×

धक्कादायक! मुंबईत दररोज चार मुलींचे अपहरण

Published On :    3 Jul 2022
साझा करें:

चिंताजनक आकडेवारी आली समोर



मुंबई : मुंबईमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चिंताजनक स्थिती असून यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलींचे प्रमाण अधिक आहे. दररोज सरासरी चार अल्पवयीन मुलींचे अपहरण होते. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये लग्नाचे आमिष दाखविले जात असल्याचे दिसते. या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत ४६८ मुलींचे अपहरण झाले असून यातील ३५८ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सन २०२१ मध्ये अपहरणाचे एक हजार ९३ गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यापैकी ९४२ मुलींचा शोध लागला.


गेल्या आठवडाभरातही अशा काही घटना समोर आल्या आहेत. गोरेगाव पश्चिम येथील गणेशनगरमध्ये राहणार्‍या एका कुटुंबातील नववीत शिकणारी मुलगी शाळेत जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. नेहमीच्या वेळेत ती न परतल्याने आई-वडिलांनी तिच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. त्यावेळी ती शाळेत गेली नसल्याचे समोर आले. 


रात्री उशिरापर्यंत शोधाशोध करूनही मुलगी सापडत नसल्याने कुटुंबीयांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. धारावीमधील फर्निचरच्या व्यापार्‍याची १६ वर्षांची मुलगी संध्याकाळी काहीच न सांगता घराबाहेर पडली, ती पुन्हा परतलीच नाही. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेले, असा आरोप व्यापार्‍याने केला. धारावी पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.


पवईच्या साकीविहार रोड येथे वास्तव्यास असलेल्या १७ वर्षांच्या मुलीचे त्याच परिसरातील एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांना होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही मुलगी काही न सांगता घराबाहेर पडली. ती परतलीच नाही. लग्नाचे आमिष दाखवून त्याच मुलाने तिला पळवून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 


कांदिवली येथील एका व्यापार्‍याच्या घरामध्ये काम करणार्‍या महिलेची अल्पवयीन बहीणही बेपत्ता झाली आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत. मुंबईतून अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. यातील अनेक प्रकरणे प्रेमसंबंधातून झाली असली, तरी मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो.


२०२० मध्ये अपहरणाचे ७७३ गुन्हे दाखल झाले त्यापैकी ६७३ गुन्ह्यांची उकल झाली. २०२१ मध्ये अपहरणाचे १०९३ गुन्हे दाखल झाले त्यापैकी ९४२ तर २०२२ मध्ये ४६८ दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ३५८ गुन्ह्यांची उकल झाली. समाजमाध्यमांचा अतिवापर, पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष, शाळा-कॉलेजांमध्ये तरुणांचा सहवास अधिक, चित्रपटातील प्रेमकथांचा विपरित परिणाम, लैंगिक शोषण करून ब्लॅकमेलिंग अशाप्रकारे कारणे समोर आली आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबुद्ध भारताला हिंदुस्थान बनवू नका
बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण, त्यांच्यावर चां
११ दोषींची सुटका करणार्‍या समितीत भाजपचे ४ सदस्य
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीक
विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देत
लखीमपूर खेरी येथे संयुक्त किसान मोर्चाचे धरणे आंदोलन
२०२१-२२ मध्ये भारताने चीनकडून केली ७ लाख कोटींची आयात
बामसेफचे उद्या मराठवाडा विभागीय संमेलन
तामिळनाडू-महाराष्ट्रासह १३ राज्यांनी ५ हजार कोटींची थक
राष्ट्रभक्तीचा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस
ऍलोपॅथी आणि कोविड-१९ च्या उपचारांबाबत जनतेची दिशाभूल कर
भाजपा नेते शहानवाज हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
भारतातील अनुसूचित जाती आणि चीनमधील उइगुर गुलामीच्या वि
भारतात २७ कोटी लोक दारिद्रयरेषेखाली व २२ टक्के लोक गरिबी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२० मधील ३६ तासांच्या भारत दौर्
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून ईव्
राज्यांची धोरणे काय असावीत हे ठरवणारे तुम्ही कोण?
पीएम २.५ प्रदूषणामुळे २०१९ मध्ये दिल्लीत प्रति एक लाख लो
सैन्य भरतीसाठी ‘अग्नि’ परीक्षा देताना तरुण मैदानात कोस
राज्यात ४५ दिवसांत १३७ शेतकर्‍यांची आत्महत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper