×

नवीन कामगार कायद्यांविरोधात ‘आरएमबीकेएस’चे राज्यभरात धरणे आंदोलन

Published On :    2 Jul 2022
साझा करें:

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध



पुणे: नवीन कामगार कायदे लागू करण्याच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या धरणे आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नवीन कामगार कायदे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली. या धरणे आंदोलनाला राज्यभरात उदंड प्रतिसाद लाभला.


भारत देशाच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये ८५ टक्के बहुजन समाजाला  सामाजिक, आर्थिक शैक्षणिक, सांस्कृतिक व संविधानिक हक्क अधिकारापासून व्यवस्थेदवारे पीडित ठेवण्यात आले आहे. वर्तमानातील ९० टक्के बहुजन समाजातील लोक मजदूर, शेतकरी, कामगार व नोकर आहेत.,भारतीय भांडवलदारी व्यवस्थेने श्रमिकांचे  मोठ्या प्रमाणात शोषण  केले आहे. यासाठी महामानव विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ३५०० च्या जवळपास कायदा श्रमिकांसाठी बनवून लिहून तो भारतात लागू केला होता.


आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदा समाप्त करुन नवीन कामगार कायदा भांडवलशाही  केंद्र व राज्य सरकारने १ जुलै २०२२ पासून लागू केला आहे. भारत देशाची भांडवलदार सरकार श्रमिक एक माणूस आहे हे विसरुन गेली आहे. 


श्रमिक फक्त मशिन आहे असे मानून असे समजून नवीन श्रम कायद्यानुसार १२ तास काम पगाराची सुरक्षा नाही, जिविताची सुरक्षा नाही, नोकरी आता फक्त मालकांच्या दयेवर व मर्जीवर अवलंबून असणार आहे. नियमित नोकरीची व्यवस्था समाप्त केली आहे. ठेकेदारी पद्धतीने श्रमिकांचे शोषण करण्याची सूट दिली आहे व प्रोव्हीडंट फंडात ज्यादा कटिंगची व्यवस्था केली आहे. एकूण पगारातून सुद्धा काही प्रमाणात कटिंगची व्यवस्था लागू करण्याची व्यवस्था केली आहे.


अशा प्रकारे जिवंत माणसाला मशीन बनविण्याचा कार्यक्रम आहे. अशा शोषण करणार्‍या काळ्या कायदयाच्या विरोधात व तो लागू न करण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यस्तरीय ३६ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे प्रदर्शन आज पार पडले. नवीन श्रम कायद्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबुद्ध भारताला हिंदुस्थान बनवू नका
बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण, त्यांच्यावर चां
११ दोषींची सुटका करणार्‍या समितीत भाजपचे ४ सदस्य
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीक
विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देत
लखीमपूर खेरी येथे संयुक्त किसान मोर्चाचे धरणे आंदोलन
२०२१-२२ मध्ये भारताने चीनकडून केली ७ लाख कोटींची आयात
बामसेफचे उद्या मराठवाडा विभागीय संमेलन
तामिळनाडू-महाराष्ट्रासह १३ राज्यांनी ५ हजार कोटींची थक
राष्ट्रभक्तीचा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस
ऍलोपॅथी आणि कोविड-१९ च्या उपचारांबाबत जनतेची दिशाभूल कर
भाजपा नेते शहानवाज हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
भारतातील अनुसूचित जाती आणि चीनमधील उइगुर गुलामीच्या वि
भारतात २७ कोटी लोक दारिद्रयरेषेखाली व २२ टक्के लोक गरिबी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२० मधील ३६ तासांच्या भारत दौर्
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून ईव्
राज्यांची धोरणे काय असावीत हे ठरवणारे तुम्ही कोण?
पीएम २.५ प्रदूषणामुळे २०१९ मध्ये दिल्लीत प्रति एक लाख लो
सैन्य भरतीसाठी ‘अग्नि’ परीक्षा देताना तरुण मैदानात कोस
राज्यात ४५ दिवसांत १३७ शेतकर्‍यांची आत्महत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper