×

राज्यपाल-कोर्टाने बंडखोरांना बळ दिले

Published On :    3 Jul 2022
साझा करें:

संजय राऊत यांनी डागली तोफ



मुंबई:  बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले व त्यांनीच त्यांच्या विरोधात बंड केले. पक्षांतरबंदीविरोधी कायद्याने त्यांची आमदारकी जाऊ शकते, पण महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणार्‍यांना बळ दिले, असा अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे.


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी पुकारून भाजपसोबत आता सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना पुरती घायाळ झाली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.यावेळी त्यांनी राज्यपाल आणि सुप्रीम कोर्टावरही निशाणा साधला.


एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किती आमदार आहेत ते सोडा, पण हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले व त्यांनीच त्यांच्या विरोधात बंड केले. पक्षांतरबंदीविरोधी कायद्याने त्यांची आमदारकी जाऊ शकते, पण महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणार्‍यांना बळ दिले, असा आरोपच राऊत यांनी केला.


जर कोणाला पक्ष बदलायचा असेल तर त्याने जनतेच्या नजरेसमोर बदलला पाहिजे. त्याच्यात जनतेला तोंड देण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. आमच्या लोकशाहीला तेव्हाच बळ लाभेल की, जेव्हा पक्ष बदलणारा राजीनामा देऊन पुन्हा जनतेत जाईल. तसे न करणार्‍यांना कायद्याने बाद केले पाहिजे व पक्षांतरबंदी कायद्याची बूज राखली पाहिजे. मात्र महाराष्ट्रात वेगळे घडवले गेले. पक्ष बदलणार्‍या अपात्र ठरण्याची शक्यता असलेल्या आमदारांनी महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवले आणि राज्यपाल महोदयांनी या घटनाबाह्य कृतीचे ‘पेढे’ खाल्ले, अशी जळजळीत टीका राऊत यांनी राज्यपालांवर केली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबुद्ध भारताला हिंदुस्थान बनवू नका
बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण, त्यांच्यावर चां
११ दोषींची सुटका करणार्‍या समितीत भाजपचे ४ सदस्य
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीक
विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देत
लखीमपूर खेरी येथे संयुक्त किसान मोर्चाचे धरणे आंदोलन
२०२१-२२ मध्ये भारताने चीनकडून केली ७ लाख कोटींची आयात
बामसेफचे उद्या मराठवाडा विभागीय संमेलन
तामिळनाडू-महाराष्ट्रासह १३ राज्यांनी ५ हजार कोटींची थक
राष्ट्रभक्तीचा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस
ऍलोपॅथी आणि कोविड-१९ च्या उपचारांबाबत जनतेची दिशाभूल कर
भाजपा नेते शहानवाज हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
भारतातील अनुसूचित जाती आणि चीनमधील उइगुर गुलामीच्या वि
भारतात २७ कोटी लोक दारिद्रयरेषेखाली व २२ टक्के लोक गरिबी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२० मधील ३६ तासांच्या भारत दौर्
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून ईव्
राज्यांची धोरणे काय असावीत हे ठरवणारे तुम्ही कोण?
पीएम २.५ प्रदूषणामुळे २०१९ मध्ये दिल्लीत प्रति एक लाख लो
सैन्य भरतीसाठी ‘अग्नि’ परीक्षा देताना तरुण मैदानात कोस
राज्यात ४५ दिवसांत १३७ शेतकर्‍यांची आत्महत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper