×

वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ ! पुराणे अमंगळ विटाळाची !

Published On :    3 Aug 2022
साझा करें:

देहासी विटाळ म्हणती सकळ ! आत्मा तो शुद्ध बुद्ध॥ देहीचा विटाळ देहीच जन्मला|सोवळा तो झाला कवण वर्ण॥ विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान|कोणी देह निर्माण नाही जगी॥ म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी|विटाळ देहांतरी वसतसे॥ देहीचा विटाळ देहीच निर्धारी|म्हणत महारी चोखीयाची॥देहासी विटाळ म्हणती सकळ ! आत्मा तो शुद्ध बुद्ध॥
देहीचा विटाळ देहीच जन्मला|सोवळा तो झाला कवण वर्ण॥
विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान|कोणी देह निर्माण नाही जगी॥
म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी|विटाळ देहांतरी वसतसे॥
देहीचा विटाळ देहीच निर्धारी|म्हणत महारी चोखीयाची॥


असे रोखठोक मत आपल्या अभंगातून संत सोयराबाई यांनी मासिक पाळीविषयी मांडले आहे. पण हे विचार भटांच्या डोक्यात बसण्यापलीकडचे आहे. कारण आर्य भटांच्या खोपडीतून निघालेल्या व निर्माण झालेल्या भंकस कथेतून सांगितले की, ब्रम्हणदेव नामक अर्धनारी? नटेश्‍वराच्या जागेतून बगलेतून तोंडातून व पायातून जगातील मानवजातीची उत्पत्ती झाली. 


त्याच विचारधारेचे पाईक आज त्या बायल्या ब्रम्हदेवाचे देव्हारे माजवताना दिसतात. पुरुषाच्या मुखातून लेकरं होतात का? ह्या ब्रम्हदेवाला मासिक पाळी कुठून येत होती असा प्रश्‍न महात्मा फुलेंनी विचारून ह्या ब्रम्हदेवाचा गर्भपात केला होता. पण असे प्रश्‍न आजपर्यत ज्यांच्या मस्तकात कधीच पडले नाहीत ते बायल्यांचे बाईले समर्थक महिलेला मासिक पाळीमुळे दुय्यम स्थान देतात, तिचा पावलोपावली अवमान करतात. त्या पुरुष सत्ताक संस्कृतीच्या समर्थकांना सागावेसे वाटते की, तुम्ही ज्याच्या पोटी जन्म घेतला आहे ती तुमची आई एक महिला आहे. 


तुमच्या जन्मापूर्वी व जन्मानंतर तुमच्या आईने सहन केलेल्या कळा आणि तिच्या वाट्याला आलेले दु:ख विसरून महिलांच्या मासिक पाळीला नावे ठेऊन महिलांना हीन लेखू नका. ह्याच कारण मासिक पाळीतून तुमचा जन्म झाला आहे याची थोडीतरी लाज बाळगा. पण आज काही कपाळकरंटे मात्र महिलेला आलेल्या मासिक पाळी दरम्यान तिचा अवमान होईल असे वर्तन करताना दिसतात. त्यात काही शिक्षकही कुठेच कमी नाहीत असे म्हटले तर चालेल. कारण मासिक पाळीत जर मुलीने वृक्षारोपण केले तर ते झाड जळते असा जावईशोध एका शिक्षकानं लावला त्यावर मोजक्याच लोकांनी प्रतिक्रिया दिली. त्याव्यतिरिक्त चित्रातला वाघ केवळ आणि केवळ चित्रातच डरकाळी फोडताना शोभून दिसण्या लायक आहे असे वाटायला लागले. कारण अजूनपर्यंत वाघातल्या चित्राने डरकाळी फोडली नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.


प्रत्येक मानव हा आईच्या उदरातून निर्माण झालेला आहे, त्या जीवाची निर्मिती होण्यासाठी महिलेला मासिक पाळी येणे महत्वाचे असते. पण ब्रम्हदेवाच्या जांघेतून घरंगळत आलेल्या पिलावळी मात्र आज महिलांच्या मासिक पाळीवर प्रश्न करून त्यांना हिनतेची वागणूक देताना दिसतात. त्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथिल त्र्यंबक देवगाव आश्रम शाळेत १५ दिवसांपूर्वी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षकाने सर्वांना सूचना केली की, ज्यांना मासिक पाळी सुरु असेल त्यांनी झाड लावू नये, अन्यथा झाड जळून जाईल असे सांगून ज्या विद्यार्थिनींना मासिक पाळी होती त्यांना वृक्षारोपण करु दिलं नाही. 


याप्रकरणी एका १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणा-या विद्यार्थिनीने ह्या शिक्षकाची थेट तक्रार केली आहे. पाळीचा आणि वृक्षारोपणाचा काहीही संबंध नसताना केवळ अंधश्रद्धेपोटी शिक्षकाने हे केल्याने अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. मासिक पाळीचा ज्यांना एवढा तिटकारा असेल त्यांनी खुशाल आपण ब्रम्हाच्या जांघेची पैदाईश आहोत हे जाहीर करावे. कारण अशा नालायक पिलावळी ह्या भुतलावर जन्माला येण्यापूर्वी त्यांच्या मातेने असा कपाळ करंटा लाल कुशीतच का मारला नसेल? 


मासिक पाळीतील मुलीच्या स्पर्शाने जे झाड जळते ते आमच्या हिताचे असणारच नाही. त्यामुळे मास्तरड्याने खुशाल त्या झाडाचा पाला चघळत बसावा. पण महिला मुलींना जर यानंतर अशी वागणूक कोणी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला धडा शिकवण्यासाठी मुलींनी सज्ज रहावे कारण लढूनच अशी बांडगुळ नेस्तनाबूत करता येतील.


पीडीत मुलगी सांगते की, ‘ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे त्यांनी झाडे लावायची नाहीत. कारण त्यांनी लावलेली झाडे मरतात. मासिक पाळीत मुलींनी झाडाकडे यायचं सुद्धा नाही’,‘मागच्या वर्षी जी झाडे लावण्यात आली होती ती जगली नाहीत. कारणं मासिक पाळी आलेल्या मुली झाडाजवळ जातात आणि त्यामुळे झाडं जगत नाही’,असं शिक्षक म्हणाले. याबद्दल मुलींनी शिक्षकांना प्रश्‍नही विचारला मात्र, शिक्षकांनी दमदाटी करत गप्प बसण्यास सांगितलं असल्याचेही पीडित विद्यार्थिनी म्हणाली. 


या प्रकरणी आदिवासी विकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आश्रमशाळेवर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचं आहे. त्या मुलीने या प्रकरणी आवाज काढला त्याबद्दल तिचे अभिनंदन कारण अशा मानसिकतेच्या लोकांना वेळीच ठेचले पाहिजे, नाहीतर असे विघ्नसंतोषी मास्तरडे मुलींना दमदाटी करून या समाजात मुलींना जगणे मुश्कील करतील. 


त्यामुळे ह्याला सांगावं वाटत की, स्पर्शाने झाड जळत नसते तर त्याला कमी पडलेल्या पाण्यामुळे झाड जळत असते हे ज्याला समजत नाही अशा शिक्षकाला पायताणाचे फटके का दिले जाऊ नयेत? अशानीच शिक्षणक्षेत्राचा सत्यानाश केला आहे असे म्हटले तर चुकते कुठे? जिवंत सरस्वतीचा अवमान करणारांचे मुक समर्थन करून फोटोतील सरस्वतीच्या पुढे ताट वाटी ओवाळून धूप बत्तीचा अंगारा कपाळी माखणारे असे मास्तरडे धरून पायताणे का फटकावू नयेत? जेव्हा मुली अशा विध्नसंतोषींना पायताणशचे फटके देतील तेव्हाच कुठेतरी मुलींचा सन्मान होईल अन्यथा हे नराधम अवमान तर करतच आहेत.


विद्यार्थ्यांना धडे देणारा शिक्षकच जर मुलींना मासिक पाळीत अवमानकारक हिनतेची वागणूक देऊन भेदभवाची कृत्य करत असेल तर मुलांच्या भविष्याचं काय?असा प्रश्न उपस्थित होतोय. आज देशात एकीकडे सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी महिला विराजमान होत असतांनाच दुसरीकडे आदिवासी आश्रम शाळेतील एका तरुणीला वृक्षारोपण करण्यापासून थांबवलं जातं ही विचार करण्याची गोष्ट आहे. 


कारण २१ व्या शतकातही अशा संतापजनक घटना घडत असतील तर यावर कठोर कारवाई होणे अत्यंत महत्वाचे आहे. घडलेल्या या प्रकाराबद्दल समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी सदरील घटनेची चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महिला या नात्याने प्रत्येक महिलेने त्या नाशिक येथील घटनेचा व तेथील शिक्षकाचा निषेध करून पीडीत मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले पाहिजे. 


पण इतर वेळी महिलांच्या प्रश्नावर टाहो फोडल्याचा बनाव करून स्वतःची पोळी भाजणारी तृप्ती देसाई व चित्राताई वाघ ह्या काय कुठे हजला गेल्या का? कारण ह्यांनी अजूनपर्यत या प्रकरणी आपली भुमिका स्पष्ट का केली नाही? त्यामुळे अशा संधीसाधू महिला ओळखून यांचाही बंदोबस्त मुलींनी केला पाहिजे. कारण ह्या शिक्षकांच्या डोक्यात बसलेली घाण ही मनुच्या डोक्यातून निघालेल्या नरकुंडातील आहे. त्यामुळेच तर अशा ब्राम्हणांविषयी दिनकरराव जवळकर म्हणतात की, ब्राम्हण लोक ब्रम्हदेवाच्या ओकारीपासून झालेले असोत किंवा जुलाबापासून झालेले असोत त्यांची जन्मजात अशी वाकडी शेपटी असते.


मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला शाळेतील वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी होण्यास मनाई केल्याची घटना नाशिकमध्ये घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यामुळे राज्य महिला आयोगापासून ते शिक्षण विभागापर्यंत सगळ्यांनीच या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यात प्रकल्प अधिकारी यांनी पीडीत मुलीच्या शाळेला बुधवारी भल्या पहाटे भेट दिली. 


अधिकारी शाळेत दाखल होताच शिक्षकांची एकच पळापळ सुरु झाली. कारण नियमानुसार आश्रमशाळेतील शिक्षकांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक असते. मात्र हे शिक्षक आपापल्या घरून ये-जा करून आश्रमशाळेत शिकवत असल्याचा प्रकार यावेळी समोर आला. अधिकारी शाळेत आल्याचे समजताच हे शिक्षक तातडीने शाळेकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी देवगाव घोटी रस्त्यावर ह्या मुलीचा अवमान करणा-या शिक्षकांच्या कारला अपघात झाला. 


पाळीला विरोध करणारा शिक्षक हा शिक्षक म्हणणाच्या पात्रतेचा होऊन शकत नाही. कारण अशा निच मानसिकतेचे लोक गर्भातच निधन का पावले नाहीत? त्यामुळे प्रकल्प अधिकारी यांनी ह्या शिक्षकाला निलंबित करून त्या मुलींच्या पायावर नाक घासायला लावल पाहिजे तेव्हाच अशा गोष्टींना आळा बसेल. 


कारण मासिक पाळी व विटाळासंबंधी संत चोखोबा म्हणतात की,
कोण तो सोवळा कोण तो वोवळा| दोन्हींच्या वेगळा विठ्ठल माझा॥
वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ! पुराणे अमंगळ विटाळाची॥
जन्मतां विटाळ मरतां विटाळ|चोखा म्हणे विटाळ आदि अंती॥
निचाचे संगती देवो विटाळला|पाणी प्रक्षाळोनी सोवळा केला॥
कोण तो सोवळा कोण तो ओवळा| विटाळाचे मूळ देहमूळ॥
चोखामेळा म्हणे मज वाटते नवल| विटाळापरते आहे कोण॥

नवनाथ दत्तात्रय रेपे
 ९७६२६३६६६२

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
विदेशी ब्राम्हण मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस यांची झुंडश
आतंकवादी संघटन आरएसएसविरोधात राष्ट्रव्यापी चरणबद्ध आं
कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारे हिंसा करू नका, शांतत
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे?
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी..!
भारत मुक्ती मोर्चा-बहुजन क्रांती मोर्चाची नागपूरमध्ये
‘आरएसएस’ देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन
बिहारमध्येही ओबीसी आरक्षणास ब्रेक
दसर्‍याला रावण दहन केल्यास ऍट्रोसिटी दाखल करा
राजकीय पक्षांकडून मोफत देण्याच्या घोषणा अर्थव्यवस्थेस
चाकू, कोयता तयार ठेवा.. हत्यार उचला, नरेंद्र मोदींकडून हिं
भारताचा विकास दर घसरणार; येऊ शकतो ५.७ टक्क्यांपर्यंत
१ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नो
उत्तराखंडमध्ये व्याघ्र प्रकल्पासाठी ६ हजारांहून अधिक झ
छत्तीसगडमध्ये ३२ टक्के आरक्षणासाठी हजारो आदिवासींचे धर
एनआयएकडून यूएपीएची ८० टक्के प्रकरणे केंद्रातील आरएसएस
मोदींची रॅली कव्हर करण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र आणण
असमानता, गरीबी, उपासमारी, बेरोजगारीवर आरएसएसचे वक्तव्य:
६ ऑक्टोबरचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार कुंठल्याही परि
गरिबी, बेरोजगारी, वाढती विषमता चिंताजनक
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper