म्हटले जात होते. त्यातही मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात घराणेशाहीचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील २० मतदारसंघात घराणेशाही पार्श्‍वभूमी असलेले तब्बल १९ उमेदवार होते. म्हणजे जवळपास सर्वच मतदारसंघात घराणेशाहीचा दबदबा होता. याशिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांतील ११६ मतदारसंघात घराणेशाही पार्श्‍वभूमी असलेले ९४ उमेदवार होते. म्हणजेच एकूण उमेदवारांपैकी तब्बल ८१.०३ टक्के उमेदवार हे घराणेशाहीतून समोर आले होते.


विशेष म्हणजे या उमेदवारांच्या कुटुंबामध्ये पूर्वी कुणी आमदार किंवा खासदार होते की नाही, एवढाच निकष घराणेशाहीसाठी वापरला आहे. तरीदेखील लोकसभा व विधानसभेतील उमेदवारांमध्ये घराणेशाहीचे प्रमाण प्रचंड आढळले आहे. निवडणुकीत उभे राहणार्‍या उमेदवारांची सहकारी, खासगी कारखाने तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीतील कुटुंबाची पार्श्‍वभूमी पाहिली असती तर घराणेशाहीतून समोर आलेल्या उमेदवारांची संख्या प्रचंड वाढली असती असे जाणकारांचे मत आहे.


गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील ११६ मतदारसंघांत घराणेशाही पार्श्‍वभूमी असलेले एकूण ९४ उमेदवार होते. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक ३५ उमेदवार होते. विशेष म्हणजे त्याखालोखाल भाजपने तब्बल २५ उमेदवार हे घराणेशाहीतून दिले होते. त्यानंतर घराणेशाही पार्श्‍वभूमी असलेले कॉंग्रेसचे १९ तर, शिवसेनेचे ११ उमेदवार होते. म्हणजेच सर्वच राजकीय पक्षांत घराणेशाही हे आता प्रमुख वैशिष्ट्य आहे.


पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात ११६ मतदारसंघांत ९४ उमेदवार घराणेशाहीचे आहेत, याचा अर्थ जवळपास प्रत्येक मतदारसंघावर घराणेशाहीचा प्रभाव आहे. कित्येक मतदारसंघात तर दोन्हीही प्रमुख उमेदवार हे घराणेशाहीचे आहेत. त्यामुळे जनतेला घराणेशाही निवडण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. निवडून आलेल्या उमेदवारांच्या कुटुंबात मागची पिढी व ही पिढी अशा टर्म मोजल्या तर दीर्घकाळ सत्ता त्या कुटुंबात आहे. त्या मतदरासंघात विरोधी पक्ष नीट उभा राहू दिला जात नाही. त्यामुळे अशा मतदारसंघात लोकशाही नावालाच आहे. ही संस्थाने झाली आहेत.


पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय घराणेशाहीतील ५४ उमेदवार विजयी झाले. तर, ४० उमेदवार पराभूत झाले. म्हणजेच जवळपास ४२ टक्के घराणेशाहीतील उमेदवार पराभूत झाले. या ४० उमेदवारांच्या पराभवाची कारणे वेगळी होती. या उमेदवारांनी ऐनवेळी केलेले पक्षांतर लोकांना आवडले नाही. याशिवाय भाजपविरोधी नाराजी, सांगली-कोल्हापुरात पुराच्या काळात सरकारने प्रभावी उपाययोजना न करणे, अशी काही कारणे आहेत. त्यामुळे हे उमेदवार पराभूत झाले आहेत. घराणेशाहीचा उमेदवार हरावा, असे मुद्दे प्रचारात येत नाहीत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
विदेशी ब्राम्हण मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस यांची झुंडश
आतंकवादी संघटन आरएसएसविरोधात राष्ट्रव्यापी चरणबद्ध आं
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे?
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी..!
भारत मुक्ती मोर्चा-बहुजन क्रांती मोर्चाची नागपूरमध्ये
‘आरएसएस’ देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन
बिहारमध्येही ओबीसी आरक्षणास ब्रेक
दसर्‍याला रावण दहन केल्यास ऍट्रोसिटी दाखल करा
राजकीय पक्षांकडून मोफत देण्याच्या घोषणा अर्थव्यवस्थेस
चाकू, कोयता तयार ठेवा.. हत्यार उचला, नरेंद्र मोदींकडून हिं
भारताचा विकास दर घसरणार; येऊ शकतो ५.७ टक्क्यांपर्यंत
१ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नो
उत्तराखंडमध्ये व्याघ्र प्रकल्पासाठी ६ हजारांहून अधिक झ
छत्तीसगडमध्ये ३२ टक्के आरक्षणासाठी हजारो आदिवासींचे धर
एनआयएकडून यूएपीएची ८० टक्के प्रकरणे केंद्रातील आरएसएस
मोदींची रॅली कव्हर करण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र आणण
असमानता, गरीबी, उपासमारी, बेरोजगारीवर आरएसएसचे वक्तव्य:
६ ऑक्टोबरचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार कुंठल्याही परि
गरिबी, बेरोजगारी, वाढती विषमता चिंताजनक
असंविधानिक कॉलेजियमच्या माध्यमातून ३.५ टक्के ब्राम्हणा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper